ती आणि तो , काय जाते त्यांचे ?
"ती"
जेनू काम तेनु साजे,
मीच न हलते काय जाते माझे ? ।।
तूला तोलावी, बुद्धी न हलते,
काव्य परावलंबी मी, काय राहते माझे ?।।
तिमिरा उडण्या पंख लागती,
तनाचे नव्हे मनाचे पुरती,
अव्यक्त मी व्यक्त न होते,
शब्द निःशब्दात जाती,
काय राहिले माझे ?।।
प्रेम गीते तो नेहमीची गातो,
मन भ्रमणा तो घेऊनी जातो,
सुखात माझे तन - मन रमते,
उधाण तो , काय जाते माझे ? ।।
"तो"
ती प्रेम राग अनोखी, स्फुरते,
ती चांदणी अनोळखी, चमकते,
तेजोमय ती, नभात हसते,
उगा गाठण्या धडपड माझी,
काय जातेय माझे ? ।।
नदी जणू ती वाहणारी,
अखंड प्रीतीचा झरा,
मीच आडोशी निलाजरा,
कागदी नांव नदीतली ती, परत कुठे दिसते ?जाऊदे,
काय जाते माझे ?
गुलाबी कळी ती,
हळूच डोलते,
मी भ्रमर तो गुंतणारा,
मम वासना ती चलबीचलते,
धुंद ती बेधुंद मी , ती कणाकणानी उमलते,
काय जातेय माझे ?
प्रीतीच्या पाखरा, शांत बस जरा,
मधु होईल रिता,तुज टोकतील नजरा,
वेळ ती अवेळी होईल संपेल तारुण्य नरा,
सांगतोय मी तुझे मन, ऐकत नाहीस खरा ? राहूदे,
काय जातेय माझे ?
@HRK Vaishampayan 11.00 PM. 10/11/ 2020
Comments
Post a Comment