विचारांच्या बेडुकउड्या
दैवयोग आणि चिकित्सक मनोवृत्ती ह्यांचा सुंदर मिलाफ म्हणजे "थोर" व्यक्तीचे विचार ऐकण्याचा सुवर्णक्षण......
काल महाजनी असोशिएट आयोजित कार्यक्रमाला गोगटे जोगळेकरच्या 22 नंबर हॉल मध्ये हजेरी लावली.हा वातानुकूलित हॉल म्हणज रत्नागिरीसारख्या सदा तप्त स्थानातील एक स्वर्गीय ठिकाण .. ह्याच्या व्यासपीठावर कितीतरी मान्यवरांचे पद लागले असतील, ह्या हॉल मधील प्रत्येक भिंतीतल्या प्रत्येक दगडाच्या चिऱ्याला सुद्धा महात्मेपण येईल इतकं महान ज्ञान आतापर्यंत त्यांच्यात पाझरत आलय.........
आज तिथे ब्रि. हेमंत महाजन ह्यांचा सहवास त्यांना लाभणार होता , मलाही भरपूर उत्सुकता होती कशी असतात ही माणसं? कशी वागतात ही? कस बोलतात ? काय विचार करतात ? ह्या "आपमतलबी" जगात वावरताना क्षणोक्षणी माझी कसोटी लागतेय नक्की ही महान माणस कशाची बनलेली आहेत?
त्या ठिकाणी अजून एक व्यक्ती उपस्थित होती प्रा. बापट , उचचभ्रू वर्तुळात ओळख असलेले आणि थेट पंतप्रधान आणि गव्हर्नर ह्यांच्याशी हितगुज साधणारे प्रत्येक पक्ष आणि संघटना ह्यांच्याशी संपर्कात राहून त्यांच्यात आणि जनात मध्यस्थाची भूमिका बजावून खरं राजकारण काय आणि त्याचा काही सामन्यांच्या बुद्धिमत्तेशी भावनांशी सबंध आहे का ? कसे विचार करतात ते ? ह्याबद्दल त्यांचं भलंमोठं आणि अत्यन्त श्रेष्ठ पातळीवरच त्यांचं वक्तव्य ऐकण्याचा आज योग आला होता.
त्यांनी त्यांच्या लौकिकाला साजेस वक्तृत्व केलं. वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे कशी हानिकारक आहेत आणि त्यांचा ओढा डावीकडे कसा आहे ह्याच त्यांनी सुंदर विश्लेषण केल
बोलण्याच्या ओघात म्हणा किंवा किंवा थोडं भावनेच्या भरात म्हणा किंवा मोठेपणा सिद्ध करायच्या (अर्थात तेवढा आहेच) प्रयत्नात म्हणा
"भारत सरकारने कलम 370 जर काढलं तर काश्मीर भारतात क्षणभर सुद्धा राहणार नाही"
ऐकलं आणि माझं डोकं फिरल कानफट लाल झाली मुठी आवळल्या गेल्या,क्षणभर काहीतरी वेगळं करावं ही भावना निर्माण झाली पण वातानुकूलित हवेमुळे म्हणा किंवा एकंदरीत श्रोत्यांच्या स्तब्धपणामुळे माझ्यातल्या आंतरिक मनानी मला सावरलं.
ते म्हणत होते ते त्यांच्या दृष्टीने योग्यच होत कारण ते "प्राध्यापक"होते
माझ राग येण स्वाभाविक होत करण मी "विद्यार्थी" होतो..
माझ्याकडे ह्यासाठी प्रत्युत्तर नव्हतं आणि तेवढी माझी योग्यताही नव्हती.....
ब्रि.महाजनांच्या स्थितप्रज्ञ
चेहऱ्याकडे मी पाहिलं खरच हे महान व्यक्ती त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवतात म्हणून ते महान होतात हे मनोमन पटलं
"कुठच्याही विचारमतवाद्यांनी आपले विचार मांडताना देशाला आणि "संविधानाला"प्राथमिकता देणं आवश्यक आहे देश पहिला आणि तुमचे विचार नन्तर ह्या देशाला विचारवंतांची गरज आहेच पण देशासाठी शस्त्र उचलणाऱ्यांची ज्यास्त गरज आहे
ह्या देशाहिताला दुय्यम मानणाऱ्या राजकारण्यांनी आणि विचारवंतांनी ह्या देशाचं वाटोळ केलं आहे , मोजकीच प्रसारमाध्यमे ही देशहिताचा विचार करतात बाकीचे फक्त वातावरण ढवळून टीआरपी मिळवतात ह्या देशाची जनता त्यांच्यामुळेच नकारात्मक विचारांकडे पोहचली आहे आणि त्यामुळे व्यसनाधीनता गुंडशाही आणि अतिडावेपना कडे झोक हे चुकीचे गुण तरुणांच्या मनात फार वेगाने प्रसारित होत आहेत"
ब्रि. महाजनांच्या बोलण्यात एक प्रकारचा ह्या विचारवंतांना प्रहार आणि आम्हाला योग्य वाट ह्या दोन्ही सदकर्तृत्वाची एक छटा होती"
कळलं मला,
माणस महान का होतात?
ह्या मातीत पराभवाने लोळतात,(ते पराभूत नाहीत)
कष्ट आणि त्यागरुपी घामाचे थेंब गळतात
स्वार्थविरुद्ध लढाई देतात
पैश्याला दुय्यम नव्हे तर "खालून पाहिलं " स्थान देतात
आणि आपली संस्कृती आणि संस्कार ह्यांच भान ठेवतात
त्यांच्या अमृततुल्य वक्तृत्वात यशाचे हे सुवर्णकण सापडले
मा. प्रा.बापट ह्यांना त्यांनी हलकेच कोपरखळी मारून ही वक्तव्ये कशी टाळली पाहिजेत ह्याबद्दल एक इशारा दिला...
देश प्रेम आणि संस्कृती प्रेम जर पाहायचं असेल तर हे सैनिक आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत
ह्या देश्याचे सैनिक हे नुसते सैनिक नाहीत तर विचारवंतसुद्धा आहेत हा अनमोल विचार मला समजला तो ब्रि.महाजनांमुळेच...........
@हृषीकेश 2.00 PM 10/09/2017...................

Comments
Post a Comment