माफीनामा पाश्चातापाचा ...

वेष, द्वेष , अवगुण झिडकारले कोणी
नाही संत कुणीच
नाही संत कुणीच ।।
जगावेगळं आम्ही नव्हतो
संस्कृती आणि कृतीत ही आम्ही नव्हतो
झाडावरच्या फळासाठी भांडणारे
आम्ही होतो पामर
अंधार गेला की प्रकाश येतो
वृत्ती स्वछ नाही कधीच
एक दिली की दोन मिळतात
ही सृष्टी प्रेमळ नाही कधीच
मातीसाठी भांडणारे आम्ही
मातीच्या तिच्या प्रेमापोटी भांडतच नव्हतो
तिच्या उरावरची बांडगुळ आम्ही
तिच्यातल्या पोषणासाठी भांडत होतो
वेष, द्वेष , अवगुण झिडकारले कोणी
नाही संत कुणीच
नाही संत कुणीच ।।
श्रम कर्म करतोय तो
निःस्वार्थी नाही कुणीच
वर्षा मागून वर्षे गेली
निसर्गाची दशा केली
स्वार्थ हाच नियम मरेपर्यंत पाळणारे
"ती" निर्मित नरपशु आम्ही होतो ।।
होय
तेच नरपशु आम्ही होतो ।।
@हृषीकेश।  8.12 pm  14/01/2018....


Comments