इथून पुढे सुरुवात कर..

इथून पुढे सुरुवात केली

चाचपडत सावली नेली 

इथून पुढे ? कुठून पुढे ? 

प्रश्नांसंगे बुद्धी गेली 

तरी तू पुन्हा पुन्हा हेच आवाहन कर 

इथून पुढे सुरुवात कर ! 

इथून पुढे सुरुवात कर ! 


जखमा हृदयी , घाव गहिरे , 

आवाज गर्जविला, जन बहिरे,

विचारांची तूला , तुला समजलो 

नित्यनेमाने  पुन्हा अवघडलो 

तरी तू पुन्हा पुन्हा हेच आव्हान कर 

इथून पुढे सुरुवात कर ! 

इथून पुढे सुरुवात कर ! 


ते दिसतय, तन जळतय 

यश दुरावलय ,मन कळतंय 

रिकाम्या हृदयी शल्य सलतय

पाय घणाचे वजन नडतय 

तरी तू पुन्हा पुन्हा हेच आव्हान कर 

इथून पुढे सुरुवात कर ! 

इथून पुढे सुरुवात कर ! 


बस झालं , खूप झालंय 

इथून फिरून सार गेलंय

जड झालंय भार उचलून 

तुला न कळता वळत नेलय 

तरी तू पुन्हा पुन्हा तेच आव्हान कर

आता इथून पुढे तूच सुरुवात कर !

इथून पुढे सुरुवात कर ! 

 

@ Adv. H.D.Vaishampayan 


Comments

Popular Posts