निष्ठुर क्षण

निद्रिस्त त्या वेदना
निद्रिस्त त्या भावना
शब्द संपूनि भस्म व्हावे
निद्रिस्त ती ममता

निद्रिस्त ते क्षण जणू
निद्रिस्त ती काया
मौन मौन आणि निद्रिस्त मौन
जग हे सदा सुस्त
निद्रिस्त ती क्षमता

ऐकतोय हा राग
ऐकतोय ती विफलता
जाणवतेय ती फोलता
निद्रिस्त त्या शनका तिच्या
निद्रिस्त ती छाया
मृत्यू येईल निद्रिस्त क्षणी
निद्रिस्त तरीही ही भावना

ओलांडून निद्रिस्तपन
जाऊ त्या किनारी
जाऊ व्यक्त करू ती आकांक्षा
निद्रिस्त क्षणी मृत्यू येई
निद्रिस्त त्या आशा
निद्रिस्त राहितील त्या निराशा ।।
@हृषीकेश 05/09/2017
  08.25 Pm

Comments