केतकी
ती कोणाच्या वादात शक्यतो न पडणारी, आपल्या आयुष्यात आपल्या भावनांच्या लाटेमध्ये डोलणारी कोणाच्या अध्यातमध्ये नसणारी पण तरीही सगळ तिच्याच मागे का ? राहून राहून केतकीला हा प्रश्न सातत्याने पडत होता. सगळ्या मुलिंसारखी ती ही होती, तिच्यात काही वेगळ नव्हत. रोजची रामरगडा आवरून थोडा सकाळी उठायला उशीर झाला तरी आई इतकी ओरडणारी नव्हती तरीही कामाच्या व्यापाने तीच संध्याकाळी कंबरडं मोडून जाई. राजापूर सारख्या तालुक्यातील एका ब्राह्मण मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाल्यानंतर केतकीला एका राजकन्येप्रमाणे वाढावल गेलं. घरी आर्थिक स्थिती बेताची असली तरीही शेती पूरक कामे पूर्ण वर्षभर कायम चालूच, तळायचे गरे, वाळवण, कडबा, आमसुलं, फणस, आंबा ,काजू आणि त्यातल्या त्यात घरच्या सगळ्यांचं कामगारांसह जेवण नाश्ता ह्या सगळ्यात दिवस कधी संपायचा हे तिला कळतच नसे.. स्वतःकडे फार लक्ष देण्यासाठी पावसाळा वगळता तिला कधीच वेळ मिळाला नाही. वय 27 उलटून आता तिच्या शरीरयष्टीमधील नाजुकपण सरयला लागला होता ती आता भरभक्कम आणि उन्हाच्या झळा खाऊन विचारांनी हळू हळू भक्कम होत होती.
गोठ्यातली भारे काढून तिने ती एका कोपऱ्यात नीट रचून ठेवले ,बाबा ! अजून पाच सहा जास्त काढा हल्ली आता उन्हाळा आहे उमाला खूप गवत लागत, श्रीकांतने तीच आईकुंन अजून दोन तीन भारे वरूनच लोटून दिले, तिने ते उचलून ठेवले , सुयोग शाळेतून येईल त्याला आणायला सांगितल्यात कड्यावरचा चिंचा, केतकिला आठवल हे अचानक आणि ती घरी पळून गेली. श्रीकांतने गोठ्यातील आवराआवर करून घरी चहाची वेळ झालीय पाहून त्वरित कोपऱ्यातील झाडू जागेवर ठेवून निघाला. त्याला फावल्या वेळात नेहमी तंबाखू खायची किक यायची अशा वेळेला तो क्षणभर ही थांबत नसे चटकन जाऊन कोपऱ्यातल्या खणातील चंची उघडण आणि पिंक टाकण यासाठी तो एक क्षणही किमती वेळ समजून घाई करे. सुयोग ची बडबड आईकुन राजे आले वाटत , अशी मनातल्या मनातल्या स्वगत बोलून त्याने चनची उघडली. स्वतःच्या बायकोची रेखाची ठेंगणी मूर्ती पाहून त्याला उगाचच ती सुयोग सारखीच लहानपणी दिसत असावी अस वाटून गेलं.. " किती मस्त निसर्गाची करणी आहे , माणस सगळी आहेत पण कुटुंबातील माणस चटकन ओळखता येतात, ! साधारण चेहरेपट्टी सेम आणि शरीरयष्टी हि, हे मनात येवून श्रीकांत स्वतःशीच उगाच हसला, " अहो हसताय काय तुम्ही ? आणि अशा उन्ह उतारायच्या वेळी काय हो झालं तुम्हाला हसायला ? रेखा ला हल्ली उगाचच हे असले प्रश्न पडायचे, वय वाढत चालल्याचा हा परिणाम होता.
गावाच ठिकाण जन जनावरांची भीती यामुळे कोणी रात्री 8 नंतर बाहेर जात नसे. दिवसभर काम करून घरचे सगळेच थकल्यामुळे रात्री दिवा मालवेपर्यंत कोणीच जाग नसे ! दिवसाच्या शेवटचा दिवा मालवताना रेखा ला उगाचच भरून आलं. " केतकी , लग्नाच्या वयाची झाली असली तरीही तिला तीच लग्न चांगल्या पैसेवाला आणि स्वतःच स्वतंत्र घर असलेला आपल्या समाजातला आणि चांगली प्रतिष्ठा असलेल्या मुलाशी च ती लग्न करेल अशी तिने स्पष्ट कल्पना श्रीकांतला दिली होती. आपली मुलगी काही आपल्याला जड नाही ! मी पोसेन तिला लग्नच वय अगदी 32 पर्यंत संपत नसत आपल्यात मुल हल्ली खूप आहेत त्यामुळे ती नक्कीच अशी राहणार नाही. आपण थोड कळ काढू पण निर्णय चुकून तीच आणि आपल ही नुकसान नको. श्रीकांत रेखा च्या ह्या निर्णयाशी सहमत नव्हता पण त्याच लग्न झाल्यापासून फक्त तिच्या सुरात सुर मिसळण हेच त्याच्या सुखी संसरच रहस्य होत. दिवा मालवून ही उद्याच्या विचारांनी दोघानाही चटकन झोप कधीच लागत नसे. अखेर ह्या डोंगरदऱ्यात निर्जन गावात राहताना दोघांनाही असेच मानसिक शारीरिक घाव पचवण आवश्यकच होत.
गुरवाची शिटी आईकुंन सुयोग नी ही त्याला तसाच प्रतिसाद दिला. सकाळी उठून गुरवाच्या किटलीतल दूध ओतून घेवून केतकी ने आईला उठवल आणि नेहमीप्रमाणे दुध गरम करायला चुलीवर ठेवलं.. आज अक्षय ने तिच्याकडे पाहिलेली नजर तिला आठवली. कसाही असला तरी त्याचा इमानिपणा तिला थोडासा आवडू लागलेला आणि त्यातही तो मुद्दामून पण माहिती नसल्यासारखं अर्धा पाव लिटर दूध जास्तच ओते. ती ही सुरुवातिला त्याच्या लक्षात आणून देत होती पण आता हे नेहमीचच होऊ लागल होत. अक्षय तिला मनोमन भावला कारण त्याने तिच्याकडे आज 7 8 महिने ओळख होऊन सुधा नंबर मागितला नाही अथवा तिने तो दिला नाही. सकाळी एकदा नजरेला नजर मिळाली की दोघांची तीच सुरुवात होत असे. आज तिला सगळ आवरून राजापूर ला टायपिंग कलास ला जायचं होत. तिचे हल्ली केस ही खूप गळायला लागले होते. विद्या कडून शिकेकाई आणेन अस तिने ठरवून ही तिला ते जमल नव्हत. श्रीकांत नेहमीप्रमाणे काजू बिया गोळा करायला निघून गेला. बाबा आमचा वेळेत जातो सकाळी 6 वाजले की बाबा गेला .. केतकिने हे रेखा ला हळूच कौतुकाने सांगितले. हो ग, तुला बर ग कौतुक त्याच ! आणि माझ ? .. केतकी हळूच आईकडे बघून हसली ! आई माझा बाबाच ग्रेट शेवटी , रेखा ने कौतुकाने हात उडवला , हा जा तु अंघोळीला जायचं आहे ना राजापूर ला ? केतकी चटकन आपल आवरायला पळाली.
टायपिंग क्लास ला तिची कायम हजेरी होती मैत्रिणी कितीही होत्या तरी तिच्या सोबत जुळवून घेईल अशी एकही नव्हती 3 महिन्यांचा क्लास नुकताच सुरू होऊन आता कुठे तिची बोट हळू हळू चालायला लागली होती. " की - बोर्ड टायपिंग असेल तर मी एडमिशन घेईन " , नाही आमच्या इथे आता की - बोर्ड च . आता टायापिंग मशीनचा जमाना गेला , ! केतकीला आवाज ओळखीचा वाटला, सकाळी तो परिचित शिटी मारून दूध देणारा गुरवाचा अक्षय. ! केतकी अचानक मनोमन सुखावली, तिला आतून एक वेगळाच आनंद झाला, अस आपल्याला काहीतरी अचानक गवसाव की जे आपल्याला हवंहवंसं वाटावं आणि अवचित ते समोर आल्यावर जी गोंधळाची स्थिती होते तशीच तिची आता मनोअवस्था झाली होती. अक्षय ने प्रवेश घेतला होता ह्याचा तिला मनोमन आनंद झाला संध्याकाळी पाच वाजता निघताना तिने हलकेच मागे बघून घेतल, चांगलाच मजबूत होता तो, लांब हात आणि जाड बोट, घोगरा आवाज अगदीच काही काळा नव्हता तो, सावळा पण नाही हा रंग, बाबा करतो भरपूर दूध टाकून चहा तेव्हा जो रंग येतो तोच ह्याचा रंग आहे. ती मनोमन असा विचार करत असताना तीच एक मन ही तिला अडवत होत. पण तिचा आतला तो आवाज तिला पुन्हा पुन्हा त्या विचारात खेचत होता.
संध्याकाळी ती त्याच विचारात घरी आली. संधिप्रकाशातही आपण चालतोय अंधार पडेल काही वेळाने तरी आपण सहज घरी पोहचू पण मग आई का संधिप्रकाशाची वाट पाहतेय आपल्या ? काहीतरी वेडेगबाळे विचार तिच्या मनात असेच हल्ली यायला लागले होत, एकटी असली की ती स्वतःच्या विचारात कायम गुंग होत असे, " काय ग ? एसटी लेट झाली की ? " आज थोडा तुला उशीर झालाय ! रेखा नी तिला दारातच टोकल, हो अग आई ! हल्ली 15, 20 मिनिटे काही दिवस झालेत एसटी लेटच लागते अग ! श्रीकांतने घर झडायला घेतल होत , " बाबा ," माझ्या जुन्या सँडल आहेत त्या टाकू नका ! केतकीचां नैऋत्य दिशेने आवाज, बाबा ! " माझ्या जुन्या खेळणी आणि ती गाडी टाकू नका, त्या खालच्या आळीतल्या श्रेयस ला द्यायच्या आहेत ," सुयोग चां इशान्येकडून आवाज, श्रीकांतने दोघांकडे साफ दुर्लक्ष केलं, उद्या केतकिला पाहायला माणस येणार होती. कितीही ह्या मुलांच्या जुन्या वस्तू साठवून ठेवल्या तरी त्यांच्याकडून ते वापरण होत नाही , आणि कोणाला देणं ही होत नाही, सगळ्या वस्तू एका गोणात टाकून तो ह्या पावसाळयात नदीत सोडणार होता.
" आम्हाला मुलगी पसंत आहे," पण ! एक वरिष्ठ थोराड दिसणाऱ्या व्यक्तीने सहज पहिल्यक्षणी सांगून टाकले, त्याच्या बाजूला बसलेला मुलाचा बाप दिसणारा , काहीसा घाबरट असावा किंवा त्या थोराड माणसाच्या प्रभावाखाली असावा अस साधारण दिसत होत , केतकिला, " थोराड माणूस तो मुलाचा चुलत मोठा काका तर मुलाचे त्याच्या बाजूला बसलेले वडील, मुलाचे काका कोथरूड पुणे, वडील आणि काका यांचे आजूबाजूला वेगवेगळे फ्लॅट होते , कुटुंब बऱ्यापैकी सधन दिसत होत त्यांच्यात एकच मध्यमवयीन बाई बाकी दोघी काही दिवसांच्या सोबती असाव्यात अस पाहताना वाटत होत. केतकीला त्या म्हाताऱ्या च्या मिशा अजिबात आवडल्या नाहीत. त्यांची टोक अशी विळखा घालत तिला टोचत आहेत अस उगाचच तिला वाटल. " अरेंज मॅरेज म्हणजे अगदी आउटडेटेड कन्सेप्ट आहे ", तिच्या डोक्यात विद्या चे शब्द घुमत होते, तिने जरा ते विचार बाजूला ठेवून उगाचच त्या मध्यमवयीन पुरुषाच्या बाजूला बसलेल्या मुलाकडे पाहिलं, बिचारा कोणीतरी पकडुन आणून ठेवलेल्या फ्लावरपॉट प्रमाणे स्थिर बसला होता. त्याला काहीतरी बोलायचं असावं असं तिला वाटतं होत, चांगला गोरा, उंच बऱ्यापैकी आणि थोड राहणीमान नीटनेटक वाटत होत पण त्याची नजर थोडी बावळी होती, तिच्या मनात उगाचच आलेलं हसू दाबून आईच्या इशर्याने आत पळाली ती, श्रीकांतने त्या टोकदार मिशिवाले यांचा " पण " पासून पुढे सुरुवात केली, " काका ", पण काय ? , पण मुलगा मुलगी कुटुंबापासून वेगळे राहणार नाहीत , फ्लॅट जोडलेले आहेत कुटुंबात राहावं लागेल ! रेखा ला अजिबात हे अवडल नाही , " मी गावात येवून ह्यांच्याशी संसार केला ! कुटुंबात राहून शेती होती म्हणून सासू सासरे यांची मदत होत होती, पण शहरात शेती नाही ! माझी मुलगी सासू साऱ्यांचे उष्टे काढणार काय ! " हरकत नाही काका " आम्ही कळवतो तुम्हाला ! रेखाचा स्वर श्रीकांतच्या लक्षात आला. तो काही तिच्या शब्दाबाहेर नव्हता. शेवटी सगळ्यांची पांगापांग झाली चार चांकी ने पाहुणे गेले, अच्छा बाय बाय ची आवरतने झाली.
टायपिंग क्लास करता करता परीक्षा जवळ आली तरी हीचा हात बसलेला नाही, भिंगार्डे सरांचा आवाज तिच्या कानाजवळ च किंकाळला. ते मागूनच पाहत होते तिची थरथरणारी वेंधळी बोट तिचा टायपिंग वेग दाखवत होते. आज तिला कीबोर्ड ची बटनच सापडत नव्हती. बाजूला अक्षय ने तिला धीर दिला " हळूच सर पाहतायत अजूनही " म्हणून कोपर मारून तिला अलर्ट केलं. स्त्री किंवा मुलगी तीच्या मनाचा कौल कोणाला ! हे साक्षात् ब्रह्मदेवाला ही सांगता येणार नाही, सगळ्या स्पर्धा जिंकण शक्य आहे पण मुलगी जिंकण नाही, तुम्ही बाकीच्या सगळ्या टॅक्टिज वापरून तुम्ही जिंकाल ही तिला, पण टिकवण भयंकर कठीण, अक्षय ची हीच धारणा होती, केतकी ब्रह्म्हण असली तरीही जातीची त्याला अडचण वाटली नाही. त्यांच्यात मुली कमी आहेत ह्याची सहानुभूती ही त्याला वाटली नाही. तिचा कौल माझ्या पारड्यात असेल तर मला हे दिव्य निभवाव लागेल, अमच्या समाजातली असावी असा दंडक त्याला त्याच्या घरच्यांनी आखून दिलेला नव्हता. मी माझ्या जीवनपद्धतीने जगणार, संस्कार वैगरे ते तुझ तू बघायचं , केतकिला त्याने बजावलं होत. मी तुला सोडणार नाही , आपण प्रेम निभवायच बास्स , दोघांनी ठरवलं होत. केतकिंलां त्याच घर कस आहे ! घरची माणसं कशी आहेत ! ह्याची काही एक फिकीर नव्हती, लहानपणापासून लाडाकोडात वाढलेली ती, घरामध्ये समृध्दी होती यामुळे तिला काही कमी नव्हती, पण जे तिला हवं ते ती मिळवणारच , नाही मिळालं तर त्रागा करणार पण मिळवणार हा तिचं अंगवळणी पडलेला गुण होता. अक्षय ने ही खूणगाठ बांधली, शेवटी साथ तर द्यायला हवीय मला ही… अक्षय च्या पुन्हा एकदा टोचलेल्या कोपराने तिला उगाचंच डिस्टर्ब केले, चल निघूया , त्याच्या नजरेतील खूण तिने ओळखली आणि दोघांनीही दोन दोन सेकंदाच्या फरकाने तिथून पोबारा केला.
श्रीकांत आईकतोयस का रे ! आडव्या बांधवरचा बळवंत जोश्या च्या पुकारणीने श्रीकांतने कोकम सोलणे थांबवले , अरे ती केतकी बघ कोणत्यातरी पोरासोबत अड्यावरच्या चिंचेखाली बसली आहे " श्रीकांतचे मस्तक तडकल, कांनाफाट लाल झाली, त्याने तडक ही गोष्ट घरी जाऊन रेखाच्या कानावर घातली, " माझी मुलगी अस करण कदापिही शक्य नाही, बळवंत भावजी, तुमच्या मुलीसारखी ती, शोभत का तुम्हाला , तुमची मुलगी गेली पळून म्हणून तुम्ही आमच्या केतकीच्या बाबतीत काहीबाही बरळता काय ? बळवंत ने रेखाचा चंडिका अवतार बघून विद्युत वेगाने पोबारा केला, " आइजो नसती लफडी, च्यायला नीट सांगायला जाव तर हे ह्यांचं भलतचं ,,, बळवंत स्वागत बोलून त्याचे " ह्यांचं भलतचं " हे शेवटचे स्वर श्रीकांतच्या कानी पडले, " येवू दे केतकिला तिला विचारतोच, " काही विचारायचं नाही तिला, बीचारी पोर बावरी आहे तिला उगाचच टोकून ती हातची जाईल आपल्या , रेखाने भरलेल्या दमाने श्रीकांत निमूट झाला, त्याला अचानक कोकमची सोलयची आठवण झाली, त्याला यंदा पाच किलो आमसूल पुण्यात पाठवायची होती , ह्या वर्षी त्याला बेगमी करून किमान पन्नास हजार बचत करायचे होते केतकी साठी,
" मुलगी शिकली , शहाणी झाली आणि समृध्दी आली, " शेजाऱ्याच्या कुत्सित स्वर तिला त्रासदायक वाटत होता, समृध्दी च आपल्या मुलीचं सगळ एकटीला आवरताना तिच्या कंबरेच दिवाळ वाजलं होत. उगीचच तिने आरशात स्वतः बघितल, चार चौकोनाचा बॉक्स असलेलं तीच घर , आणि पिंपरी चिंचवड महानगरपलिकेत कंत्राटी तत्वावर लागलेला अक्षय , त्रिकोणी कुटुंब सावरताना तिची दमछाक होत होती, शेजारच्या दामुची म्हतारी कौसल्या समृध्दी ला मालिश करायला येत असे तेवढ्या बाबतीत तिला तिचाच आधार होता…. " दोन वर्ष झाली गाव सोडून , अक्षय सोबत पळून आल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी तिला गावची अपल्या बाबांची आईची प्रकर्षाने आठवण येत होती, जाणारा काळ झट झट जात होता, तिच्या डोक्यावरचे केस ही पातळ झाले होते, अक्षय ची बेताची कमाई त्यातच तिला सगळ भागवाव लागत होत.. घर सोडल्यानंतर घराचे धागे ही तिने तोडून टाकले, निर्दयी भावनेनं ,जे होईल ते माझ होईल, किती दिवस घरचे मुल पाहत राहणारेत, संसार मलाच करावा लागणार आहे, माझे घरचे आणि मुलाच्या घरचे का संसार करणारेत! उगाचच दातखिळी दाबून तिने आपल दुःख आतमध्ये गिळून टाकल, " मी आहे माझ्या विचारांची पक्की, मी मार्ग निवडला कसा का असेना जोडीदार आहे , मी आहे अशी अशाच अवस्थेत राहिली तरी निभावून नेईन संसार पण एखाद्या जत्रेतील देखणी बाहुलीप्रमाणे बघायला येणारे नवे नवे लोक आणि नटून थाटून त्यांच्यापुढे उभ राहून एकमेकांना आशा लावत बसायचा तिला मनोमन कंटाळा आला होता… आपल्या बाबाचे लग्नाचे पैसे वाचले , आपल्या आईच्या रेखाच्या डोक्यावरचं टेन्शन उतरलं असेल, सुयोग होईल मोठा त्याची वाढ का थांबणारे, तिच्या मनात रिकाम्या क्षणी हे विचार येत होते कारण आता तिला माहेरच्या घरच्या कामांमध्ये वेळ घालवण पुन्हा शक्य नव्हत , पुढे घेतलेलं पाऊल ती मागे घेणार नव्हती आणि घड्याळाचे काटे उलटे फिरवण म्हणजे आपल्यासोबत दोन जीवांची होलपट करण तिला ही योग्य वाटत नव्हत… जुन्या पुस्तकाची पान उलटताना तिला मागच्या भांवनांची मनोमन आठवण येत होती, पण त्या पानांचा चिरपरिचित सुगंध आता कायमचा दुरावला होता… कायमचा दुरावला होता.....
06/05/2023
@hrkvaishmpayan
Comments
Post a Comment