वॉलकॉट इन मुरुड

        अरे शंकरा आलास काय रे ! शिंच्या ! हा हा ती टोकावरची पेंड राहिलीय बघ ती पण पाड जरा, हे पाडेकरी ना, काही शिस्त म्हणून राहिली नाही, सकाळचे 6 वाजले होते. रामा अडकेननी नुकतेच परसाकडे जाऊन येवून आपले नित्याचे अन्हिक आटोपले होते. तेवढ्यात त्यांचा नेहमीचा नारळ पाडेकरी शंकर मांजरेकर आला,  नंतर उन्ह होत असल्याने जास्त लवकर थकवा येतो यासाठी शंकर आपले पाड्याचे काम पहाटेच सुरू करी, त्याला माडामागे चार आणे मिळत दिवासाला,  दीड - एकशे माड पाडले की, तीस पस्तीस रुपये हाती पडत. त्यावेळी म्हणजेच 1964 – 65 चां काळ इतके रूपये खूप होते. दोन अण्यची ताडीची बाटली लावली की शंकर चां दिवस संपे. 
आज रामा अडकेनकडे पाडा आटोपून त्याला लवकरच परभाकर कडे निघायचे होते. रामा च्या नेहमीच्या एक्का माडावर शंकर चढला. त्या बागेतला एक्का माड उंच सरळ आणि ताठ म्हणून त्याला ओळखीसाठी एक्का माड सगळे त्याला म्हणात असत. पूर्ण पंच्याहत्तर माडांची बाग ती, अचानक शंकर ला उंचावरून एक वाऱ्याचा झोत कापत झु sssss करीत कधीच न आईकलेला आवाज आला. शंकर ने माडाच्या टोकावरून पाहिले. दरदरून घाम फुटला त्याला., त्याने चक्क ईमान आयुष्यात पहिल्यांदा पाहिले होते. झरझरझर तो माडावरून उतरला, जिवाच्या आकांताने त्याने बोंब ठोकली, " आsssर, आssssर ईमान, ईमान, रामा अडके त्याच्या आवजने विलक्षण घाबरले. त्यांनीही त्याच्या मागून धावायला सुरुवात केली. खालच्या पाखडीतून धावत धावत दोघे कधी परसू काकांच्या कवाडीशी आले त्यानाही कळले नाही. परशुराम जोशी त्यावेळी मुरुड गावचे सरपंच. सलग 3 वेळा बिनविरोध निवडून आल्यामुळे गावकऱ्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास. " अरे शंकर्या काय झालं, अरे असा धावतोस काय वाघ दिसल्यासारखा ? , " काका काका, ईमान ईमान ईमान , तिथेच शंकर चक्कर येवून पडला, रामा अडकेंनी सगळी हकीकत काकांना सांगितली. काका , विंद्या बाळ, रामा अडके अशी त्रिकोणी प्रजा एकत्रात काय हे नवीन बघायला निघाली. काही क्षणांत ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली.

         नाना माने, मुरुड गावातला एक सद्गृहस्थ , शिकारी, हिरे माणके चे जाणकार, उत्तम व्यासंगी व्यक्ती, मदिरा आणि मदिराक्षी, रमा आणि रमी ह्यातले सगळेच खुबिया जाणणारा अत्यंत विलासी व्यक्ती आपल्या बागेत नेहमीप्रमाणे गरम्याला त्रासून आपल्या नादात लोळत होते. ह्या कर्णकर्कश आवाजाने त्यांचीही झोपमोड झाली. ते  ही बागेतून समुद्राच्या किनार्यावर ( लांगीवर ) आले. च्यायला , भिकरचो_  झोपेची आय झ_____ एक जोरदार शिवी घालून नाना दक्षिणेस बघू लागले. बागेत असलेला चालू शिंपण थांबवून जना मागवेकर ही लांगिवर आला. जना ने नाना ला खूण केली दोघांची नुकतीच नजरानजर झाली. एक पांढर शुभ्र पंखांचां टी आकार असलेलं विमान लांगीत सुख्या वाळूत खोल रुतून बसलेलं. आतमधले प्रवासी बाहेर येवून पांढरे लाकडी खोके सुख्यां वाळूत खड्डे मारून पुरत होते. दोघांनीही हे दृश्य लपुंनच पाहिले. जना नाना जोडगोळी मनोमन खुश. 


          परसू काका , रामा आडके, आणि विंदया बाळ, आणि शंकर चौघे लांबूनच येताना बघून एका विलायती कपडे घातलेल्या काळा चस्मा वाल्या त्या माणसाने चटकन आपल्या नोकरांना खूण केली. सगळ्यांनी चटचट त्या पुरलेल्या जागेवर सुखी वाळू पसरली. ते दोघे विलायती माणसं होती बाकी कोणी काळे भिन्न तामिळी दिसणारे चार नोकर असावेत. " अहो कोण तुम्ही "? विलायती माणसांना परसु काकांनी विचारलेला प्रश्न अजिबात समजला नाही. शेवटी रामा अडके ने हाताच्या खुणा करून कुठून ? कुठे ? आणि केव्हा ? हे विचारले. तरीही हे ढम्म, शेवटी परसू काकांनी गावातला एकमेव इंग्रजी जाणकार " मन्या जोशा " ला पाचारण केले.. शंकरा त्याच्याकडे जाईपर्यंत तब्बल अर्धा तास हे सगळेच एकमेकांच्या तोंडाकडे बघून आपला वेळ काढत होते.. रामा अडके ने ह्याचा एकंदरीत हुलिया बघितला. ते दोघेही विलायती टीपटॉप व्यवस्थित फॉर्मल पँट आणि शर्ट आणि टोक वर आलेले ते काळे बुट, एकंदरीत बरेच श्रीमंत दिसले रामा ला , रामाने आपल्या आधीच्या पूर्ण आयुष्यात एवढे श्रीमंत आणि असे कपडे घातलेले पांढरे लोक पाहिलेले नव्हते… परसू काका मात्र विलक्षण विचारात होते, करायचं तर करायचं काय , ते पडले सरपंच, शेवटी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायला हवा.. तितक्यात शंकर मन्या जोशाला घेवुन आलाच, मन्या ने चटकन ओळखलं हे कोणीतरी युरोपियन आहेत. मन्या पुढे गेला त्याने आपल्या तोडक्या मोडक्या इंग्रजीत संभाषण चालू केलं.. त्यांनी ह्याला त्यांच्याकडच्या तीन बॅगा आणि काही समान कुठल्यातरी मार्गाने बस स्टॉप पर्यंत घेवून जायला सांगितल आणि त्यांनाही सोबत घेवून कुठल्यातरी बस मध्ये बसवून बॉम्बे ला जायचं आहे त्यासाठी मदत मागितली.. चटकन साधारण पांढरी चकचकीत विलायती नोट बघून मन्या तयार झाला.. " अहो ते फसलेत , ईमानात बिघाड झालाय, तेव्हा त्यांना बोंबेत जायचं आहे , आता 10 ची बस आहे काका, बसवून देवू, " अरे पण ह्या पैशाचं करणारेस काय , काकांनी उगाचच मन्या ची खोड काढली, अहो काका , मरो, रोज नोट उघडून पाहीन जरा लोकांना दाखवायला बरी पडते, उगाचच शामळ हसून त्याने विषयाला बगल दिली. देवीच्या देवळाजवळ हा लोकांचा गदारोळ जमला होता. ह्यांना पाहायला आणि ईमान आतून बघायला लोकांची गर्दी आतुर झाली होती. " मन्या जोशा ला उगाचच आपण कोणीतरी मोठे मालदार आहोत अशी फिल आलेलं होत, लोक अचंबित नजरेने बघतायत हे बघून परसू काका ताठ मानेने त्यांना सामोरे जाऊ लागले… हा सगळा गोतावळा पांगला. हे बघून माडाच्या आडून जना आणि नाना यांनी एकमेकांना टाळी दिली. नाना आईक, जना ने नाना ला सावध केलं, हे सगळ आटोपू दे रात्री बघू, दोघांनी एकमेकांच्या दोस्तिच्या आणाभाका घेवून तिथून पोबारा केला.. 


           त्या विलायती माणसांकडे कडक कपडे, आणि विलायती घड्याळे तसेच काही प्रमाणात स्मगल चे सोने होते. सगळा माल त्यांनी इकडेच उरकून टाकला होता पुन्हा कधीतरी सगळ नीट झालं की आपण इकडे येवून ते आपला माल परत घेवून जाऊ या आशेवर. मुंबईला जाताना त्यांच्याकडे तिकिटाला पण पैसे नव्हते म्हणुन त्यांनी आपल्याकडील हातातील विलायती घड्याळ काढून कंडक्टरला दिले. (पुढे त्या कंडक्टरची नोकरी गेली) कोण होते ते ?

         

 ते होते कुख्यात आंतरराष्ट्रीय स्मगलर  डॅनियल वॉलकॉट आणि डोंझे. विदेशी बनावटीची घड्याळे आणि स्मगल चां दुसरा माल घेऊन ते निघाले होते परंतु तांत्रिक बिघाडामुळे त्यांना आपले विमान अचानक उतरवावे लागले. पोलीस यंत्रणा आणि प्रशासन ह्यांना चकवा देऊन ते दापोलीमधुन निसटले पुढे कस्टमला चकवून ते विमानाने लंडनला तिथून इटली ला पोहचले. तेव्हा आत्तासारखी आधुनिक संपर्कयंत्रणा नसल्याने हे शक्य झाले. यानंतर मात्र प्रशासनाची जोरदार धावपळ उडाली. पोलीस प्रशासनामधील अनेक वरिष्ठ अधिकारी मुरुड येथे दाखल झाले. वॉलकॉटला जायला ज्यांनी मदत केली त्यांना पोलिसांनी पकडुन थेट दिल्लीपर्यंत नेले (त्यांना बर्फाच्या लादीवर देखील झोपवलनी होती असे म्हणतात ). वॉलकॉटने जाताना वाळूत सोने आणि हिरे पुरले आहेत अशी अफवा उठली होती म्हणून खोदकाम करून झाले पण हाती काहीच लागले नाही. वाळूत त्यांनी कुठे काय पुरले आहे हे फक्त जना आणि नाना माने यानाच माहिती होते. पण शंकरा यांनी साधारण त्यांचं ठिकाण माडावरून पाहिलं असल्याने त्याला आणि रामा अडके ला त्याचा अंदाज आलेला होता. विमान समुद्रावरच राहिले  होते त्याठिकाणी नंतर बॉम्बे पोलिसांकडून पोलीस पहारा बसवण्यात आला. विमान बघायला आजूबाजूच्या गावातील तसेच तालुक्यातील लोक येत असत. त्याकाळी समुद्रकिनारा आत्तासारखा गजबजलेला नव्हता. 


           बॉम्बे पोलिसांनी पहारा करण्यासाठी एक तंबु उभारला होता. घटनेच्या दोन दिवस अंतराने नाना आणि जना ने रात्री घोगडी लपेटून घेवून पोलिसांना घाबरवण्याचे कार्य सुरू केले कारण त्यांच्यामुळेच त्यांना त्यांनी पाहिलेल्या जागेवर उकरून तो माल हस्तगत करता येत नव्हता. शेवटी कोकणी भूत आणि भुताटकी चां त्यांना तडाखा लागलाय आणि पोलीस रात्रीचे त्याठिकाणी राहायला घाबरु लागले आहेत हे पाहून नाना, जना आणि रामु ह्यांनी एकत्र येवून ती जागा खोदून शोधून काढली, त्या पांढऱ्या लाकडी पेट्या तब्बल सात पेट्या विलायती घड्याळे आणि तीन पेट्या सोन्याच्या विटांनी भरलेल्या, तिघांनीही माल वाटून तेरी भी चूप , मेरी भी चूप असा पवित्रा घेतला. सुमारे वर्ष दीड वर्ष हा बॉम्बे पोलिसांचा पहारा चालला. कधीतरी हे पोलिस कर्मचारी स्थानिक भजन किर्तनांच्या कार्यक्रमातदेखील सहभाग घेत असत. कालांतराने आलेल्या पावसाळ्यात ते विमान वाळूत रुतत गेले. डॅनियल वालकाट पकडला गेला नाही त्यांनी भारतीय पोलिस खात्याला लीलया गुंगारा देवून इटलीत तो कधीच पोहोचला, संपर्काची साधने कमी आणि अत्यंत कमजोर गुप्तहेर यंत्रणा, दीड दोन वर्षांनी प्रशासनाने ट्रॅक्टरच्या सहाय्याने ते विमान बाहेर काढले खरे पण खाऱ्या हवामानामुळे विमानाचा नुसता सांगाडा उरला होता. तो सांगाडा ट्रकमध्ये भरून मुंबईला नेण्यात आला. या पवित्र गावच्या बारा भानगडीच्या मुरुडच्या देवीच्या गल्लीमधुन तो नेत असतानादेखील तो बघण्यासाठी तोबा गर्दीचा उच्चांक झाला होता. 

     

 आजही मुरुडचे जुने जाणकार रामा अडके आणि जना मागवेकर च्या पुढच्या यशस्वी वारसांकडे बघून " अरे माडांचे पाडे करून नारळ विकून आणि बागेत शिंपणे काढून इतक्या जागा जमिनी घेणे होईल का ?" वालकाट चां पैसा बाबा, वालकाट चां पैसा , असे स्वगत म्हणून आपल्या मार्गी लागतात आणि त्यावेळी शंकर्याच्या हाळीने त्याच्यासोबत गेलो नाही म्हणून मनोमन पशच्याताप करतात.. 


( ह्यात नमूद सगळी पात्रे पूर्णपणे काल्पनिक असून घटना सत्य आहे. पात्रानशी साधर्म्य आढळ्यास निव्वळ योगायोग समजावा ) 


@hrkvaishampayan

11/05/2023

 


( Small credit to Ajinky Gadre ) 


Comments