माणूस नावाचं मशीन..

मी ना आधी हाय टाकला
मग तिचा हाय आला
मनातल्या मनात गेअर टाकला
पुन्हा एकदा एक मेसेज टाकला
जग हे मशीन बनलंय
तीच माझं ही मशीच झालंय
तर्कांवर जीवन उभरलय
ते , तुम्ही आम्ही, ।।1।।
आई वडील जन्म देतात
त्याला पाळणाघरात टाकतात
ते त्यांच्या कामावर जातात
रविवारी मग सगळे एकत्र भेळ खातात
तिच्या मनातलं त्याला कळत नाही
त्याच्या मनातलं हिला कळत नाही
आणि लहानग्याच्या मनातलं ह्यांना कळत नाही
सगळं जग टाक झालय
ते सारं पैश्यावर उभारलय
कोणी? तुम्ही आम्ही , ।।2।।
गरिबांच्या हास्य कॅमेरा दाखवतो
गरिबांची भूकही तोच दाखवतो
तुमचं आमचं सुख समृद्धी दाखवत
माणसाची तुलना त्याची ऐट दाखवत
त्या निसर्गातली फुलपाखरं गेली
त्या पानातील हिरवळता धुळीने माखली
ती सुंदर फुले बिचारी संरक्षित अरण्यात राहिली
ते त्यांचे निर्मळ हास्य 'अर्था'त गुंतवले आम्ही
सगळं जगच मशिनिंच अर्क झालंय
कारण अर्थात तुम्ही, आम्ही च ।।3।।
@हृषिकेश 14/10/2018 ,, 7.50 PM




Comments