पाकव्याप्त काश्मीर अवघड पण गरजेचे..

पाकव्यप्त काश्मीर अवघड पण गरजेचे…

       भारताच्या दैनंदिन हवामान फलकावर पाकव्याप्त काश्मीर च्या प्रमुख शहरांच्या हवामानविषयी माहिती प्रदर्शित झाली, loc ( लाईन ऑफ कंट्रोल) गूगल मॅप वरून गायब झाली, आणि भारताच्या अधिकृत नकाशावर ही तसेच बदल झाले, काय असेल सध्याच्या सरकारची मानसिकता ह्याबाबत पुन्हा अंतरराष्ट्रीय सुरक्षाविषयक तज्ञ आणि विचारवंतांमध्ये विचारमंथन सुरू झाले.
       हँदवाडा (हिंदवाडा) मध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध भारताने इतकाच केला आणि ह्या निषेधाची परिपूर्ती झालीय ह्या भ्रमात जो राहील तो सुरक्षविषयक तज्ञ खचितच नाही. सामन्यांच्या विचारांच्या ही पलीकडे संरक्षण विषयक हालचाली ह्या अखंडीत चालू असतात आणि ह्याची नोंद जागतिक संरक्षणविषयक तज्ञ (पेटागोंनसहित) घेत असतात. अर्थात आताचे भारत सरकार हे कोरोना जागतिक संकटातही संरक्षणात सजग आहे हे सिक्कीम मध्ये चीनच्या अगळीकिस तोडीस तोड उत्तरावरून सहज समजून येते.
       पाकव्याप्त काश्मीरची भौगोलिक स्थितीचा विचार करता ही नुसती गुंतागुंतीचीच नसून सैनिकी कारवाईसाठी भारतासाठी अधिक अवघड आहे, K2 पर्वतरांगा असो वा हिमालयीन छोट्या छोट्या पर्वतमाला, हिंदुकुश पर्वतमाला,पाकव्याप्त काश्मीर मधील शांदुल नॅशनल पार्क, ( गिलगीतच्या पश्चिमेस ( काश्मीरचे टोक), लुलुसार दुदीपसार नॅशनल पार्क (स्कर्डू च्या पाश्विमेला), देवसाई नॅशनल पार्क (स्कर्डू च्या दक्षिणेला) त्यातील देवसाई नॅशनल पार्क हा पूर्णपणे संवेदनशील भाग आहे.
     देवसाई म्हणजे उर्दू भाषेत 'जायंट्सची भूमी'.  बाल्टी लोक या जागेला 'गर्बियर्सा' म्हणून संबोधतात कारण ते 'उन्हाळ्याच्या वेळी' उपलब्ध आहे.देवसाई नॅशनल पार्क पाकिस्तानमधील खरंग, अस्टोर आणि स्कार्डू दरम्यान आहे.  समुद्रसपाटीपासून त्याची सरासरी उंची 4,114 मीटर (१,,7 7 f फूट) आहे,देवसाई मैदानाचे दुसरे चांगटांग तिबेटी पठार नंतर जगातील सर्वात उंच पठार आहे. हे पठार 3,000 चौरस किलोमीटर क्षेत्राचे संरक्षण करते (1,200 चौरस मैल). काराकोरम-पश्चिम तिबेटी पठार अल्पाइन स्टेप इको प्रदेशातील समृद्ध वनस्पती आणि जीवजंतूसाठी हे प्रख्यात आहे.  वसंत ऋतू मध्ये, हे वन्यफुलांच्या स्वीप आणि विविध प्रकारच्या फुलपाखरूंनी व्यापलेले आहे.देवसाई उत्तरेकडील स्कार्डू जिल्हा, दक्षिण-पूर्वेतील गलारी खर्मंग जिल्हा आणि पश्चिमेला अ‍ॅस्टोर जिल्हा येथून प्रवेशयोग्य आहे. देवसाई स्कार्डू शहरापासून अंदाजे 30 कि.मी. अंतरावर आहे आणि देवसाईला भेट देण्याचा हा सर्वात छोटा मार्ग आहे. बर्‍याच परदेशी लोक स्कार्डू मार्गे देवसाईला भेट देतात.  सद्पारा स्कार्डू मार्गे देवसाईच्या शिखरावर पोहोचण्यास एक तास लागतो. दुसरा मार्ग अस्टोर खोऱ्यातुन चिलीम मार्गे आहे. हे शिला खोऱ्यातून देखील उपलब्ध आहे. देलसाई मार्गे स्थानिक लोक प्रवास करतात. ते राष्ट्रीय उद्यान असले तरी, देवसाई राष्ट्रीय उद्यानाचा उपयोग चरण्यासाठी जमीन म्हणून करण्यासाठी गुर्जर-बकरवाल मोठ्या अंतरावर प्रवास करून त्याचा वापर करतात, त्सोक कचूरा खोरे स्कार्डू मार्गे बर्गी ला नावाचा आणखी एक मार्ग आहे.फ्रेंच मानववंशशास्त्रज्ञ मिशेल पिसल यांनी केलेल्या संशोधनात असा दावा केला आहे की इ.स.पूर्व 5 व्या शतकात वास्तव्यास असलेल्या ग्रीक इतिहासकार हेरोडोटस यांनी सांगितलेल्या 'सोन्या-खोदणारी मुंग्या' या कथा ही देवसाई पठाराच्या सुवर्ण हिमालयातून  मिनोरोसारख्या स्थानिक आदिवासी पठाराच्या भूगर्भातून वर आलेली सोन्याची धूळ गोळा करण्यासाठी येतात त्यांच्यावरून रचण्यात आली आहे.हा परिसर आंतरराष्ट्रीय वन्यजीव व हिमालयीन अस्वले आढळणारा संवेदनशील प्रदेश असल्याने ह्या प्रदेशात युद्धखोर हालचाली उभय देशाना आंतरराष्ट्रीय दबावाला सामोरे जाण्यास भाग पाडू शकतात.
       काराकोरम हायवे हा मार्ग चीनमधून पाकिस्थानातील अबोटाबाद - तक्क्षिला - इस्लामाबाद ह्या भागाला जाऊन मिळतो. पाकव्याप्त काश्मीर ची राजधानी मुझ्झफराबाद येथून पाकिस्थानची राजधानी इस्लामाबाद येथे पक्क्या रस्त्याने जाता येते. सझीन - बेशमसीटी - जलखंड - चिलास - अबोटाबाद हा त्रिकोणी प्लाटो भारतीय सैन्यला ताब्यात घेणे क्रमप्राप्त ठरेल. ह्या प्रांतामधून महत्वाचा मार्ग काराकोरम हायवे हा पाकव्याप्त काश्मीर (गिलगीत)मधून चीन ला जातो ह्या वितिरिक्त कोणताही पक्का मार्ग ज्यावरून सैनिकी शस्त्रांची ने आण करता येईल असा दुसरा मार्ग पाकिस्थांनकडे उपलब्द नाही. त्याचप्रमाणे स्करडू वरून इस्लामाबाद येथे पोहचण्यास 12 तासांचा काळ लागतो सदर विलंबचा भारताला लष्करी कारवाईसाठी फारसा उपयोग होणे कठीण आहे. कारगिल ते स्करडू ह्यांमधील मार्ग वापरात नसल्याने बंद अवस्थेतीत मार्ग पुनर्जीवित करण्यात आणि वाहतूक करणे ह्यासाठी भरपूर अवधी लागू शकतो. चाबहार मार्गे अफगाणिस्थान येथील वखन कॉरिडॉर नॅचरल रेफ्युजी येथे सैनिकी कारवाई सह सज्जता ठेवून त्या सैन्याची किंवा तेथे नमूद अमेरिकन सैन्याची मदत घेऊन काराकोरम हायवे येथून चीनची  रसद रोखणे अत्यावश्यक ठरेल. परंतु भौगोलिक स्थिती अत्यंत खडतर हाडे गोठवणारी थंडी आणि भयानक थंड वारे तसेच बर्फाळ टेकड्या कोसळणे ह्या समस्यांचा डोंगर पार करणे क्रमप्राप्त असेल. तेथून सोस्त , जमलाबाद , गुलमीत , कारीमबाद तेथून गिलगित, चिलास , नरन तद्नंतर अबोटाबाद असा काराकोरम हाय वे चा मार्ग असून तो चीन सरहद्दीपासून उत्तरेत दूर टोकाला तोडणे अशक्य असे आव्हान भारतीय सेनेपुढे असेल किंवा राजनैतिक आंतरराष्ट्रीय दबावाद्वारे चीनला या युद्धात पडू न देण्याबाबत डावपेच , चाल करता येईल परंतु ह्या भागातील काराकोरम हायवे तसेच चीन पाकिस्थान संबंध ह्यामुळे चीन युद्धापासून दूर राहणे अशक्य.
      इराण आणि अफगाणिस्थान येथील सरकारे कायम पाकिस्थानशी अंतर्गत वादामुळे फटकून आहेत ह्याचा फायदा घेऊन पाकिस्थानच्या वायव्य सरहद्द प्रांतातील असंतोष अधिक वाढवता येऊन ह्या प्रांतातील युद्धजनक चकमकी वाढवता येऊन पाकिस्थान लष्कर तेथे अधिक गुंतून रहिल याची खबरदारी घेता येऊन श्रीनगर ते स्करडू आघाडी उघडता येईल. नौसेनेचा वापर करून कराची बंदरावर हल्ले करून तेथेही हलकल्लोळ माजवून पाकिस्थानी लष्कराला पळता भुई थोडी करता येईल. जेणेकडून स्करडू गिलगित प्रांत ताब्यात घेणे सोपे होईल त्याचप्रमाणे पुंछ मार्गे पश्चिमेस आघाडी उघडून मुझफराबद डोमेल ताब्यात घेणेची हालचाली करता येतील. 
    पाकिस्थानातील (जगातील, पूर्वी हा प्रांत ( 10 व्या शतकात) ही काश्मीर मध्ये समाविष्ट होता )  स्वर्ग म्हणून ओळखली जाणारी चित्राल पर्वतरांगा तसेच हिंदू बुद्ध व ग्रीक परंपरा चलीरिती पाळणारी काफरस्थान म्हणून पाकिस्थान येथे ओळखली जाणारी कलाशा ( कैलाश व्हॅली, कलशा जमाती ) व्हॅली, नयनरम्य नॅशनल पार्क्स तसेच निसर्गाने भरभरून दान दिलेले निसर्गरम्य प्रदेश ही पाकिस्तान ( जुना हिंदुस्थान ) मधील पख्तुनखवा प्रांत , चित्राल ते गिलगित ह्या सरळ रेषेच्या उत्तरेकडील जुना हिंदुस्थान ( आताचा पाकिस्थांनचा व पाकव्याप्त काश्मीरचा भाग ) म्हणजे जगातील उपलब्द स्वर्गीय नैसर्गिक सौन्दर्य असणारा भाग असून  ह्या भागात युद्धखोरी जगाला परवडणारी नाही अर्थात पाकव्याप्त काश्मीर एका झटक्यात जिंकणे , एका लढाईत, एका कारवाईत जिंकणे हे अशक्य आहे ( अशक्य असे काही नाही असे म्हणणे ह्या बाबतीत मूर्खपणाचे ) भारताला हळू हळू छोट्यामोठ्या सैनिकी कारवाया करून क्रमाक्रमाने पश्चिमेकडून मुझफराबाद , उत्तरेकडील स्करडू , गिलगीत , बाल्टिस्थान , हुंजा व्हॅली काबीज करता येतिल. परंतु चीनचा ह्या प्रांतातील सबंध आणि पाकिस्तानकडुन प्रांत रस्तेमार्गे जोडलेले असल्याने तसेच नैसर्गिक गुंतागुंतीची आव्हाने समोर असल्याने हवाई वाहतुक जवळजवळ अश्यक्य असल्याने पाकव्याप्त काश्मीर पुन्हा मिळवणे एक अवघड आव्हान असेल तूर्तास भारतीय हवामान खात्याने पाकव्याप्त काश्मीर मधील शहरांचे हवामान दर्शविणे ही पकव्याप्त काश्मीर प्रांतावर हक्क सांगण्याची पहिली पायरी समजण्यास हरकत नाही परंतु संसदेत पाकव्याप्त काश्मीर हा आमचा भाग आहे आणि तो आम्ही मिळवूच हे लोकनेत्याने सांगणे आणि  सैनिकी कारवाई करून तो प्रत्यक्षात जिंकणे हे अवघड आव्हान कायमच राहील ..
  • Adv . Hrishikesh D. Vaishampayan...

  • संदर्भ - गुगल मॅप … 
  • इंडिया तिबेट अँड चायना ( दि लिओनार्ड )
  • फ्रॉम कटच टू ताशकंद ( फारुख बाजवा )
  • 1971 इंडो पाक वॉर (मेजर जनरल हकीम अर्षद कुरेशी )
  • विकिपीडिया

Comments