पु.ल तुम्ही परत या...
पु . लांची बटाट्याची चाळ
त्यांची "म्हैस"
त्यांचा " अंतू बरवा"
खरंच आता राहिलाय का हिरवा ?
पु.ल ती चव गेली हो
आता राहिलाय का हो ?
विनोदी गारवा ? ।। 1।।
हसत राहणारे तुमचे श्रोते
दात त्यांचे केव्हाच इतिहास जमा झालेत,
पु.ल तुमची आठवण राहिलीय
फक्त आवाज रुपात,
तुमच्या त्या आवाजाची गुंज आहे मनात
तुमच्या दुःखाची आर्तता प्रत्यक्ष ऐकलीय,
हसून रडून मापात,।।2।।
विनोदाची पायरी
पु.ल तुम्हीच सांभाळलीत
शब्दांच्या गलिच्छ बलात्कारापासून मराठीला
तुम्हीच कायम वाचवलीत ।।3।।
पु.ल तुमची आठवण येतेय,
हेच गलिच्छ विनोद पाहून,
तो श्रोतावर्गही कमी झालाय,
हळहळतोय तुमचे अस्सल विनोद आठवून,
यमाला सांगतो ,
सांगतो पुन्हा पुन्हा पुन्हा आळवून ,
देवा पु. ल ना परत पाठव रे ,
ह्या गलिच्छ विनोदी सोंगाना बांधून जा रे घेऊन ।।४।।
@हृषीकेश 11.39 PM .. 05/10/2018
त्यांची "म्हैस"
त्यांचा " अंतू बरवा"
खरंच आता राहिलाय का हिरवा ?
पु.ल ती चव गेली हो
आता राहिलाय का हो ?
विनोदी गारवा ? ।। 1।।
हसत राहणारे तुमचे श्रोते
दात त्यांचे केव्हाच इतिहास जमा झालेत,
पु.ल तुमची आठवण राहिलीय
फक्त आवाज रुपात,
तुमच्या त्या आवाजाची गुंज आहे मनात
तुमच्या दुःखाची आर्तता प्रत्यक्ष ऐकलीय,
हसून रडून मापात,।।2।।
विनोदाची पायरी
पु.ल तुम्हीच सांभाळलीत
शब्दांच्या गलिच्छ बलात्कारापासून मराठीला
तुम्हीच कायम वाचवलीत ।।3।।
पु.ल तुमची आठवण येतेय,
हेच गलिच्छ विनोद पाहून,
तो श्रोतावर्गही कमी झालाय,
हळहळतोय तुमचे अस्सल विनोद आठवून,
यमाला सांगतो ,
सांगतो पुन्हा पुन्हा पुन्हा आळवून ,
देवा पु. ल ना परत पाठव रे ,
ह्या गलिच्छ विनोदी सोंगाना बांधून जा रे घेऊन ।।४।।
@हृषीकेश 11.39 PM .. 05/10/2018
Comments
Post a Comment