हिंस्र कळप...

अफजलखान वध काल 358 वर्ष झाली , आणि काल केरळ मध्ये अजून एक संघकार्यकर्त्याची हत्या करण्यात आली, टिपू सुलतान ची जयंती कर्नाटकात साजरी करण्यात आली , आणि पाकिस्तानी सरकारची युद्धनौका टिपू सुलतान नावाची आहे हेही मला काल कळलं, ह्या सगळ्याच बातम्यांचा उहापोह हिंदूंच्या  डोक्यात वादळ निर्माण करणारा आहे ह्यात शंकाच नसावी , सौदीच्या सुलतानानि आपल्या सगळ्या भावंडाना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं आणि इस्त्राईल चा छुपा दौरा केला अस ऐकिवात आलं ही सगळ्या बातम्या एकमेकांशी निगडित असतीलही किंवा नसतीलही पण येणाऱ्या कालखंडात हिंदू ऐक्याला पर्याय नाही हे  विचारी हिंदूंच्या हृदयापर्यंत पोहचल पाहिजे , त्यात रणवीर सिंग ने अल्लउद्दीन खिळजीची भूमिका पद्मावती ह्या सिनेमात केलीय "माझा धर्म हरवला " अस त्याच आजच ट्विट आहे त्याचे उलट सुलट अर्थही निघतात पण ह्या भूमिकेने माझा धर्म हरवला हे ज्याला वाटत त्या व्यक्तीचे त्याच्या धर्माचे संस्कार किती असतील ? आणि त्याचा प्रभाव किती असेल ? हा मुद्दा वादातील आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक हिंदू आपल्या मुलावर आपल्या धर्माचे संस्कार किती करतो हाही विचार मनाला सुन्न करतोय ,
     त्या दृष्टीने अजून एक वैचारिक पैलू उलगडतोय तो म्हणजे बीजेपी सरकार मग ते आदित्यनाथनंच यूपी तील असो वा मा. नरेन्द्र मोदींचे केंद्रातील असो हिंदूंमधील एकता आणि त्यांची उपासना शक्तींचे अधिष्ठान वापरून त्यांच्या मतात एकता आणून आरूढ झालेले आहे
हिंदू शक्ती किती काळ ते वापरणार ? आणि कती काळ ते तबल 358 वर्षे  धर्मनिरपेक्षेतेच्या गोधडीच्या उबेत झोपलेल्या हिंदूंना जाग करणार ते साक्षात "राम" जाणे ,
     कदाचित हिंदूंची ही कुंभकर्ण निद्रा जागी होईल त्या वेळेस त्यांना हे कळेल की आपल्यातली काही क्षत्रीय अर्धनिद्रेतील  बुद्धिभेदामुळे क्षत्रियता हरवून बसलेत आणि कितीतरी गणतीती आपले लख्ख "हिरे" ते म्हणजे क्षत्रीय ब्राम्हण आज संस्काराने "ख्रिश्चन"झालेत आणि कितीतरी शेती करणारे आणि वेळ आल्यास अस्त्र उचलणारे बळीराजा आज आपापसातील मतभेद आणि स्वार्थी वृत्तीमुळे आपल्यापासून लाम्ब गेलेत..
    केरळ असो वा जम्मू वा अरुणाचल प्रदेश वा कच्छचे रण सगळीकडील हा विखरलेला हिंदू एकत्र येईल तेव्हा तो क्षात्र तेजाने आणि संख्येने कमकुवत झालेला असेल असो ,
   नकारात्मक वक्तव्ये कदाचित ह्या परिस्थिती हिंदीउना जाग करण्याचं काम करत असतील तर ती जरूर करण आवश्यक आहे त्यामुळे कदाचित  हिंदू निद्रेतून जागे होतील पण त्यांच्यात क्षात्र तेजाची कमी राहील ह्याची मनोमन भीती वाटते
      खूप काळानन्तर आपण एक व्हायचा प्रयत्न करतोय तेव्हा आपापसातील कुरबुरी मत्सर आणि राग आणि द्वेष उभाळून येणार पण रणांगणात खनद्याला खानदा लावून लढण्याची आपली परंपरा आहे हे हिंदूंना विसरून चालणार नाही ... पण ही वैचारिक किंवा शस्त्रास्त्रांनी खेळायचं युद्ध नाही तर "मतांचं" युद्ध आहे फक्त एकगठ्ठा मत द्यायचित एवढंच मर्यादित कर्तव्य आहे आणि एवढतरी आपण करण आवश्यक आहे .....
    खूप आशा आहेत येणारा काळ सगळं सांगेल ...............
@हृषीकेश   १२/१०/२०१७
७.०० Pm ...........

Comments