शू S S S मराठा झोपलाय .... !!

शु..S S S
मराठा झोपलाय,
विरून गेलाय शूर आवाज त्याचा,
आळसावलाय,
मराठा झोपलाय..!!

धर्म त्याचा तो विसरलाय,
परधार्मियांच्या नादी घसरलाय,
भगव्यावर निळा पसरलाय,
शू SSS मराठा झोपलाय !!


हिरव्या गादीवर पहुडलाय,
मदमस्त, मदिरा रिचवतोय सर्वधर्मसमभावात झिंगलाय,
शस्त्रशास्त्र विसरलाय,
शू SSS मराठा झोपलाय .. !!

धर्मग्लानी अनोखी,
इतिहास विसरायास लावी,
शस्त्र त्याची गंजलीयत आता, वक्तव्यशूरपणा उरलाय,
शू SSS मराठा झोपलाय.. !!

वेदभ्यास करे तो ब्राह्मण
व्यापारास पुढे वाणी,मराठा तो मानी, धर्मसंरक्षण ज्ञानी,
सत्व सर्वांचीच लयास गेलीयत, राजकारणे धर्म विकलाय,
शू SSS मराठा झोपलाय..!!

शस्त्र पुन्हा परजवता येतील,
पण ते जुने गायकवाड, कदम, शिंदे ते कुठून येतील ?
पराक्रम सांगणारयास तुम्ही राजकारणी म्हणताय,
इथे आपला परका झालाय,
शू SSS मराठा झोपलाय..!!

जाग येईल नक्की त्यास, विश्वास वाटतोय,
बुद्धी थार्यावर हवीय, तोच श्वास वाटतोय,
छत्रपतींचे आशीर्वाद जाग आणतील,हा विश्वास वाटतोय,
शू SSS सध्या आवाज नकोय, मराठा पसरलाय,
शू SSS मराठा झोपलाय.. !!
@HRK VAISHAMPAYAN

Comments