"सजीव भिंत"

त्या भिंतीच्या अस्तरावरूनी पोपडे उडुनी गेले,
उन्हे खाऊन , अनंत दुःखाचे ओघ धडकुनी गेले,

धखखे खाऊनी नवं ऋतूंचे , खचल्या विटा कोसळल्या,
उगा अहं तो क्षणाक्षणाच्या भय भाराने, उसवल्या ।।

उदारतेने,निष्टेने,उमेदीने,स्वकष्टाने भिंत ती उभारली,
निष्टउर क्षण निष्टउर मने वेळेत धडपड ती सावरली,

जन निंदेच्या कुत्सिततेच्या खुणा अप्रितीच्या बुजवल्या,
समाधानातुनी सुस्कारीत भुकेच्या ज्वाळा त्या जागविल्या ।।

थकलिय भिंत दमलीय, चेतना उमेदीच्या त्या विझल्यात,
नशीबाविरुद्ध झगडली ती,आशा तिच्या त्या विरल्यात,

आधार तिचा आत्मविश्वास, आशेचा टेकू झिजलाय,
वयोमानाने,,क्रूर वजनाने पाया तिचा बुजलाय,

अशाच एका काळरात्री केंद्र निखळूनी गेले,
क्रूर नियमाने अतीव दुःखाचे अश्रू धडकुनी गेले,

अकल्पित त्या अजाण भावना कर्माआडून पचल्या,
त्या भिंतीच्या आठवणीच्या लाटा क्षणामागून सुचल्या,

मनोमनी परिकल्पना इतिहास आठवण उकरिते,
लिहिलेय" भिंत " खरडलिय जिवंत ,दिवास्वप्नी ती मिरवीते,
उमगली चूक धार दुःखाची कापे चर चर मना,
भिंती तुज शब्दा गुंफली, तू सजीव वेदना,
तू सजीव वेदना,
तू सजीव वेदना,
@HRK Vaishampayan , 10.25 PM , 30/01/2020...

Comments