शत्रू स्तुती....

*"नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकड तारिख 4/09 वेळ संध्याकाळी 7 वाजता
माझा परममित्र अक्षय कोकणेने मला ह्या शहरातील एक नामांकित विविज्ञ संस्थेचा "शिष्यवृत्तीचा फॉर्म" आणून दिला. तारिख 09/09 ला दुपारी 4 वाजता त्यासाठी इंटरव्ह्यू होता.. अर्ध कुतूहल आणि अर्धी आशा ह्या नशेत मी हा फॉर्म भरला.. 9 तारीख उजाडली मु.यु. चा सेम 3 चा रेव्यलूशन चा फॉर्म भरणे आणि इंटरव्ह्यू ला जाणे आणि ऑफिसची वेळ सांभाळणे आणि कॉलेज सगळीच तारेवरची कसरत मला पार पाडावी लागणार होती..< 4 ला 5 मिनिट कमी निघालो पूर्ण आत्मविश्वासाने माझी मुलाखत घेणाऱ्या महोदया एक जबरदस्त आत्मविश्वास आणि सहृदयता आणि स्पष्टपणा आणि चेहऱ्यावरील एक अदृश्य तेज पाहून मी क्षणभर मी गांगरलो.. सुरुवातीचे नाव ,राहणार ,आणि शिक्षण, हे सोपस्कार पार पडले. माझा आयडॉल कोण हा विषय आला. मी तत्परतेने "महंमद अली जिनाह" सांगून टाकले माझी स्वस्तिक असलेली सही बघून त्या क्षणभर बावरल्या आणि मला भारतीय स्वतंत्र लढ्यातील हिंदुत्ववाद्यांचे कर्तृत्व ह्यावर एक जबरदस्त बोल सुनावले , मी ही ते थोडेबहुत वाचले होते. स्वा. सावरकरांवर तर माझं आजही गाढ प्रेम आणि श्रद्धा आहे हे मी मनोमन मान्य केलं. पण "जिनहा" माझ्यासाठी कायम एक थोर विभूती होती माझ्यासाठी ते कायमच आकर्षणाचा विषय होता एक अफलातून व्यक्तिमत्व, त्यांनी काय केलं ? ह्याच उत्तर समोर आहेच पण त्यांनी हे कसं केलं? आपलं स्थान कस टिकवल निर्माण केलं आणि कसे लढले हे माझ्यासाठी कायमच औत्सुक्यपूर्ण राहिलंय. "खर म्हणजे मी कट्टर हिंदुत्ववादी आहे " पण नकारात्मक भावनेवर आरूढ होऊन असंख्य मानवी गाढव आणि बैल तसेच कोल्हे ह्यांच्या मनावर अधिसत्ता गाजवली ती जिनाहनि. दुर्दैवाने सावरकरांची शोकांतिकाच झाली कुठेतरी आपणच हिंदुत्ववादी कमी पडालो ते फक्त लढले , पण त्यांचा ह्या असंख्य मनांवर कायमचा पगडा खूप कमी तीव्रतेचा राहिलाय त्यामुळे त्यांना योग्य तेवढी लौकीकता नाही मिळवता आली. जिनहा माझ्यासाठी आयडॉल आहेत कारण त्यांनी नकारात्मक रस्ता निवडून अखंड भारताचे तुकडे केले "किती कठीण काम होत त्यांचं, किती आव्हान असतील" कल्पना करवत नाहीत" आणि एवढं होऊनही "माझ्या ह्या नवीन देशात "सर्वधर्मसमुदायांच"स्वागत आहे आणि त्यांनी सुखानि नांदाव, इतकं धधांत फसवं बोलून आपली छबी जनमानसात अनंत काळापर्यंत टिकवली". सलाम त्यांना ही शिष्यवृत्ती मला मिळेल किंवा नाहीही मिळेल, पण त्यामुळे माझं जिन्हाप्रेम अजून दृढ झालं हे नक्की ...... शेवटी नाकारत्मकतेला ह्या देशात """"सर्वात ज्यास्त पाठिंबा आहे हे विसरून चालणार नाही """" "काहीतरी भव्य निर्माण करायचं असेल तर आहे ते तोडून फोडून टाकावं लागत ह्यालाच क्रांती म्हणतात" नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाताना जिंन्हाच अपयश प्रामुख्याने समोर येत , पण आपण जिनांसारखे अपयशी नाही होणार ही आशा पुढील जीवनात कायम साथ देत राहील.... @हृषीकेश ... 09/09/2017....... 6.08 PM......................

Comments