पाकिस्थान एक विचारधारा
तारीख 06 जानेवारी 2025 नवीन वर्षाच्या या सुरुवातीच्या दिवसात कुंभमेळ्यात कथित मुस्लिम सचैल स्नान करुन पवित्र दिनी मुस्लिम धर्म त्याग करुन हिंदू सनातन धर्माचा स्वीकार करणार ही बातमी लोकसत्ता च्या तिसऱ्या पानावर वाचली.. या बातमीने मेंदूतला विचारी कोना जागृत झाला..
बंगलादेशात भारतातील पाकिस्थान उच्चायुक्तातील अधिकाऱी राहीलेले श्री. अब्दुल बासित यांनी ढाक्यात विमानतळाबाहेर जागोजागी दिसत असलेले “ मुजीबुर रेहमान यांचे अस्थीत्व आता राहिलेले नाही “ असे स्पष्ट विधान पाकिस्तानातील सना वृत्तपत्राच्या एका प्रसिद्ध वृत्तनिवेदिकेला दिलेल्या मुलाखतीत केले....
पाकिस्थानातील पख्तुंनख्वा भागातील ( KPK ) प्रांताचा काही भाग अफगाण तालिबान ने ताब्यात घेतला. आणि पाकिस्तान तालिबान ( तेहरिक ए तालीबान पाकिस्तान TTP ) यांच्यावर पाकिस्थान ने त्यांच्या प्रांतात TTP ला बॉम्बस्फ़ोटाद्वारे मारून केलेली कथित कार्यवाही ही त्यांच्या सार्वभौमत्वाला आव्हान ठरणारी आहे. ड्युरांड लाईन ते मानत नाही हे पुन्हा अधोरेखित केले..
ह्या तीनही बातम्या परस्पराशी वरवर संबंधित नसल्या तरीही त्याचा गाभा एकच आहे हे कोणीही मान्य करेल.. तालीबानीं आक्रमण पाकिस्तान च्या पेशावर प्रांतावर होणारच कदाचीत येत्या काही महिन्यात याची पूर्तता झालेलीही आपल्याला दिसेल पण या कृतीतून भारतीयांनी अफगाणांच्या कार्यवाहीवर हुरळून जाऊन चालणारे नाही.. जागतिक राजकारणात या घटनेला फार गंभीरतेने घेणारे आणि किरकोळ घटना म्हणुन पाहणारे दोंन वर्ग आहेत.. यातील एक वर्ग पाकिस्तान फक्त पंजाब म्हणुन उरेल, पाकिस्तान चे चार तुकडे होतील, आणि चीन चीं ग्वादार मधील गुंतवणूक डब्यात जाईल म्हणुन उत्साहीत आहे…
बांगलादेशातल्या घडामोडी याच्या अगदी उलट स्पष्ट होत असून अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्षांच्या डीप स्टेट ने त्यांच्या ईशाऱ्यावर न चालणाऱ्या शेख हसीना सरकारला उलटवून एक कळसूत्री बाहुले सरकार स्थापन केले आणि “ जमात ए इस्लामी “ नावाच्या संघटनेची हसीनांनी दाबुन ठेवलेली शक्ती पुर्नजागृत केली..
जमात ए इस्लामी असो वा तालीबान यांच्या अंतर्गत विचारसरणी एकच असून पंजाबी मुस्लिम संपणार म्हणुन आनंदाची उकळी ही क्षणभंगूर असेल.. तालिबानी रांनटी इस्लामिक विचारसरणी ही आधुनिक विचारसरणीच्या क्षणात चिंधड्या उडवण्याची शक्ती बाळगून असून तालीबान केंद्रीय सत्ता ही भारत विरोधी नसली तरीही आधुनिक विकसित मानसिकतेच्या विरोधी आहे हे विसरून चालणार नाही. पाकिस्तानी हे महिलांच्या बाबतीत इस्लामिक विचारधारे विरोधी आहेत आणि त्यांचा बिमोड करणे आवश्यक आहे हीच मानसिकता तालीबानी टोळ्यांची आहे. आणि ही विचारधारा ही पाकिस्तान विचाराचा एक गाभा आहे. याच पाकिस्तानी सरकारांनी रशिया आणि अमेरिका शक्ती विरोधात लढण्यासाठी कट्टर इस्लामी तालिमींमध्ये घडणारे तालिब घडवले आणि हेच तालिब आज त्यांच्या विरोधात उभे आहेत हे विशेष… पश्चिमेकडून तालिब विचारधारा आणि पूर्वेकडून बंगलादेशात जमात ए इस्लामी ने पोसलेली हिंदूविरोधी विचाराधारा या दोन्ही समविचारी वैचारिक शक्तींच्या एका घेऱ्यात आपण अडकत जातोय हे सहज स्पष्ट होते आहे.
या सगळ्या घटना या बुद्धिबळाच्या पटावरील एका शक्तिमान डावाच्या भाग आहेत हे सहज स्पष्ट आहे. अंतराष्ट्रीय डावपेचांचा एक विळखा आता मध्यपूर्वेकडून आशियात येऊ घालतोय.. हे या सगळ्या घडामोडीतुन समजून येते आहे.
तद्वत पाकिस्तानी विचारधारा ही पाकिस्थान नावाचा देश संपला म्हणुन संपणारी नाहीं तर ती अधिक आक्रळविक्राळ रूप घेवून नवी नवी आव्हाने निर्माण करेल आणि पुढेही करत राहील..
@Adv. H. D. Vaishampayan
08/01/2025
Comments
Post a Comment