निष्ठुर ती....
ती स्वप्न कधी होती,
कधी ती मृगजळ होती,
स्वप्नातल्या गभारातल्या ओबडधोबड
आठवणींसारखीच ती होती,
ती होती ध्रुवतारा अन
धबधब्यासारखी अखंड वाहणारी
स्वप्नसगरात विहार करणारी जलपरी ती होती,
निशब्द शांततेतला पायरव
ती होती,
स्वप्नातलं चांदण
ती होती,
मनामधली अखेरची आशा
ती होती,
ती होती एक भेडणारा
हुंकार
माझी सृष्टी बहरणारी
जीवनात वसंत आणणारी
नशिबाला सुवर्णझळाळी देणारी
ती होती ,
ती होती जीवनाची सुरवात
माझ्या
अखेरही तीच ठरली
अश्रूभरल्या डोळ्यांचा माझा
अखेरचा आधारही तीच हरली,
नित्य माझी सावली
ती होती
ती होती सकाळ माझी
जीवनाची काळरात्र ही
तीच ठरली
तीच ठरली
@हृषीकेश 11.13 Pm
10/01/2018.....
कधी ती मृगजळ होती,
स्वप्नातल्या गभारातल्या ओबडधोबड
आठवणींसारखीच ती होती,
ती होती ध्रुवतारा अन
धबधब्यासारखी अखंड वाहणारी
स्वप्नसगरात विहार करणारी जलपरी ती होती,
निशब्द शांततेतला पायरव
ती होती,
स्वप्नातलं चांदण
ती होती,
मनामधली अखेरची आशा
ती होती,
ती होती एक भेडणारा
हुंकार
माझी सृष्टी बहरणारी
जीवनात वसंत आणणारी
नशिबाला सुवर्णझळाळी देणारी
ती होती ,
ती होती जीवनाची सुरवात
माझ्या
अखेरही तीच ठरली
अश्रूभरल्या डोळ्यांचा माझा
अखेरचा आधारही तीच हरली,
नित्य माझी सावली
ती होती
ती होती सकाळ माझी
जीवनाची काळरात्र ही
तीच ठरली
तीच ठरली
@हृषीकेश 11.13 Pm
10/01/2018.....
Comments
Post a Comment