मी एक बंडखोर.

आज मी बंडखोर झालोय तिच्याविरुद्ध,
तिच्या मानण्याविरुद्ध,
तिच्या विचारांविरुद्ध,
तिच्या स्वप्नांनविरुद्ध,
तिच्या इच्छेविरुद्ध,
तिच्या सांगण्याविरुद्ध,
तीच्या संगतीविरुद्ध,
तिच्या संमतीविरुद्ध,
तिच्या कल्पनेविरुद्ध,
आज मी ठरवलंय युद्ध,
तिच्या कृतीविरुद्ध,
तिच्या प्रेम नशेविरुद्ध,
तिच्या अस्थित्वाविरुद्ध,
तिच्या नितींविरुद्ध,
तिच्या प्रीतीविरुद्ध,
तिच्या आवडी निवडीविरुद्ध,
मी बंडखोर झालोय होत आलोय,
मनी जळत आलोय स्वप्नी तडफडत आलोय,
एका हाकेसाठी तिच्या , मी झुरत आलोय,
नाही मिळत सावली तिची,
तिचा पाश तिची आकृती ही,
ती सौन्दर्यवती नाही पण स्तुती सुमनांचा पहाड भेदला मी,
तिच्या त्या अघोरी अंतर्मनाविरुद्ध,
तिच्या त्या अवघड अजाण खोडकर कृतीविरुद्ध,
आज मी बंडखोर झालोय,
मी बंडखोर झालोय,
@Hrk Vaishampayan 14/01/2020.  9.40 PM

Comments