ती कोणास न कळे !

ते आकर्षित नयन भोळे,
लोभ लावीती, ते उभार विरळे, ।।

ते टोकदार नाक निराळे,
त्या निमुळत्या हनुवटीवरी नजर खीळे,
ती निसर्गनिर्मित रसिका त्वरित भाळे,
जादुई कींणकींण, क्षणोक्षणी वर्णन शिळे, ।।

ते आकर्षित नयन भोळे,
लोभ लावीती, ते उभार विरळे, ।।


तिरकी नजर, नयन ते खुळे,
शब्दाशब्दांगणिक आकलन लुळे,
नशिबाचे विधिलिखित, काही सावळे,
काही गोरे तर काही काळे, ।।

ते आकर्षित नयन भोळे,
लोभ लावीती, ते उभार विरळे, ।।

नाजूक हस्त स्पर्श वेगळे,
मनी हुरहूर दाटे दृश्य आगळे,
क्षणोक्षणी ते भास निराळे,
मने भाळीती ते केश मोकळे, ।।

ते आकर्षित नयन भोळे,
लोभ लावीती, ते उभार विरळे, ।।

नाजूक जिव्हा,वळण न कळे,
राजहंसी मान,कटाक्ष निळे,
प्रीती साधी अन ती नजर वळे,
शिकारी पहाता त्वरित वासना चाळे,

ते आकर्षित नयन भोळे,
लोभ लावीती, ते उभार विराळे, ।।
@हृषीकेश   01/01/2020


Comments

Popular Posts