"बाप" माणूस

लक्ष द्वीप त्यास निचतम वाटे
क्षणिक सुख कस्पटासम भासे
आत्म सुख ना त्या ललाटे
शत्रू मित्र सम त्यास नित्य भासे
कष्ट कष्ट आणि कष्ट नित्य नवे
भासती त्यास निचासम सवे
ओघळती मनोमनी अश्रू
कष्ट होती न भार नवे श्रम मनोभावे
मम लघाटी न्यून लिहिले
त्यास आधार ? मौन राहिले
नित्य नेम आनंद झंकारले
मम वित्त त्या छायेत सुखी राहीला
सन्मान त्या साठी न मी लिहिला
प्रेम ना अर्थ ओलांडून दिला
अंती स्वार्थ जिंकला ,
जगण्यासाठी ,
@हृषीकेश    29/01/2018
   9.30 AM..

Comments

Popular Posts