कालियुगी मानव.

मी कुठे जाऊ ?
रक्ताळलेले माझे हात
भंगलेले माझं हृदय
स्वार्थी विचारांचं माझं ओझं
काळ डागाळलेले माझे हात
आणि प्रामाणिक मन
कुठे जाऊ मी हे घेऊन ?
मी कुठे जाऊ?

कुसंस्कारात वाढलो मी
दैत्यांत राहिलो मी
स्वार्थी खेळात जिंकलो मी
कैक भावना पायदळी ठेवल्या मी
मी मानव नाही
असुर आहे
मी दैत्य आहे आणि दानव आहे
ओघळलेले अश्रू माझे
मगरीचे आसू आहेत
क्षणिक सुखास आभासी आहेत
प्रामाणिक मनाचं ओझं आहे
प्रामाणिक पश्चतापाचे क्षण घेऊन
मी कुठे जाऊ ?
कुठे जाऊ मी ?

आधार द्यावा कोणी
त्या लायक मी नाही
निराधार करावं कोणी
तेवढा गरीब ही मी नाही
लाथाडाव कोणी
तितका निलाजरा ही मी नाही
जितका अहंकार तितकाच
तितकाच पश्चाताप,
अहंकारासंगे जगतो मी
अहंभावासंगे लढतो मी
मित्र आप्तांस स्वार्थसंगे खेचतो मी
मग
पापी क्षण , प्रामाणिक मन घेऊन
कुठे जाऊ  मी ?
जाऊ कुठे मी ?
@हृषीकेश  29/01/2018
   9.45 AM ....

Comments