विश्वास

(सदर गाव व तहलुका आणि पात्रांची नावे ही काल्पनिक असून त्याचा सत्याशी काडीमात्र ही संबंध नाही तो असल्यास निववळ योगायोग समजावा)
       कांच्या , अरे गुरु गेला रे ,क्षणभर हडबडलो , येथेछ दारू पिणारा आमचा ऑफ स्पिनर खेळाडू एक दिवस जाणारच होता पण त्याच्याच' स्पिन ' नि त्याचीच 'विकेट' इतक्या लवकर जाईल असा वाटलं नव्हत अर्थात त्याच्या परम गुरूंची ओळख करून घेणे हे ओघानेच आलं ....   
              "अरे ए दत्त्या त्या 4 नंबर रुमवाल्याला दोन प्लास्टिक पिशव्या दे रे ""भेंचोद आळशी मजोडे साले,"           विश्वास ची खणखणीत आरोळी ऐकून दत्त्या धावला , विश्वास हा खऱ्या अर्थाने मुरुठ गावचा विश्वास होता मुरुठ गाव हे दापोली तालुक्यातील एक गाव (*सदर गाव व तहलुका आणि पात्रांची नावे ही काल्पनिक असून त्याचा सत्याशी काडीमात्र ही संबंध नाही तो असल्यास निववळ योगायोग समजावा) विश्वास म्हणजे मद्याच्या तळ्यातील एक बेडूक राजा आणि त्याचे सरदार गुरू ,मका, मया , बंडल ,श्यामु, आणि दत्त्या, हे कायम सभासद तर असे कितीतरी पांथस्थ येऊन गेलेत की जे थोड्या काळासाठी आसऱ्याला होते आणि नन्तर दुसऱ्या तळ्याच्या आश्रयाला उड्या मारत निघून गेले.. गुरू त्यापैकी एक.
      मुरुठ गाव आज पर्यटन क्षेत्रातील प्रगत गाव आहे आणि जोमाने त्या गावाचा कायापालट होतोय पण पर्यटन केंद्राची सर्वप्रथम सुरुवात करणारा अवलिया म्हणजे हा विश्वास , माडाच्या झापांच छप्पर आणि मेनकापडाच्या आवरणा खाली पोफळीच्या झवळ्यांच्या भिंती त्याला आंबटशोकिनानी हजारो ठिकाणी भोक पाडून ठेवलेली तरीही पावसाचे चार महिने सोडता त्याच्या रूम कायम फुल्ल...
       गुरू , मका , मया,  बंडल, आणि श्यामू, एक जबरदस्त "फुकटी आणि महााधुर्त" साथी विश्वास ला मिळालेले बंडल एकमेव त्याचा हितचिंतक बाकी सगळे विश्वास च्या खनद्यावरील डगमळता हात सोडायला तयार नव्हते, दत्त्या बिचारा त्यातल्या त्यात ह्यांचा सेवक कम साथी.., पण त्या मानाने त्याने लवकर त्यांची साथ सोडली.,....
      "रम, रमा ,आणि रमी, ह्यामध्ये गुंतलेले हे वीर ? तुफान 'बंडली ' 'कॉमेडी' आणि कायम 'धमाल मैफलीना' चटवलेले हे "रेमजे गुंडशाही "पासून ते "लुचचेगिरी" ते "बदमाशी" सगळ्या प्रकारचे मानवी भावनेची वळण ह्यांनी पार करून करून सगळी चाळण केलेली, विश्वास कायम नशेत आणि मिळणार सगळा गला कसाबसा वरील खिश्यात सांभाळीत आपल्या मालकी खुर्चीवर बसे तर ह्यांचा डोळा कायम त्याच्या वरच्या खिशावर खिळलेला असे.प्रसंगी वरचा खिसा फाडलेला ही दिसे एका भायांण विचारांची आणि हिंसेला आणि मजेला चटावलेल्या लांडग्यांची फोउज होती ती., . पण विश्वास ही दिलदार व्यक्ती होता कोणत्याही आपल्या ? 'पोराला पैसे कमी पडणार नाहीत तो यथेच्छ कायम सुखात आणि मजेत राहील'' '",ह्याची तो कायम काळजी करत असे किंबहुना त्यामुळेच त्याच्या भोवती ही गर्दी कायम जमलेली असे ", 'कामाच्या वेळ जेवढं जमेल तितकं अंग चोरून काम आणि रिकाम्या वेळेत फक्त धिंगाणा एवढं महत्कार्य हे थोर इमानेइतबारे करीत'., ...
      ""स्त्री शरीर संग आणि मदमस्त बालांसाठी ह्यानि केलेला जुगाड आणि फसलेले कितीतरी किस्से हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे , आणि तो ही B ग्रेड मध्ये मापला जाईल , पण ह्या शौकीनानी वय काळ आणि वातावरण ह्याची कधीच पर्वा केली नाही.,, ....
       """सगळं मी पाहिलेलं नाही माझा त्यांचा काडीचाही संबंध नाही , "पण अरे दत्त्या तुझा पोर नशीब काढणार" " असे दत्त्याचीच विडी दातात पकडून त्याचा मनापासून झुरका मारून निघून जाणारा विश्वास" ' " तू मुस्लिम पोरगी कर तुला संसार उभा करून देतो "आस ठासून सांगणारा विश्वास आठवला की डोळ्यातुन पाणी तारारत  आणि मनाची तार क्षणभर झंकारते.,, .. ,विश्वास हा खरा विश्वास होता.., 'आरे ए तफुन ला कोणी हात लावणार नाय 'आरे ए मझहर किती देणं आहे तुझे '? ''तुझ्या घरी उद्या सकाळी पोच होतील अशी ग्वाही देणारा तो विश्वास'' .. 'बाबा' च्या आड्यावर अक्षरशः धुडधूस घालणारे हे आठवले की 'माइ ताई' आणि आणि 'बा' ला ही क्षणभर अश्रू आल्याशिवाय राहणार नाही हे मी खात्रीने सांगतो...
    " अरे ऐय कांच्या आलास कधी आलास"?? विचारून झटकन निघून जाणारा आणि  देणं घेणं नसल्यासारखा मका . "कांच्या भावा तू खरा जिगरबाज आहेस!!" तुझ्याशिवाय इथे कोण मोठा नाही असं बोलून माझी पाठ कौतुकाने आपल्या " थरथरणार्या "हातानी थोपटणारा मया.. 'हात हलवत कायम चालणार आणि आपल्या उंचीचा वापर न करणारा फक्त' "काय रे कधी आलास !" इतकंच विचारणार " श्यामू " मला ह्या वेळी दिसला नाही, कांच्या भावा, सोय कर ,अस बोलून लाइब्ररीतला '"लोकसता'" वाचत बोलणारा" गुरु " मला नाही दिसला ह्या वेळी.... ह्या सगळ्यांचा मद्याच्या तळ्यातील गुरू विश्वास तर ह्यांच्या आधी स्वर्गातल्या अप्सरांच्या सानिध्यात त्यांचे पदर खेचत मद्याचे घोट घेत गाणी गाण्यात रममाण झालेला असेल... कालांतराने ह्यांची पुण्याई असो वा नसो यमराज नाईलाजाने ह्यांना त्याच्याच कंपार्टमेंट मध्ये टाकेल आणि उरलेल्या जागा ह्यांच्या आग्रहात्सव ह्यांच्या उर्वरित जोडीदराना ठेवेल ह्याबाबत मला अजिबात शनका नाही.
"फक्त विश्वास एकच विश्वास" @हृषीकेश ......१.३८ AM.... १०/०५/२०१८....

(*सदर गाव व तहलुका आणि पात्रांची नावे ही काल्पनिक असून त्याचा सत्याशी काडीमात्र ही संबंध नाही तो असल्यास निववळ योगायोग समजावा)..

Comments