मोह
सुदास्यूने थकून आपली थैली बाजूच्या खडकावर ठेवली, आपल्या हातातली "थुज" वनस्पती निरखून पाहून आपल्या भविष्याविषयी चिंता आणि कष्ट ह्याचा विचार त्याच्या मनात आला, मालदा तुन येऊन त्याला तब्बल 7 वर्षे होऊनही त्याला ह्या वनस्पतीचे ठिकाण शोधता येत नव्हते, " बेटा , ये पत्ता ले, ये जहा मिलेगा, समझ तुझे सोना मिल गया " बाबांचे शेवटचे बोल त्याच्या कानात अशा वेळी गुंजत राहायचे. तो उठला, बाजूच्या पिशवीतून आरोमा ने दिलेला जेवणाचा डबा त्याने उघडला घमघमीत माशाचे कालवण आणि भात त्याच्या आवडीचं नेहमीच खाणं त्याने चवीने संपवलं. बाजूच्या केळीच्या झाडांवरची मोठाली पाने तोडून त्यांवर तो थोडा आडवा झाला.
सुदास्यू हा एकुलता एक मुलगा जीवनदास हा मूळचा बिहारी मालदा ( पश्चिम बंगाल ) येथे येऊन भंगार साहित्य गोळा करून उपजीविका करणारा एक वेठबिगारी कामगार त्याचा बाप, सुदस्यु ने खूप शिकावे मोठे व्हावे ही त्याची मनीषा होती परंतु घरी आठरविश्वे दारिद्र आणि " माली " च्या अचानक जाण्याने जीवनदास मनोमन खचून गेला. शेवटच्या क्षणी फक्त मालदामधील वास्तव्याची खोली व 'अर्नब' ने त्याच्या मित्राने दिलेले कधीच न वाळणारे वनस्पतीचे पान की ज्या पानाचे वास्तव्य झारखंड येथील सोन्याच्या खाणींजवळ आढळून येते आणि अर्णब ने हे गुपीत शेवटच्या क्षणी जीवनदास ला सांगितलेले, हीच संपत्ती जीवनदास ने सुदास्यु ला सोपविली आणि आपली जीवनयात्रा संपवली.जीवनदासच्या आयुष्यातील एक ही क्षण तो आपली आर्थिक स्थितीत सुधार करू शकला नाही ही त्याच्या मनाची न सुटणारी गाठ आणि दारिद्र्य ठेवून तो 3 वर्षांपूर्वी गेला.
उन्हाच्या आलेल्या तप्त झुळकीने सुदास्यू ची झोपमोड झाली हातातली पिशवी सांभाळत त्याने पाण्याच्या शोधात आपले पुढील मार्गक्रमण सुरू केले. उन्हे उतरणीला लागायच्या आत त्याला अमरपार ला पोहचायचे होते. त्याला आरोमाची आठवण येत होती तीच त्याचा आधार होती. झपझप पावले टाकत तो निघाला. बनस्लाई नदीच्या किनाऱ्यावरची ती पायवाट त्याच्या चांगल्या माहितीची झाली होती. त्याला धंजोरी त्याचे गाव आता खुणावत होते.
माशांची टोपली हलकी झाली. एका अर्थाने डोक्यावरचा भार कमी आणि चोळीत खोचलेल्या नोटा भरून दिसत होत्या ह्यावरून जाणारे येणारे नुसते टोमणे आणि विनोदाचे हास्याचे शाब्दिक वार आरोमा सहन करत चालत होती तिच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम होत. कधीही थकवा आपल्या चेहऱ्यावर न दाखवणारी आणि कायम हास्य ठेवून लोकांना बुचकळ्यात टाकणारी ती स्वतः प्रचंड व्यवहारी होती, " आता सुदास्यू येईल , घाई करायला हवी " अशा विचारात ती कधी घरी आली ते तीच तिलाच कळले नाही. सुदास्यू तिची वाट पाहत वळणावर थांबला होता. " तिच्या नजरेतली मागून ये अशी खूण सुदास्यू ला चटकन लक्षात आली सरावाने , सवयीने तो तिच्या मागून घरी आला. म्हातारी चा खोकल्याचा आवाज आणि त्यांच्या खोपटीची ताटी एकदम उघडली गेली..
गलफाड बसलेला हे येडबेंद्र धूड आरोमाला का आवडले असावे ह्याबाबत त्या कोड्याचे कायम गाववल्याना अप्रूप आणि चघळायचा विषय. आरोमा दिसायला नीटनेटकी आडवा बांधा धनुष्यकार भुवया गोल असामी चेहरा दाट आणि नीटनेटके बांधलेले केस नवऱ्याने वयाच्या एकिणीसाव्या वर्षी टाकून पलायन केल्याने शेवटी आपल्या आईच्या आसराला येताना मनोमन तिने आपल्या पायावर उभे राहायचेच असा निश्चय करून ती येथे आली होती, ती आदिवासी कुटुंबातील एकमेव व्यापार करणारी बाई होती. सकाळी उठून नदीतले गावातल्या बायकांनी पकडलेले मासे ती स्वतः टोपलीतून गावोगावी विकत असे. गावातल्या आणि जवळच्या शहरातल्या कितीतरी पुरुषांनी तिला अजमवायचा , जाळ्यात ओढायचे लाख प्रयत्न केले होते पण कोणालाच ते शक्य झालं नव्हतं.
गालफाड बसलेल्या आणि दाढीचे खुंट वाढलेल्या सुदास्युवर गावातले पुरुष कायम डूख ठेवून होते पण आरोमाची गावात भांडखोर म्हणून दहशत असल्याने ते सुदास्यू च्या केसालाही धक्का लावू शकत नव्हते.. " ह्या येड्या सुद्याच बुड एकदा हरवलं की आरोमा आपलीच " हा मोठा विचार सगळ्याच गावातील पुरुषांचा होता.
' ये भैरड्या , तुला कळत नाही का अंघोळीला गरम पाणी ओतलय , आरोमाचा भारदस्त प्रेमळ दादागिरीचा आवाज ऐकून सदास्यु ने विडीचे थोतुक टाकून दिले , आपली अंगावरची बंडी घाईघाईने काढून तो खोपटात शिरला. आरोमाने त्याच्या अंगावर पहिला पाण्याचा तांब्या ओतुन आपला हक्क आणि त्यांच्यातला करार पूर्ण केला मागाहून दगडाने सुदास्यूची पाठ घासून दिली.
' झालीय पूर्ण ' असा बारीक आवाज देऊन ढिसडघाई ने तो बाहेर आला आणि आरोमाचे पाणी काढून देऊन त्याने आपली विडी शिलगावली..
आरोमाचा सहवास त्याला कायम प्रिय वाटत असे , " विडी आणि ती ही, आपली मरेपर्यंत राहील ह्याबाबत तो नेहमीच आरोमाशी लाडात बोले, इथपर्यंत त्यांचा संवाद नेहमी होई पण आरोमाचा नाजूक स्पर्श आणि कोमल मन त्याला कधीच जाणवू शकलं नाही. शारीरिक प्रेमाची धग त्याला कायम जाणवे पण ती अशिक्षित होती आणि शहराच्या ठिकाणी कधीही राहिलेली नव्हती त्या मुळे तिला कधीच माया ममता आणि प्रेम कस व्यक्त करावं हे कळलंच नाही परंतु ह्या बाबतीत तो स्वतः समाधानी होता त्याच्या ह्या भणंग भिकारी अवस्थेतही अशी साथ देणारी आणि कोणतेही सामाजिक बंधन न ठेवता सोबत राहणारी स्त्री सापडली ह्यातच तो स्वतःला मनोमन धन्य मानत असे.
सुदास्यू ने मनोमन उद्या शौकत कडे जायचा निश्चय केला खूप दिवस त्याची भेट झाली नव्हती , शौकत एक त्या गावातील बडा खाणवाला म्हणून ओळखला जायचा बनस्लाई नदीच्या किनारी त्याच्या तीन खाणी होत्या इंग्रज सरकार ने जाताजाता त्याचा लिलाव करून त्या शौकत अब्बुंच्या मालकीत दिल्या आणि आता शौकत त्याचा उपभोग यथेच्छ घेत होता. सदस्यु ला अशी खाण शोधायची होती आणि म्हणून तो आपल्या बापाने दिलेले बाटलीतील पान घेऊन रानोमाळ भटकत होता. आपल्या पायांवर पडलेला वजनदार विळखा जणूकाही तो अडकवत आहे असा आरोमाचा पाय सुदास्यू ने बाजूला करून मनोमन उद्याच्या दैनंदिन पायपिटीची उजळणी केली.
शौकत एक धूर्त आसामी होता, आपल्या बापाच्या खाणी स्वतःच्या ताब्यात घेऊन त्याने आपल्या सख्या भावांच्या तोंडाला पाने पुसली होती " अक्खे गाव शौकत कडे खाणीवर कामगारांची कशी कमी पडत नाही ह्याबद्दल कायम प्रश्नांकित होता," शौकत कडे काहीतरी बंगाली विद्या आहे आणि तो कामगारांना बांधून घेतो अशी वादांता पूर्ण गावभर होती. ह्याबाबतीत शौकत ने आजपर्यंत गेली 30 वर्षे ते गुपित राखलं होत, इरम , इकरा , इला , इलतीजा आणि नफिसा अशा पाच मुली आणि जैनब, उमेरा , फातिमा अशा तीन बायका आणि त्यांना लंगडा अल्ताफ , मतिमंद उमेद अशी दोन मुलं अशाप्रकारे 10 जणांचे कुटुंब शौकत लीलया सांभाळत असे, त्याचसोबत गावात गरीब कामगारांच्या स्त्रिया त्याच्या कितीतरी अंगवस्त्रा होत्या ह्याबाबत गावात पैसेवाला म्हणून त्याच्या विरोधात कोणीही बोलत नसे. त्याच्याकडे बंगाली , बिहारी , आणि खुद्द झारखंडातील आदिवासी भागातून प्रचंड कामगार येत होते काही जात होते सोन्याच्या खाणीवरून माती ओढणे आणि त्याची वाहतूक करणारी छोटी रेल्वे मालवाहतूक बोगी त्याचबरोबर तीनही खाणींनवर संरक्षक मजुरांचा ताफा त्याच्याकडे होता आणि विश्वासू माणसे आजूबाजूला गोळा करण्याचा त्याचा कायमच प्रयत्न असे, सुदास्यू शी त्याची मैत्री फार जुनी ही नव्हती आणि नवी ही नव्हती पण सदस्यु च्या मनात काहीतरी कावा आहे आणि त्याचा मागोवा घेण्याची त्याची वृत्ती शौकत ला स्वस्थ बसू देत नव्हती म्हणूनच तो सुदास्यू यावा यासाठी वेगवेगळ्या तर्हेने निरोप पोहोचेल अशी व्यवस्था करत असे.
अब्बू ! वो सुदास आ गया है , बाहर बैठा है, इरम चा निरोप ऐकून शौकत आपल्या खोलीतून बाहेरील पडवीत आला , " अरे , सुदासु आ गया तू , यार ! दोस्त को अखिर भूल ही गया ना ? , सुदास्यू ने चेहरा कासानुकसा करून तो प्रश्न फारसा रुचला नाही हे दाखवायचा मनोमन प्रयत्न केला. बोल क्या बात है , ? सदस्यु ने प्रश्न टाकला. अरे ! भाई सून तो , आया है तो मसाला दूध तो ले पहले, यंत्रवत एक कामगार मसाला दूध घेऊन आला , सदस्यु चे लक्ष अचानक आत बसलेल्या पडद्यामागील इरम कडे गेले. त्याच्या अंतर्मनात थोडी चळवाचाळव झाली . पूर्णपणे संगमरवरी त्वचेचा रंग आणि एक असामान्य अनुपम अप्सरेप्रमाणे तीच सौन्दर्य तो पाहतच राहिला , " भाई " दूध लेलो , त्या भय्याचे ते शब्द कानी पोहचले ते उशिराचा, घाई घाई ने सदस्यु ने आपले दूध संपवले. अरे सुदास तू हमारे खाण पे अबतक आया नही सोचता हू , तू मेरा सच्चा दोस्त अबतक उधर आया नही, ये मुझे अच्छा नही लगता, सुदास्यू सारखा मित्र खणीवर कामगार मिळाला तर एक विश्वासू जागी नियुक्त करता येईल असा विचार यामागे शौकत चा होता. पण सुदास्यू ला त्याच्यासारखी खाण मिळण्याची जागा शोधून स्वतःचा खाण व्यवसाय सुरू करायचा होता , आपल्या खिशातील ती पारदर्शी काचेची उभी नळी त्याने उगीचच चपापुन पहिली. अरे बस इतनाइच ना , आऊनगा रे ! तू है यार मेरा.. चल अब चलता हूं,
सदस्यु आपल्याला काहीच सांगत नाही अशी आरोमा ची कायम तक्रार होती , आता हा कुठे गेलाय , आज त्याची स्वारी सकाळीच सकाळी घराबाहेर पडताना पाहून तीन आज कामावर न जाण्याचा विचार केला तरी दुपारी फक्त रिपोर्ट पाहायला जाईन असा विचार करून ती सदस्यु चा विचार करत बसली. " आरु, त्यो तुझा यार है ना , उसका कोई कुछ चल रहा होगा , ह्या हिना च्या शब्दावर ती मनोमन विश्वास ठेवायला तयार नव्हती शेवटी तीही तशीच आहे, उगीचच तीन स्वतःचा मनाला समजावले.जमिनीवरील पाचोळ्याच्या आवाजाने तिची तंद्री भंगली सुदास्यू आला होता, ताडकन तिने हातातली झाडू दरवाज्याच्या दिशेने फेकली आणि दातओठ खाऊन आदिवासी झणझणीत शिवी दिली. ह्या अपेक्षित भांडण आणि आरोडाओरडा त्याला नवीन नव्हता, त्याने ही आतमध्ये येऊन तिच्या झिंझ्या पकडल्या आणि खाडकन एक ठेवून देऊन तो प्रतिक्रिया पाहत राहिला. "कुठे गेला होतास ! सांगता येत नाही का ? तिची म्हातारी ही भांडणात पुढे आली ," अरे तिला तरी कोण आहे रे ? तू हा असा भिरभिरता , " तुला पण कळत नाही का ? ग ये सटवे " एक जोरदार धपाटा आरोमाचा पाठीत घालून म्हातारीने आपल्या स्वभावात किंचितही बदल केला नव्हता ती खणखणीत असल्याचा पुरावा म्हणजे , आरोमा त्या फटक्याने विव्हळली..
मिठीत रडून थकलेलया आरोमाला सुदास्यू ने बाजूला केले म्हातारी फाटी गोळा करण्याच्या कामगिरीवर केव्हाच रवाना झाली होती. सुदास्यु उठला ,आरोमाचा चेहऱ्यावरील अश्रू पुसून त्याने तिला अलगद झोपवले व ताटी लावून तो पुन्हा आपल्या कामगिरीवर निघाला. आरोमा ही निपचित पडून राहिली होती तिला ही आज कामाची घाई नव्हती , " खरच " हे असं काही वेळेला घडून आमच्या हृदयाच्या गाठी अधिक घट्ट होत आहेत हिची तिला कल्पना होती पण तीन मनोमन निर्णय घेतला होता आणि तिच्या निर्णयात कोणीही बदल करणारे नव्हते. तिला ह्या बाबत स्वतःवर आणि सुदासयुवर खूप विश्वास वाटत होता सुदास्यू बाहेर जाईल पण पुन्हा येईल ह्याबाबत तिला खात्री होती.. थोडा प्रकाश कललेला पाहून तीने ताटी बँद करून आपल्या रिपोर्ट आणायच्या कामी ती निघून गेली.
सकाळीच सकाळी सुदास्यू आरोमचा निरोप घेऊन तीने दिलेली शिदोरी घेऊन शौकत कडे निघाला त्याच्या सोन्याच्या खाणीची त्याला मनातून प्रचंड ओढ लागली होती त्याला चुकून चुकून इरम ला ही बघायचा मोह आवरत नव्हता पण त्याला श्रीमंत व्हायचं होत मग मागहून सार बघता येईल त्याने मनोमन आपली इच्छा दूर केली. शौकत च्या खाणीवर प्रचंड पहारा बघून त्याची छाती दडपून गेली बाजूला भलं मोठं मैदान आणि थोड्याफार कामगारांच्या झोपड्या आणि काही पक्की मोठी घरे पाहून त्याने शौकत ला हाक मारली.
पहारेदारांनी शौकत नाही असे सांगून त्याला त्यातील एका पक्या घरात जाण्यास फर्मावले. सुदास्यु ने त्यांना खाण पाहण्याची इच्छा व्यक्त केली . त्या खणीचा घेर पाहून सुदास्यु मनोमन आनंदला. अशीच मोठी खाण आपण खोदायची पण कामगार कमी दिसत होते त्याबाबत विचारणा केली असता नवीन भरती चालू आहे असे जड आवाजात उत्तर मिळाले. किती सोने असेल ह्यामध्ये ? असा विचार उगीचच त्याच्या मनात आला आणि सवयीने त्याने आपला वरील खिसा चाचपडून पाहिला.
त्या 10 - 12 झोपड्यातून मार्ग काढत सदास्यूने त्या पहारेकर्यांने दाखवल्या घराकडे चालण्यास सुरुवात केली आणि ते घर नसून तो मोठा चौसेपी वाडा आहे ह्याची त्याला खात्री झाली..
दरवाज्यावर कोणी आहे का ? अशी आरोळी त्याने दिली परंतु कोणी आले नाही . त्याने सवयीने पडवीत खाली बसून आपले दाढीचे खुंट खाजवायला सुरुवात केली व विडी शिलगावली..
दरवाज्याची करकर झाली अरे सुदास तू आया ? आजा आजा अँदर आ अंदर आ ! शौकत ने सुदास्यू ला लोडावर बसण्याची विनंती केली व तो आपल्या कामाला चलता झाला.
इथे येऊन सुदास्यू ला जवळजवळ अर्धा तास झाला होता आणि सरबत केळी खाऊन त्याला रुकिये ! रुकिये ! अस सारख ऐकावं लागत होतं. त्याला आरोमाची आणि आपल्या घराची प्रकर्षाने आठवण आली. काही वेळाने एक नोकर बाहेर आला व ' आप अंदर आईये , आपको मेमसाब बुला रही है', तो हे ऐकून बुचकळ्यात पडला मेमसाब म्हणजे कोण ? शौकत च्या बेगमांशी त्याच काम नव्हते त्याला फक्त सोन मिळेल ? कस मिळेल ? आणि ते किमान पाहायला तरी मिळेल का ? अशी एवढीच इच्छा होती आणि म्हणून तो शौकत च्या विनंतीला मान देऊन इकडे आला होता. दार उघडलं, एक काळी नकाबपोष तरुण यौवना त्याला समोर आली , ती मागच्या वेळेस आपण पाहिलेली इरम शौकत ची मोठी मुलगी आहे हे त्याला ओळखायला वेळ लागला नाही. इरम त्याला सामोरी गेली आणि त्याला काही जाणीव व्हायच्या आतच सुदास्यू समोर आपला बुरखा काढला.
सुदास्यू बेशुद्धीतून जागा झाला , आरोमाने मोठमोठंयाने किंकाळ्या मारून अक्खी आदिवासी वाडी जागी केली होती. सुदास्यू ला काय झाले ? तो कसा आला ? आणि त्याला बेशुद्धी कशी आली ह्याबाबत लोक बेसुमार कुजबुज करत होते त्या गोलाकार गर्दीतून मार्ग काढत आरोमाचा म्हातारीने काही औषधी आणून सुदास्यू ला हुंगवल्या होत्या. आरोमाच्या मांडीवर सुदास्यूचे डोके आणि आरोमा प्राणपणाने वारा घालतेय हे चित्र आज प्रथमच आदिवसीवाडा पाहत होता आजपर्यंत असे प्रेम सर्वांसमोर आरोमाने प्रदर्शित केले नव्हते.
सुदास्यू उठून बसला तशी सगळी गर्दी पांगली. आरोमा ने त्याला गरम गरम काढा पाजला त्यामुळे त्याला हुशारी आली , त्याला त्याचीच प्रचंड शरम येत होती एवढी चांगली प्रियसी सोडून तो त्या सटवीच्या नादी लागला होता. इरम त्याच्यासमोर पूर्णपणे नग्न दिसली होती आणि तिच्या संगमरवरी कंतीवर सोन्याचे सगळ्या प्रकारचे दागिने पाहून सुदास्यू वर एक निराळा परिणाम झाला होता. शौकत कडे कामगार लोक का टिकतात ? इमानेइतबारे काम का करतात ? वेठबिगारी करून कमी पैसे कसे काय मान्य करतात ? ह्या सगळ्यांचे कोडे त्याला उलगडले होते . शौकत च्या सगळ्या मुली त्याने ह्या कामाला गुंतवल्या होत्या. कामगारांच्या मनात सुवर्णाची आसक्ती आणि स्त्री ची आसक्ती निर्माण करायची आणि ह्याच दोन गोष्टी त्यांना आयुष्यभर वेठबिगारी करण्यास भाग पाडत. गावातली शौकतच्या खणीवरच्या बातम्यांची सत्यता त्याला कळून आली आणि आपलं मोही स्वभावाचा त्याला मनोमन त्यागावासा वाटला . त्याला हळूहळू तो घटनाक्रम आठवू लागला तशी त्याच्या डोक्याची तार सणकली आणि त्याने तिरमीरत आपल्या वरील खिशातली बाटली जमिनीवर आपटली त्यातील ते पान एका चिकचिकित द्रव्यासह बाहेर पडले. एका मोहाचे स्वप्न आज त्याने स्वतःच्या हाताने उधळले होते. आरोमाला त्याच्या कृतीचे काहीच आकलन झाले नाही पण सुदास्यू ची पाहिल्यांदा मारलेली मिठी आणि ते गरम गरम अश्रू तिला शारीरिक प्रेमाच्या धगे बरोबरच मानसिक प्रेम , आधार आणि भावभावनेची जाणीव झाली. त्या बाटलीतीले पान यानंतर सुकून जाणार होते आणि सुदास्यू च्या मनातला लोभी पिंजरा उघडून एक कष्टाळू आणि श्रमिक सुदास्यू प्रकट होणार होता.
Comments
Post a Comment