अहं नाही ब्रम्हास्मि ।।

अहं .
व्यवसायतला तो,
कष्टातला तो,
बुद्धीतला तो,
लक्ष प्रेरणा होती भस्म
तो,
अहं  ।।
नाकारला तरी तो,
स्वीकारला तरी तो,
मृत्यूपश्चात जिवंत राही
क्षणाक्षणास गुणांस जाळी
त्यासानिध्यात मन आनंदी होई
तो,
तात्पुरत्या भावना सुखवी
तो
अहं, ।।
अहं
शास्त्रात तो
अवगुणात तो
नवंनिर्मितीत तो
जगण्याचे बळ देई तो
अमर्त्य तो
अस्थिर तो
अक्षम्य तो
अधीर तो
तो
अहं
आणि अहं ।।
@हृषीकेश   8.00 PM  14/01/2018...




Comments