निराश खेळ

प्रेमाचे क्षण हरपले
प्रेमाचे मोती उधळूनि गेले
सावरते क्षण उगाळून आले
हरवली प्रेमाची दिशा
भेटीचे भान नाही उरले
रागाला अंत नाही स्मरले
प्रीतीचे गुण अंधारले
मिटल्या दाही दिशा
मृगजलच्या नादि लागलो
भूतलावरील न्याय विसरलो
अनत तंत्र नेस्तनाभुत झाले
फसवेपणापुढे
हाती घेतली वाळू
भुरभुरली क्षणभर
भान ते ना राहीले
जिंकल्यावरी
का हा अपेक्षाभंग
का हा स्वार्थी खेळ
फसलो तरी खेळलो
हा जगावेगळा खेळ
नाही पणती नाही दिवा
ना ही प्रेमाचे तेल
स्मरले ते ना दिसले
हा जगावेगळा मेळ
ईश्वराचे दान
हा सारा ईश्वरी खेळ
इमान राखणे हा संस्कार इश्वराचा
हा सारा अप्रामाणिक खेळ ।।
@हृषीकेश  २४/१०/२०१७
९.३० PM....

Comments