दिवास्वप्न धर्माच..

गणपती उत्सव सध्या उत्तरार्धात आलाय
काही किस्से उशिरा आठवतात कदाचित त्यामुळे ते आपलं महत्व गमावतात असो
गणेशोत्सवात आरतीची नेहमीच धमाल असते वेगवेगळ्या स्वरातल्या आरत्या ऐकून कधी कधी खूप हसू येत तर कधी कीव वाटते..
अशीच एकदा गणपतीच्या चौथ्या दिवशीची आरती चालू असताना अचानक एक अनोळखी मुलगा आमच्या दारी आला हा किस्सा साधारण 7.30 च्या  आसपासचा
तो आला आमच्यात सामील झाला आरती ही छान म्हणत होता...
हाल्फ पॅंट आणि टी शर्ट अवतार थोडा गबाळा वाटत होता आरती झाली आणि थोडा वेळ बसला कुठून आलास तर शेजारच्या वसतिगृहातून आलोय अस म्हणाला. प्रसाद घेतला त्यानं आणि जेवायला नको अस म्हणून निघून गेला..
मनात आलं खरच आपण हिंदू आपल्या सणांमध्ये आनंदामधे सामील होतो का ?
हा कोण कुठंचा मुलगा आरती चालू होती म्हणून आत आला,,,
कदाचित आपण स्वतः असतो तर गेलो असतो का कुणाच्या घरी ?
कुठेतरी चुकलोय आपण किंवा चुकतोय आपण ह्या सणावाराचा गर्भित अर्थ मागे विसरलोय आपण स्वार्थ आणि परमार्थ ह्यामध्ये खूप मोठी भेग ठेवलीय आपण,
असो मतितार्थ हा की आपण एकमेकांच्या साथीन स्वार्थ आणि जातीभेद अर्थभेद आणि असमानता त्यागून  सणांचा आनन्द घेणं आवश्यक आहे तरच हा "हिंदू"ताठ मानेने एकी त सामर्थ्य प्राप्त करेल..तरच आपण धर्म विकास पर्यायाने आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यात यशस्वी होऊ.....
धन्यवाद
@हृषीकेश 30/08/2017   10.30 PM.....

Comments