स्वार्थी मनीचे गीत..

मनुष्या,
सकळ दुःखांच्या पाचोळ्यातून मी आलो ।।धृ ।।
मीच तुझा सहज दास,
प्रीतीचा तो गोंडस हात,
तोंडी तो नित्य मिठास शब्द
गोड गुलाबी मायाजाल मी ल्यालो ।।1।।
अकसाच्या जाणिवेतून मी स्फुरलो,
स्वार्थाचा मी सख्खा सखा,
दूषकर्मसाठी कारण सारखा,
जेत्यांचा मीच शत्रू तिखा,
मायेच्या सत्कर्मासाठी  नित्य पारखा,
जाणिवेच्या गूढ गर्भात मदमस्त घुमलो ।।2।।
नाहीत कोणी सखे माझे,
नाहीत कोणी,अंधारतले दिवे माझे,
भरतो मी पवित्र प्रीतीमध्ये विषाचे नाले,
बळी मरतील माझे,पंख छाटेन नेहमीच तुझे,
मनुष्या,
तुझ्याच संगतीने मी विकसित झालो ।।3।।
@हृषिकेश 14/10/2018 ।। 7.20 pm...


Comments