अ'बोल' थट्टा.

का बोलत नाहीस
अनोळखी आहोत म्हणून
का पाहत नाहीस
अनोळखी आहोत म्हणून
कारण तर शंभर आहेत
नको समजू मला हलका
नको समजू दुर्लक्षित
शब्दाचे वार पेलेंन हजार
पण "मौनाचे" नाही .
का बोलत नाहीस
अनोळखी आहोत म्हणून ?
एका सृष्टीतील आपण जीव
मी मंगळवरचा तर नाही
दोन हात दोन कान डोळे दोन आहेत
मी चंद्रावरचा तर नाही
दुलक्ष केलं तर राग नाही येत
पण करण सबळ नाही तर
राग आणि क्रोध ही येतो
समजून समजून थकेन
पण मौन नाही तुटणार तुझं
शब्दांनी शस्त्राला धार येईल
पण लक्ष नाही वेधणार तुझं
इतकं ही असू नये कोणी
क्रूर आणि सणकि
मीच येतोय पुन्हा पुन्हा
माझ्यात च आहे बहुदा माणुसकी
का नाही बोलत माझ्याशी
का नाही ????
@हृषीकेश 9.55 Am.
06.12.2017...........

Comments