मराठा तितुका मेळवावा देव तेथेचि जाणावा ।।

निष्ठा मावळ्यांची
निष्ठा मराठ्यांची
विकली नाही कधी
विकणार ही नाही
आम्ही मावळे शिवरायांचे
झुकणार ही नाही कधी ।।

डोंगर कडे कपार्या
आम्ही झिजवल्या
नीती आणि अनितीचे
पाठ आम्ही गिरवले
छत्रपतींचे मावळे आम्ही
आम्ही जगाला युद्धनीती
शिकवल्या
निष्ठा मावळ्यांची
निष्ठा मराठ्यांची ।।1।।

लक्ष तेज पाहिलं आम्ही
पराजयाचा अंधार ही पहिला
म्लेंछ मुसले किती कापले आम्ही
अंती घरभेदीही ही पाहिले
पेशवा तो एकनिष्ठ सरदार ही पहिला
अटकेपार पठाणांचा खुरदा ही पहिला
हरलो तरी पाठ टेकणार नाही आम्ही ।।2।।

बस झालं आता
आता घरभेदिंचे निष्कसनच
लढून थकलोय आता आम्ही
नको हे समाजशाही शासन
नको आम्हाला मान
नको आम्हाला राज्य
छत्रपतींसारखे राज्य पुन्हा मिळावे
हेच आमचे सुस्वराज्य ।।3।।
@हृषीकेश   12.41 PM

21/01/2018.....

Comments