मी .

पाहतोय मी आकाशातले तारे
अनुभवतोय मी स्वार्थाचे वारे
स्वप्नरंगी रंगलो मी ,स्वार्थात दंग मी 
मी मम जगात, अन हिशोबात दंग सारे , 

नावीन्य नसे स्वप्नाला 
काही अर्थच नसे आयुष्याला 
किड मुंगी सम आयुष्य माझे 
अंत च नाही कष्टाला 
संचारला क्रोध , तो ही नसे जुना
संचारला वेग , तो ही नसे आवेग
भ्रमित पुन्हा , 
इकडून तिकडे गेले सारे ।।

भविष्याची चिंता समोर दिसते आता
शिक्षण बोजड झाले
आशेला देताना पाय अवजड झाले 
धुंदीत स्वप्नांच्या चालतो मी 
दूर दिसे दिवा आशेचा, धावतो मी
खटपट बघून मम पांगळ्याची 
हसतात मम सारे  ।।

लढणार मी लढणार आता
ध्येय दिसतेय समोर ते गाठणार आता
चिंता नसे वयाची न वित्ताची
वाहणारा पतंग पकडणार मी आता
स्वप्न माझी दिशा राहील 
मन माझे गुरू 
मित्रश्रेष्ठ मागे राहतील 
ध्येयासाठी वाटचाल एकट्याने सुरू
अंती ध्येय गाठताना पाहतील सारे ।।

स्वप्नरंगी रंगलो मी ,स्वार्थात दंग मी 
मी मम जगात, अन हिशोबात दंग सारे  ।।
@हृषीकेश  31 /01/2018 
  9.33 AM ...

Comments