मनानी मळका माणूस.

अरशातले ढंग माझे
अंगावरचे शुभ्र कपडे
नेता शूद्र जाहलो
नीती माझी शूद्र,
चरित्र माझे शूद्र,
आधार फेकला स्वार्थ जपला
संकटी मी त्यालाच टेकलो
मी न माझा राहिलो ।।
आप्त माझे ,
पैसा त्यांचा ,
एकास एक वाढविला
खाल्ले तीन चार
दाखवले एक निम्मे
मित्र माझे सद - मित्र माझे
त्यांसवे अनितीमत्तेचा एक्का वाढविला,
सत्तेचा डाव मांडला,
स्वार्थाचे शूद्र संगीत नेहमीच गायिलो
मी न माझा राहिलो ।।
@हृषीकेश 9.48   28/08/2017

Comments