हरलेली, हरवलेली संस्कृती..

       2 फेब्रुवारी 2014 रोजी तालिबान्यांनी 50 मिनिटांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि  उत्तरेकडील चित्राल खोऱ्यात कलशा आणि इस्माइली मुसलमानांविरूद्ध “सशस्त्र संघर्ष” ची घोषणा केली आणि सुन्नींना त्यांचे समर्थन करण्याचे आवाहन केले.  जुलै 2014 मध्ये अफगाण-आधारित अतिरेक्यांनी, कथित तालिबान्यांनी बुंबुरियत व्हॅलीमध्ये कलशा मेंढपाळांवर हल्ला केला. बहुतेक कलशा वाचले. तालिबान्यांनी दोन मेंढपाळांची हत्या केली आणि त्यांच्या जवळजवळ 300 मेंढरे नूरिस्तानला नेली.
      कलशा लोक एक रहस्यमय जमात ,कधी आली ? कोठून आली ? मूळचे इथलेच आर्यन की अलेक्झांडर दि ग्रेट सेनेतील सैनिक ? काय आहे त्यांचा इतिहास ? कोणत्याही प्रकारची लिखित माहिती त्यांच्या ' धर्मगुरूंनकडे' ही नाही.
कलशाचा इतिहास वादग्रस्त आहे.  आज चित्रालच्या कलशा वंशाच्या उत्पत्तीविषयी अनेक गृहीतके दिसतात. आतापर्यंत कलशाच्या उत्पत्तीविषयी दोन प्रमुख गृहीतके ठळकपणे मांडली गेली आहेत . इंडो-आर्यन मूळ आणि ग्रीक मूळ.  इंडो-आर्यन मूळ कल्पनेचे समर्थन जॉर्ज मॉर्गनस्टीरिन व शॉमबर्ग कार्ल जेट्टमार आणि पीटर पारक्स उर्वरित गृहीतकांमुळे अशी कल्पना येते की कलश तुलनेने अलीकडील नवखे किंवा मूळचे ग्रीक आहेत.  ही गृहितक एच. सिझर यांनी रचली होती आणि जीन्स लुडे आणि व्हिव्हिएन लिव्ह या दोन फ्रेंच मानववंशशास्त्रज्ञांनी त्याचे समर्थन केले आहे.
         कॅप्टन जॉन वूड यांनी 2004 मध्ये प्रकाशित केलेल्या सिंधू, काबूल आणि बदाख्शनच्या " रूट ऑफ द रिवर" 
 " नॅरिएटिव ऑफ ए जर्नी टू " एक पुस्तक लिहिले.  त्याने या प्रदेशाची मौल्यवान माहिती गोळा केली. वांशिकता आणि समाज.काफिर ( कलशा ) लोक युरोपियन जातीचे आहेत यावर त्याचा क्वचितच विश्वास होता.  त्यांनी एक नवीन कल्पना मांडली की काफिर (कलाशा) लोकांचा बदाख्शन ताजिकांशी संबंध आहे.
          कलशाचे नागरिक सैफुल्ला जान यांनी कलशाच्या इतिहासाची परंपरा उघडकीस आणली. कलशाच्या लोकांची पहिली जन्मभूमी त्स्याम ( शाम )  होती (आणि जगावर हा त्स्याम (शाम) कुठे आहे हे कोणालाही माहिती नाही) जिथे त्यांचे पूर्वज शलक शाह सैन्य घेऊन चित्राल येथे आले होते.  चित्त्राल येथे शालक शाहला चार मुलगे झाले. त्याने आपल्या चार मुलांमध्ये चित्रालचे विभाजन केले होते. शालक शाह नंतर काय घडले यासंबंधी ऐतिहासिक अंतर आहे, कुणालाही ठाऊक नाही.
            कलशा लोक कुठूनही बाहेरून आलेले नाहीत ह्याबाबत ऐतिहासिक तथ्य अथवा दस्तऐवज नसले तरी प्रथमदर्शनी जाणवणाऱ्या काही गोष्टी आणि तथ्यांशी असलेला त्यांचा सहसंबंध कलशा लोक बाहेरून आलेले नाहित हे सहज खोडुन काढतो. 
            कलशा व्हॅलीला अगदी जवळचा मार्ग अफगाणिस्थान येथील गाझियाबाद जिल्ह्यातील जलालाबाद येथून चित्राल येथे तिथून कलशा व्हॅलीत सुमारे 6 तासात ( 220 km ) तर पाकव्याप्त काश्मीर येथील गिलगित प्रांतातून सुमारे 12 तास ( 388 km ) इतका वेळ लागतो. हुंजा येथील जादुई अप्सरांची नगरी हुंझा व्हॅली आणि चित्राल येथील कलशा व्हॅली म्हणजेच जगातील सर्वात अग्रक्रमाने संरक्षित करण्याच्या तातडीची निकड असलेल्या संस्कृती आहेत ह्या दोन्ही संस्कृतीच्या अंगणात इस्लाम नांदतोय ह्यावरूनच ही गरज ठळकपणे जाणवते. 
            आता चित्राल चे ऐतिहासिक स्थान कुठे आहे ते पाहू. प्रथम आपल्याला अफगाणिस्थान मधील वर उल्लेखिलेला नूरीस्थान फ़ॉरेस्ट नॅशनल रिझर्व्ह हा परिसर पहावा लागेल. हा परिसराच्या नावावरून हा रिझर्व्ह आहे पण त्या परिसरातील आत्मघातकी तालिबानी टोळ्या कट्टर इस्लाम चे पालन करणाऱ्या आणि पूर्णपणे त्या परिसरावर आपले वर्चस्व राखून आहेत. त्याच्या पश्चिमेला कामदेश , नंगलम , मित्रालम , मंगलम , कामेश आणि कुनार 
( गाझियाबाद जिल्हा ) असे प्रदेश आढळून येतात ह्या नावांवरून हे कुठल्या धर्माशी ऐतिहासिक सबंध राखून असावेत ह्यासंबंधी गुप्ततेस वाव नाही.
     ह्या प्रदेशाची सीमा तब्बल 300 km इतकी अफगाणिस्थानशी जोडून आहे. हा प्रांत पाकिस्थांमधील KPK  ( खैबर पख्तुनखवा प्रांत ) या भागात येतो आणि चित्राल मधील कलशा जमातीचे लोक बहुत करून दार्दीक भाषा बोलतात. अलेक्झांडर दि ग्रेट चे वंशज अशी त्यांची ओळख जगभरात आहे त्या प्रदेशाला ग्रीक शासनाकडून काही मदत ( 1973 ) मिळत असे. त्या प्रदेशात सिल्वर ओक जंगल मोठ्या प्रमाणावर आढळून येते आणि त्या जंगलाची मालकी स्थानिक कलशा लोकांकडे असावी ह्याबाबत पाकिस्थानी न्यायालयात वादप्रश्न प्रलंबित आहे.
      डिसेंबर च्या सुरुवातीला बुलबुल पक्षांप्रमाणे रंगीबेरंगी ड्रेस घालून डोक्यावर आणि मागील युरोपिअन स्त्रीयांसारख्या असणाऱ्या तांबड्या केसांवर पिवळ्या निळ्या लाल रंगाचा जाड धाग्यांनी विणलेल्या कापडाची ( लाल पिवळी निळ्या मणी ओवलेल्या ) खाली सोडलेली छोटी चादर आणि अंगावर तसाच रंगाचा घागरा असलेली स्त्रियांची ( तरुणींची ) जोडी नृत्य करताना तुम्हाला दिसेल. आश्चर्यचकित होण्याची ती वेळ नसेल कारण तो अनोखा प्रदेश रंगीबेरंगी पाने आणि फुलांनी बहरलेला चहूकडे झुळझुळणारे चित्राल नदीकडे जाणारे छोटे छोटे ओढे तुम्हाला जिवंतपणी स्वर्ग काय असतो त्याची अनुभूती याची देही याची डोळा देतील. त्या स्त्रिया साक्षात देवस्त्रीया आहेत आणि आपण एक शूद्र मानव आहोत की ज्यांनी लाज आणि शरम ह्यांच्या दबावाखाली आपली नैसर्गिक प्रेरणा दाबून ठेवली आहे. 
     अलीकडेच डॉ मोहम्मद शिफ अली यांच्या नेतृत्वाखाली कलशा लोकांची DNA टेस्ट केली गेली. सदर लोक हे ग्रीकांच्या DNA शी संबधित नाहीत त्यांनी असा निष्कर्ष काढला की सदर लोक हे इंडो - आर्यन आहेत. अफगाणिस्थान मधून आलेले हे लोक असून मूळचे इथले नाहीत. अर्थात हे निष्कर्ष अर्धसत्य असावेत असे प्रथमत : समजून येते. 
       कलशा स्त्रिया आणि पुरुष हे त्या भौगोलिक परिसराशी पूर्णपणे सामावलेले आहेत हे तुम्हाला दिसून येईल त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर मेंढ्या आणि मोठी मोठी कुरणे आणि त्यांच्या घराची कलात्मक मांडणी कलात्मक भांडी कलात्मक रचना आणि ते पाहण तुम्हाला एक अनोखा अनुभव देऊन जाते. कलशा स्त्रियांना निसर्गाकडून चिरतारुण्याची देणगी आहे ह्या स्त्रिया कधीही थकत नाहीत नैसर्गिक पिस्ता आणि अक्रोड मोठ्या प्रमाणावर ह्या प्रदेशात उपलब्ध असल्यामुळे आणि मक्याचे पिक ही मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्याने औषधी वनस्पती सगळ्या आजारांवर स्थानिक वापरत असल्याने ह्या लोकांच्या प्रकृतीवर निसर्गाने अक्षरशः तारुण्याची खैरात केली आहे. घारे व निळे डोळे आणि पूर्णपणे शुभ्र अंगकांती त्यांची ओळख युरोपियन ( व्हाईट इंडियन ) अशी जगभरात आहे. कलाशा लोकांचे वास्तव्य आता बंबुरीयत , रुमबुर , बिरीर ह्या प्रदेशात उरले आहे . एकेकाळी त्यांचे चित्राल प्रदेशासह हुंजा , गिलगिट , आणि मगाशी नमूद अफगाणिस्थांच्या पूर्ण प्रदेशात ( नूरिस्थांच्या पश्चिमेकडील प्रांतात ) त्यांचे मोठे साम्राज्य होते कदाचित हे सर्व प्रांत ऐतिहासिक काश्मीरच्या पूर्ण प्रांताशी संबधित अथवा एक भाग असण्याचा संभवास मोठा वाव आहे . त्यांचे हिंदू धर्मशी नाते काय ? ह्याबाबत त्यांच्या बहुदैवतावादी पूजापद्धती आणि रंगासोबत आणि रंगबेरंगी राहणीमान. साजिगोर , ' महानदेव ' , ' बलमन ' , दझालोक, इंगाव ,दस्तक हे पूजनीय देव असून पाकिस्थानी ह्यांना काफर ' कुफ्फर ' ( मूर्तिपूजक ) तसेच कलाशा व्हॅलीला ( काफरस्तान ) म्हणतात.
     कलाशा लोक हे हिंदूंप्रमाणेच खुप दिवसाचे बहुविध सण  साजरे करणारे आहेत. चिलमजोश ( मे महिना) , उच्छाव ( औगस्ट च्या शेवटी ) , पोह ( फक्त बिरीर व्हॉलीमध्ये ) , शामोस ( डिसेंम्बर मध्ये दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस चालणारा नवीन वर्षाच्या आगमनाचे स्वागत करणारा ) , हे सण ते मोठ्या उत्साहाने साजरे करतात. चिलमजोशी फेस्टिवल ला मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिकांची हजेरी असते. कलशा लोकांमध्ये अशा सणांमध्ये भाग घेणे जरुरीचे मानले जाते. ह्या सणांमध्ये तरुणी आपल्या पसंतीचा तरुण निवडतात आणि त्या तिथेच त्यांचा विवाह कलशा पद्धतीने लावला जातो. स्थानिक पाकिस्तानि तरुणांनी त्यात भाग घेऊन कलशा मुली फसवल्या गेल्याची प्रकरणांमुळे कलशा लोकांमध्ये ह्या सणांमध्ये फक्त कलशा लोक सहभागी होतील असा नियम करावा लागला.
      2004 च्या सुमारास लोवरी पास टनेल पुन्हा चालू झाल्याने त्या प्रदेशात पुन्हा पर्यटकांची वर्दळ चालू झाली इस्लामाबाद ते चित्राल फक्त ( 8 ते 10 तासात ) एका दिवसात पोहचणे शक्य झाले. तसेच पेशावर - नौशेरा - मर्दान - भटखेरा - तीनरेगारा - चित्राल असा मार्ग उपलब्द झाल्याने त्या प्रदेशात बहुसंख्य पाकिस्थान पर्यटकांची वर्दळ वाढली. थरारक वळणे आणि एक जबरदस्त आठवणीतील प्रवास म्हणजे गिलगित ते चित्राल हा, एक असामान्य प्रांताचे नैसर्गिक ठिकाण आणि नैसर्गिक स्थिती कैक काळ विकसित जगाला अनोळखी होती परंतु भारत स्वतंत्र झाल्यावर हिमाचल प्रदेश पाकिस्थांनी श्रीमंताना सुट्टीसाठी बंद झाला आणि त्यांचा ओढा स्वात मर्दांन ह्या प्रदेशात वाढला. आणि त्यातूनच ह्या कलशा लोकांच्या संस्कृतीची ओळख ह्या पाकिस्थान्याना झाली.
       कलशा लोक आणि त्यांचे राहणीमान त्यांची संस्कृती ही चित्राल स्वर्गीय प्रदेशाची शान वाढवतेय पण इस्लामी आतंकवादी आणि इस्लामी मनोवृत्ती ह्याच्या झळा ह्या प्रदेशाला न बसल्या तर नवलच. तेथील दिन मोहम्मद नावाचा कलशा म्हणतो ' हम यहासे खतम होने के कगार पर है , हा ये मुझे मालूम है ,एक दिन यहा हम नही बचेंगे," तो डोळ्यात मेलेली भीती आणि चिरल्या जाणाऱ्या वेदनेची जाणीव असलेल्या कोंबड्या प्रमाणे स्वतःच्या आणि आपल्या अपयशाची जाणीव आपल्याला करून देताना " वो हमारी लडकिया उठाते है क्योनकी यहा स्कुल मे उर्दू जुबान पढाइ जाती है, तो लडकिया उर्दू जुबान और अंगरेजी होके कमाने चली जाती है , और खुद की संस्कृतीको नीचा मानने लागती है और मुसलमान हो जाती है , " कलशा लोकांची कमी होणारी संख्या एक चिंतेचा विषय आहे आणि त्यांच्या मॉडर्न ( पाकिस्थांनि शाळेतील पाठयक्रम) शिक्षणपद्धतीमुळे आमच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होऊन कलशा संस्कृतीचे आणि नियमांचे पालन कमी कमी होत जातेय ह्या बाबत तो खंत व्यक्त करतो.
    आज कलशा व्हॅली आणि तेथील शेवटची उरलेली तीन ही गावे इस्लामी मनोवृत्तीच्या फटीत अडकली आहेत पश्चिमेकडून अफगाणिस्थान आतंकवादी, दक्षणिकडून पाकिस्थान तालिबान आणि उत्तरेकडून आणि पूर्वेकडून काश्मिरी इस्लामी कट्टरतावाद ह्या सगळ्या प्रहरात 2004 साली ह्यांची संख्या फक्त 3 ते 4 हजार इतकीच राहिली होती.  कलशा प्रदेशात त्यांची तीन देवळे वगळता आज ब्रूनथार मशीद , अहमदाबाद मशीद, मशीद मतंगी, जामिया मशीद , तुरीन मशीद, जामिया मस्जिद वडूस, रुमबुर गावात जामिया मस्जिद तर खुद्द कलशा व्हॅलीत जामिया मस्जिद , मस्जिद ए फातिमा जहरा अशा नऊ मशिदी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्थान च्या सहकार्याने उभ्या राहिलेल्या आहेत आणि ह्या मशिदीत बहूसंख्य पूर्वीचे कलशा लोक नमाज पढताना दिसतात. त्यांना कलशा जमात कुफ्फर असून त्यांच्यापासून दूर रहाण्याची प्रेरणा खुलेआम देताना स्थानिक उलेमा कुठेही कचरत नाहीत. कलशा संस्कृतीत मुसलमान पती व कलशा पत्नी ह्यामध्ये घटस्फोटितेला पुन्हा कलशा समूहामध्ये घेतले जात नाही ही मनोवृत्ती आपल्याला हिंदू धर्ममध्येही आढळून येईल आणि ह्या मनोवृत्तीमुळे बहुसंख्य घटस्फोटित स्त्रिया आपले जीवन कलशा घरी दुःखाने कंठताना दिसतात. ह्याबाबतीत बहुसंख्य युट्युबवरील डॉक्युमेंटरीज चित्र स्पष्ट करतात. 
       कलशा लोक दुसरे तिसरे कोणी नसून ऐतिहासिक हिंदू च आहेत ह्याबद्दल खात्री बाळगण्यास हरकत नाही बहुसंख्य ग्रीक योध्यानी अलेक्झांडर दि ग्रेट युध्द हरून परत गेल्यावर इथे राहिलेल्या सैन्यानी स्थानिक धर्म मनोमन स्वीकारला होता आणि ते ह्या मातीचे झाले होते असे बहुतांशी पुराण साहित्य सांगते आणि ते ह्या कलशा संस्कृतीतीशी तंतोतंत जुळतेय ह्यात तिळमात्र ही शनका नाही. जाताजाता काही सत्य आणि हिंदू धर्माशी निगडित काही स्पष्ट नावे जी मागाहून थोडी अपभ्रंश झाली असावीत अशी उद्युक्त करून समाप्त करतो ते म्हणजे उत्तरेकडून दक्षणिकडे कलाशा भौगोलिक स्थानातील प्रांताची नावे अनुक्रमे " कलशा  " बृन " , बतरीक ( बद्रिक), आणि शैखनंदाह ( शंखनाद: ) ह्या नावांवरूनही हिंदू संस्कृतीशी कलशा संस्कृती किती साधर्म्य राखतेय हे स्पष्टपणे दिसून येतेय आणि आपली ही ऐतिहासिक ओळख बहुसंख्य अज्ञानी हिंदूंना माहिती व्हावी म्हणूनच हा लेखनप्रपंच...

संदर्भ -
. डोकमेंटरी सॉरी सलिहा
. विकिपीडिया
. गुगल मॅप
. हिस्टरी ऑफ कुफ्फरस्थान - शॉर्ट डोकमेंटरीज

Comments

Popular Posts