प्रवास माकडमागून माणसाचा..

ती एक समर्थ स्त्री होती
एक स्वतंत्र विचारांची
एक खुल्या वातावरणात जगणारी
सौन्दर्यवान नाही पण सशक्त नारी होती
ती एक ती होती ।।

ती तिने शिकवल्या भावना पुरुषयाला
तिने शिकवले संस्कार त्यांना
ती प्रेमाच्या असमंतातली अभेद्य किनार होती
ती एक ती होती

ती होती म्हणून तो होता
तिच्या सानिध्यात तो स्वत्व आणि पालकत्व शिकला
जबाबदारी उरावर घेऊन स्त्रीला साथ देऊ लागला
रानटीपण त्याच वैशिष्ट्य होत
मायाळू पण तीच वैशिष्ट्य होत
कळपातील वाद तीच्यामुळेच वाढायचे
कळपातील वाद तिच्यामुळेच मिटायचे
मानवाला गुण आणि कलेच योगदान देणारी ती
ती एक ती होती ।।

बरोबरी तर ह्या आधी पण नव्हती
त्यांनतर ही नव्हती
शेती संपली शहरात
पैसा आला शहरात
भावना आटली शहरात
प्रेम विकतचे ते शहरात
बरोबरी तिथेच आली
शरम आणि लाज तिची तिथे विकली गेली
बरोबरीसाठी लढणारी शेवटी तिच्यातली तीच नाही उरली

ती एक
ती होती तीच होती ती होती ...।।
@हृषीकेश  26/09/2017 .. 7.00 PM

Comments