मदन रंग उधळला .

उगवली रात प्रेमान बहरलेली,
तुमची भ्रांत गहिरी ,दमान तापलेली,
सूर ते उरातले घुमवू लागले ना,
राया तुम्ही,अहो सख्या तुम्ही, मदनाचा रंग
उधळाना ।।
दिला हा ग्लास मदिरेचा,
दिला तो नजराणा जाणिवेचा,
ज्वराने भरली नजर तुमची , लाली ओठांची घ्याना,
राया तुम्ही,अहो सख्या तुम्ही, मदनाचा रंग
 उधळाना ।।
सामावले क्षण उजळून आलेय,
भारलेले यौवन उसळून आलेय,
तुमच्या हिश्याची हो मी लुटाना,
राया तुम्ही,अहो सख्या तुम्ही, मदनाचा रंग
 उधळाना ।।
दिलाचा वार तो वर्मी खुपला,
दिवानी नजर तुमची , नेकीने टिपला,
गाठ ती लजजेची , सोडवा ना,
राया तुम्ही,अहो सख्या तुम्ही, मदनाचा रंग
 उधळाना ।।
तुमच्या नजरेची मी हो राणी,
तुमच्या दिलाचा पाखरू मानी,
आता वाट नका बघू, ओढा ना,
राया तुम्ही,अहो सख्या तुम्ही, मदनाचा रंग
उधळाना।।
@HRK Vaishampayan.

Comments