मी हरवलोय
तुझ्या कल्पनांची ओझी किती वाहू, प्रिये
दुःखाचा सोसाट्याचा वारा वाहतोय,
तू सुखात आहेस, न मी मूर्खासारखा हरवतोय,
स्वप्नातली तू , तुझ्यात मी गुंततोय,
स्वतंत्र तू, मी मात्र स्वतःच्या कोशात भिरभिरतोय ।।
तू तुझ्या छंदात , तुझ्या नादात बिचारी रमतेस,
मी ह्या एकटेपणाच्या दुःखात,
निराशेच्या केंद्राभोवती घुमतोय, ।।
चंद्र चांदणीचा खेळ सारा हरेन तरी खेळणार,
बाहुपाशाची ओढ तुझी , विरहात मी खिळतोय ।।
कर माझे रिते, तरी तुझ्यासोबत तुलना करतोय,
पेटते अश्रू घेऊन माझ्या मनोमन मी जळतोय,
वाहत्या त्या नदीला किनारा तो सापडेल का ग ?
उधाण वाऱ्यावर नांव घेऊन तिच्या दिशेने मी धावतोय ।।
तुझ्या कल्पनांची ओझी किती वाहू, प्रिये
दुःखाचा सोसाट्याचा वारा वाहतोय,
तू सखी तुझ्या मनाची तू स्वामीनी,
ते क्षण अनोखे गाठताना मी स्वतःला थकवतोय,
मी स्वतःला थकवतोय ।।
05/ 01/ 2020
@HRK Vaishampayan

Comments
Post a Comment