शोध स्वत्वाचा ...

मी कोण ?
पश्चिमेला शोधलं
शोधलं पूर्वेलाही
त्या सिंधू समुद्रात
त्या अरब खाडीतही शोधलं
शोधलं त्या दगडातही
शोधलं पानापानात
हिंसेच्या त्या निष्ठुर गर्भात
नजर लावूनही शोधलं
शोधलं तरी सापडत नाही
तो कोण ?
मग स्वतः ला शोधणारा मी
मी कोण ?   ,
मी मर्त्य मानव अधुरा
मी असत्य अर्धसत्यातला
मी अनिष्ठ अर्धनिष्ठेतला
मी बोझ ह्या सृष्टीतला
नित्य भक्षण करून
गाढ झोपणारा मी
महान सृष्टीतील प्राणी संपवून
चेतन निसर्गातील हवा खाऊन
ममतेच्या झऱ्यातल पाणी पिऊन
जगणारा पामर मी
मी कोण ?

अमर नाही राहणार
अमर्त्य ही मी नाही
संपून जाईन क्षणात एकदिवस
अमर वस्तू निर्माता मी नाही
वाचवलं ते गमावलं
कमावलं ते वापरलं
ह्या सृष्टीला मी माझ्यासाठी
जमेल तेवढ वापरलं
औट घटकेचा हव्यासू मी
घेताना निलाजरा होतो
लुबाडण्यात सर्वात आधी
"मी" पुढे होतो
त्या स्वार्थी गर्दीतला
मी
मी नाही दुसरा कोण
मग मी कोण ?
होय मी कोण ?

@हृषीकेश   6.00 PM
21/01/2018 ...........




Comments