नरा समजुनी घे .

प्रिये किती पिळतेस तू मला
मला बाहुपाशात घे,
उलटून गेलीय कधीचीच ती सांजवेळ
मला लुटून घे  ।।

जगाची दुख्खे मी सोसेन,
प्रीतीची माळ मी जपेन,
स्मृतीचा गंध तो आठवतोय प्रिये
मला जपून घे  ।।

आता कुठेू उमजते मज
प्रीतीची बागेतली तू कळी
मालवून जाशील एके क्षणी
मज मिटवून घे  ।।

स्पर्श आठवतोय ग
स्मृतीतला तुझा गंध आगळा,
किती आढेवेढे तुझे ह्या क्षणाला
मला ओढून ने  ।।

प्रिये किती पिळशील तू मला
मला बाहुपाशात घे ।।
@Hrk Vaishampayan .. 9/01/2020

Comments