औट घटकेची ओळख..

मान आहे तुमचा
आदर ही आहे
चहा नाही पण आमच्या
भावना गरम आहेत.

खोटा नाही मी
खरा ही पूर्ण नाही
आयुष्यभर एकत्र राहूनही
ओळखत कुणीच कुणाला नाही

थोड्या संभाषणांनी
मर्यादा ओळखीच्या
ओलांडू नका
मी आहे तुमचा
माझ्या अवस्था ताडू नका

मैत्री मर्यादा ओलांडली की
प्रेमाचा काठ लागतो
संपत्ती अभिलाशा संपली की
वैराग्याचा स्पर्श होतो

झीज होऊदे मनांची
क्षती उरु दे क्षणांची
चुकलं असेल काही
तर
मिती स्मरु दे आठवणींची ...
@हृषीकेश  14/01/2018   12.03...

Comments