तू जळत रहा..
मला काही द्यायचं नाही
प्रेमातली ती, ती मी नाही,
तू जळतोयस तर जळ
तुझ्याशिवाय ह्या थंडीत मला
उबदार काही नाही,
जळशील जितका तू
तितका मला आधार होईल
नष्ट होता एक दिवस तू
मी पुन्हा निराधार होईन,
पाहीन पुन्हा मी उजळता तारा,
जळेल तो कायम,
जागवेल उबदार वारा,
तू आहेस उद्या नसशील जळत मात्र रहा
मी ठेवेन उपाशी तुला,
तू कुढत मात्र जा,
मरता मरता तू,माझा धर्म मला आठवेल,
बसेन तुझ्या उशाशी मी, उब तुझी साठवेन,
तुकडा तो फेकेंन छोटासा,
तू भोवती माझ्या घुमत रहा,
तू जळत रहा माझ्या राजा,
मरेपर्यंत जळत रहा..!! 20/01/2020
@HRK Vaishampayan, 9.48 PM
प्रेमातली ती, ती मी नाही,
तू जळतोयस तर जळ
तुझ्याशिवाय ह्या थंडीत मला
उबदार काही नाही,
जळशील जितका तू
तितका मला आधार होईल
नष्ट होता एक दिवस तू
मी पुन्हा निराधार होईन,
पाहीन पुन्हा मी उजळता तारा,
जळेल तो कायम,
जागवेल उबदार वारा,
तू आहेस उद्या नसशील जळत मात्र रहा
मी ठेवेन उपाशी तुला,
तू कुढत मात्र जा,
मरता मरता तू,माझा धर्म मला आठवेल,
बसेन तुझ्या उशाशी मी, उब तुझी साठवेन,
तुकडा तो फेकेंन छोटासा,
तू भोवती माझ्या घुमत रहा,
तू जळत रहा माझ्या राजा,
मरेपर्यंत जळत रहा..!! 20/01/2020
@HRK Vaishampayan, 9.48 PM
Comments
Post a Comment