अनोळखी ऋणको ..

"जेव्हा संरक्षक कुंपण शेण खात" सकाळीच सकाळी ह्या चार न्यायाधिश्यांच्या बंडाची बातमी वाचली. सरन्यायाधीश मान. श्री मिश्रा ह्यांच्या बाबतची ह्यांची नाराजी वाचली.वाईट वाटलं.कायद्याचा विद्यार्थी म्हणून आम्हाला सर्वप्रथम "एथिक्स अँड प्रिन्सिपलस" चे धडे शिकवले जातात.
विषयच गांभीर्य म्हणजे
सदरहू न्यायाधीश काँग्रेस कारकिर्दीत निवडले गेलेत आहेत आणि सरन्यायधीश मान. मिश्रा ह्यांनी शीख दंगलीची फाईल पुन्हा उघडण्याचा हा परिपाक असावा त्यामुळे काँग्रेस ची हवा निघून जाण्याची दाट शक्यता दिसून येतेय. किंबहुना आपल्या धन्याच्या चाकरिस शेपूट हलवून साथ द्यावी असा हा प्रकार असावा...
फार चुकीचं वाटलं, जनमानसात कायदा आणि शांततेविषयी कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही ह्याची काळजी विधीतज्ञानानि घेणे असा संविधानकर्त्याना अपेक्षित आहे, आणि त्याच्या बचाव करणाऱ्या स्थम्भानी घेतलेली ही भूमिका संशयास्पद आहे..
ह्याची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर सरन्यायधीशानी महाभियोग चालवावा.
जनता ह्या निर्णयाला नक्की साथ देईल..
@हृषीकेश .
11.30 PM  13/01/2018......

Comments