हृदयाला जखम होते तेव्हा शब्द गळतात रक्त नव्हे ..
त्या रक्तातून माखून निघतात श्रोते आणि कौतुक करतात त्या रडणाऱ्या जखमी बळीच
निर्बुद्ध लोकांना नाही कळत ते रक्त मानतात ते तर बळीचे शब्द आहेत माखून निघालोय ते तर विष आहे जे आपण शरीरावर ओघळून घेतलंय ते शब्द आहेत रक्त नाही ते आपल्या हृदयात काळजात घुसणार आहेत आणि हजारो विचाररंध्रे खुले करणार आहेत.
त्या पापी लोकांच्या काळजात घुसून पहा अरे गंधर्वा तुला दिसतील ते रक्तबंबाळ छिद्रे जी रोजच्या स्वार्थी जगात माणुसकी बाजूला करताना जखमा करणारी, आणि त्यातून पाझरणारा तो स्वार्थी कर्म करण्यासाठी प्रेरणा देणारा काळा स्त्राव जो कालांतराने माणूस नावाच्या मशीन चा प्राण बनणार आहे.
ज्या दिवशी रोजच्या स्वार्थी जगात माणुसकी बाजूला करताना हृदयाला होणाऱ्या वेदनेची पडलेली छिद्रे आणि त्यातून गळणारा तो स्वार्थाचा स्त्राव ज्या दिवशी माणूस नावाच्या मशीन चा संपेल ना ! त्या दिवशी माणूस नावच मशीन थांबेल आणि उरेल तो फक्त सांगाडा जो चालायचं विसरेल नक्कीच पण जगायचं नाही.
@HRK Vaishampayan.  13/02/2020.  12:12 PM

Comments