आमदार
या आमदार साहेब ! त्या कोळीवाड्यात आमदार आले आणि भगवान कडे उतरले नाही असं कधी झालंच नाही. भगवान पावशे त्या एरियातील एक सभ्य , गरीब , आणि कष्टाळू माणूस ओळखला जायचा. त्याच्या साध्या घरात आमदारांचा फौजफाटा उतरतो म्हणून अख्खा कोळीवाडा त्याच्यावर जळत असे पण भगवान ला माहीत होतं हा आमदार कुठेच उतरणार नाही ! आणि कुठेच जाणार नाही ! ही काही नुसती ओळख नव्हती हे कोणाला सांगून काय फायदा ! असा विचार करून मिश्किल हसणे हे भगवान साठी अशा वेळेनन्तर नित्याचेच होऊन बसले होते..
"एय मदरचोद, साले तू आया बिहार से , और मेरे साथ माँ चोदी करता है, चल भाग यहासे भेंचोद, भगवान पावशेने त्या भय्याच्या पेकाटात जोरदार लाथ हाणली. तो भय्या विव्हळत तिथून गाशागोशा गुंडाळू लागला तोपर्यंत त्याच्या दोन मुलांनी रडून रडून वस्ती जागी केली होती आणि त्याची ती पांढरी जाडजूड बायको घाई घाईने आपलं आपलं सामान आवरण्यात नवऱ्यासोबत गर्क झाली.
मालाड च्या गरीबनगर झोपडपट्टीत रामदास आणि भगवान ने बऱ्यापैकी जम बसवला होता झोपडपट्टीतली सुमारे 3 गुंठे जागा आणि 4 झोपड्या राखणे हे खायचे काम नव्हते सकाळ दुपार आणि अख्खी रात्र भगवान आणि रामदास आळीपाळीने जागत राहत. यथेच्छ दारू पिऊन डोळे लालेलाल आणि भयानक तिरसट मेंदू आणि राक्षसी ताकद असलेली ही जोडगोळी त्या झोपडपट्टीत एक भीती राखून होती. त्या इनमिन 75 ते 82 झोपड्यांमध्ये सगळे माथाडी आणि गिरणी कामगार आपला संसार राखून होते इब्जा तेलीचे जनरल स्टोअर , दत्ताराम कासारची पिठाची गिरण आणि सुमेध वडावाला ब्यांगल मार्ट सोबत कपडा मार्केट ह्या तीन दुकानातून रामदास आणि भगवान आलटून पालटून प्रत्येक महिन्याला वसुली करत असत. आणि त्यावरच त्यांची गुजराण ठरलेले असे आजूबाजूच्या कोपऱ्यातील रिकाम्या जागा हेरणे आणि आपल्या जागा वाढवणे आणि नवीन झोपडपट्टीला आकारणी करून जागा करून देणे ही आपापली कामे ते दोघेही इमानेइतबारे करित त्यासाठी यथेच्छ साम दाम दंड भेद ह्या उपायांचे पालन करून पैसे वसूल ही करत आणि मासिक भाडे आकारणी वसुली आणि सांडपाणी नियोजन त्यासोबत सपाटीकरण ही कामे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून देत.
रामदासची दारू प्यायची वेळ कोणती हे फक्त भीषण बंगाली लाच माहिती होत हा भूषण त्याच्या दिसण्यावरून भीषण बंगाली म्हणून नावारूपास आला होता. " शेठ " ओ शेठ , भीषण ने दाबकून घाबरून मारलेली हाक रामदास ने ओळखली आणि पत्ते जाग्यावर टाकून आता वेळ झाली आहे ह्या अविर्भावात बाजूच्या खांबाला टेकून बैठक मारली. रात्रीचे 2 वाजले होते आणि भीषण ने आणलेल्या 2 कोटर रामदास ने आपल्या डाव्याबाजूला ठेवल्या. " अरे हे भैतड्या , आईस मेली का बाप मेला तुझा , किडे पडतील पायात समजलास, किडे पडतील" तेवढ्या वेळात अजून एक दणका बसलेला वेदना जाणवलेली विरून जाईपर्यंत दुसरा वर्मी घाव शकुला जाणवलाच नाही, गप्प गुमान तिनी त्याच्या अंगारलेल्या डोळ्यात पाहून तोल राखून शकू ने चिकन फ्राय ची परात रामदास च्या पुढ्यात आदळली. " गिळ मेल्या ", अस बोलून ती पुन्हा आपल्या जागेवर पहुडली.
रामदास ने दीड किलो चिकन फ्राय फस्त केलं होतं आणि ती परात बाजूला ठेवून शकुच्या लुगड्याला हात घातला होता. डोळे गच्च मिटून शकू शांतपणे सगळं सहन करीत होती. तिला माहिती होत मी नाही तर ह्या अख्या झोपडपट्टीत कुठल्याही झोपडीत जाऊन तो भूक भागवू शकेल तीच प्रेम होतं ह्या राक्षसावर त्यांच्यासाठीच ती मालवणातून गायकवाडानसारख्या प्रतिष्टित घरातून पळून आली होती पण इथे हे सगळं पाहून तिच्यासाठी माहेरचं बंद दार पुन्हा उघडणे तिला शक्य नव्हते. पोटी 1 मुलगा 1 मुलगी घेऊन तीला पुन्हा मागे जाण हे स्वःला पटणारे नव्हते.
तिरमिरत रामदास ने ताटी उघडलेली आणि बाहेरचा थंड वारा आत आलेला तिला जाणवला. तिचा तो पशु बाहेर पडला होता.
कंदिलाच्या प्रकाशात रामदास ने आपला एरिया व्यवस्थित कोपर्या कोपऱ्यातून न्हाहाळून घेतला. आपले काम चोख ठेवायचे ह्या आपल्या तत्वाशी रामदास कायम पक्का होता आणि ह्या बाबतीत तो हयगय करत नसे. मुंबईची वाढती लोकसंख्या त्याच्या आणि भगवान दृष्टिने तापदायक होती. " भिकारडे भय्ये आणि केरळी" ह्या बाबतीत त्यांना खूप त्रासदायक ठरत. रिकाम्या जागी झोपडी टाकणे आणि वरून त्यांच्यावर दादागिरी करणे हे नित्याचेच होऊन बसले होते वरून माणिकचंद बिल्डर रामदासच्या डोक्याला ताप होऊन बसला होता. ह्या विचारात रामदासला झोप लागत नसे तो जग झोपलं की स्वतः च्या दिवसाची सुरुवात करत असे आणि जगाची सकाळ त्याची रात्र असे.
दूर पश्चिमेकडून कंदील आणि भगवानची ओळखीची शीळ आली 6 वाजले ह्याचे ते चिन्ह होते. रामदास ने परतीची शीळ देऊन पुनश्च तिचा प्रतिसाद ऐकून शकू कडे आपली वाट धरली. तिला तिच्या कालच्या मारावर त्याला मालिश करून दयायचे होते आणि मुलांचे अवरण्यात मदत करायची होती आणि नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता झोपायचे होते. शकू वितिरिक्त जल्लाद कोंडकऱ्याची फरीदा, हुसेन पंगारकर ची उमेरा , किशा भुवडाची निमा त्याच्या हक्काच्या ठेवलेल्या बाया होत्या लंगडा जल्लाद त्याच्या पैशावर जगत असे तर किशा त्याचा दारू पार्टनर होता आणि हुसेन मुका टेलरिंग चे कामात कायम गर्क असे. रामदास ने बाई आणि बाटलीच्या बाबतीत वेळेची तत्वे ठेवली होती आठवड्यात कोणत्या वारी कुठे जायचे हे त्याचे ठरलेले असे. शुक्रवारी फरीदा अंघोळ करते म्हणून तिच्याकडे तर बाकीच्या वारी बाकीच्या बायकांच्या झोपडीच्या उंबरठे त्याची पायधूळ खात. भगवान आणि त्याची दोस्ती लहानपणापासून भायखळ्याच्या विद्या विहार मराठी शाळेत ते दोघे शिकले आणि आठवीत दोघांनीही मास्तरच्या कांनफडात ठेवून दीड महिन्यांच्या अंतराने शाळा सोडलेल्या, भयानक गरीब अवस्थेत खाडी किनारी भंगार गोळा करण्याच्या कामात त्यांनी एकमेकांना जुंपून घेतले आणि त्यातूनच रस्त्याजवळच्या ह्या मालाड च्या रिकाम्या जागेचा ताबा घेऊन त्या दोघांनी गरीबनगर झोपडपट्टीची उभारणी केली होती.
" हाय अल्लाह" जान बक्ष दे रे , भगवान ने मारलेला दगड कोणत्यातरी अनजान माणसाच्या पेकाटात बसला होता. सकाळच्या प्रहरी पोट साफ करायला येणाऱ्या रांगानवर दगडफेक करून त्यांना पिटाळणे हे काम भागवनला करावे लागत असे. दात ओठ खाऊन तो रोज किमान 7, 8 जणांच्या जखमांना कारणीभूत ठरत असे तरी बाजूच्या वस्तीतून येणाऱ्या लोकांची संख्या कमी होत नव्हती.
" उद्यापासून भेंची मी , तारा लावून ठेवता, मग हगा साल्यानो , त्येच्यावर बरसून , जोरदार गुटख्याची पिंक टाकत भगवान ने त्यांच्या आई माई बापांचा उद्धार केला.आणि गडबडीत आपल्या पुढील कामाला आपल्या झोपडीत गेला त्याला आज माणिकचंद बिल्डरचा पुन्हा बुलावा आला होता. " ऐक सुंदा, मी जाऊन येतो माणिक कडे , जरा रामदास ला निरोप पोहचव त्या किशा कडून, भगवान ने आपल्या बायकोला सांगून बाहेर निघून गेला.
शकू आज अचानक लवकर निघून गेलेली होती आणि ते पाहून किशा ला काहीतरी वेगळेच वाटले रामदास ची झोप पूर्ण होईपर्यंत तो ही त्याच्या बाजूला आडवा झाला, रामदास त्याचा मित्र असला तरी दारू पाजतो म्हणूनच किशा ने त्याच्याशी मैत्री कायम ठेवली होती. लालबागचा हा तरुण एका चांगल्या कम्पनीत क्लर्क पदावर होता आणि तेथील आर्थिक फेरफाराचा आरोप घेऊन आज बेरोजगार म्हणून इकडे कुत्र्यासारखा जीवन जगत होता.
" उठ रे , रंडच्या , रामदास ची हाक त्याच्या कानावर आली तसा तो चटकन उठला , त्याने भगवान चा निरोप सांगितला तसे रामदास च्या कपाळावरील आठ्या बघून याता तो बिघडणार, हे चित्र त्याच्या समोर स्पष्ट झालं. रामदास ने माणिकचंद चा होरा किशा समोर उघड केला , " त्या मारवाड्याला झोपडपट्टी खाली करून हवीय ती ही 8 दिवसात आपल्याला प्रत्येकी 1 लाख देणारे तो , भिकार्डां नाहीतर म्हणतो आग लावीन तर काही मिळणार नाही. किशाने काहीतरी योजना सांगावी अशी रामदास ची इच्छा होती पण दोघे ही आपापली डोकी दारू कशी मिळेल त्याच्या शोधासाठी खर्च करायची सवय राखून होती. एक कल्पना किशा ने रामदास च्या कानात सांगितली आणि , आणि , रामदास चा चेहरा फुलून गेला घाई घाईने त्याने किशाच्या कपाळाचे चुंबन घेऊन जागेवर 50 ची नोट बहाल केली आणि तो चटकन त्याच्या पुढील प्लॅन ला आकार देण्यासाठी झोपडीतून बाहेर पडला.
दुपारचे 5 वाजले होते. भगवान घाई घाई ने रामदास कडे निघाला आणि दूर रुळावरून येणाऱ्या रामदास ची रस्त्यातच गाठ पडली. " राम्या " संपलो आपण ,' सगळं आवरायला लागणार ,' भगवान ने चिंता व्यक्त केली आणि शेवटचे शब्द संपले तेच रामदास चे हास्य पाहून भगवान ने त्याच्या डोळ्यात रोखून पाहिले. " रामदास च्या डोळ्यात काही वेडसर भाव दिसत नाहीत ना ह्याची खात्री केली. भगवान , "कोणाच्या बापाला शक्य नाही , आपण शिवसैनिक आहोत , आपली कोणी शाट पण वाकडी करू शकत नाही, तू निश्चित रहा , आणि भगवान च्या कानात काहीतरी कुजूबुजून तो चालता झाला. आपल्या मागे भगवान ची स्तब्द आकृती त्याला मागे न पाहता कळत होती आणि आपल्या मनातले आनंदाचे खुमारे तो प्रयत्न करूनही लपवू शकला नाही.
शुक्रवार आणि शकू ला पाहून त्याला नवल वाटलं आज शकु न साजशृंगार केला होता आणि नुकतीच अंघोळ ही केली होती. कुठून आलास रे भिकरड्या , गटार हुंगून , असे रामदास चे स्वागत केले, रामदास ने ही सवयीने तिच्या झिंजा पकडून दोन तिच्या कानाखाली ठेवून दिल्या, " भोसडीच्या , एक दिवस मरशील या भानगडित आणि मला रंडकी ठेवून जाशील, " एय भवाने तोंड चालवू नको उगाचच , कोणाची हिम्मत नाही ह्या रामदास ला हात लावायची , असे बोलून त्याने सरळ शकुच्या मानेला हात घातला आणि मानेखालील बटनांजवळ त्याचा हात जाणार एवढ्यात शकू ने सरळ बाजूला जाऊन आपल्या अंगावरचे पातळ काढून ती तशी त्याला आव्हान देत समोर उभी राहिली. मोह , मोह , आणि मोह चटकन त्याला शिवला , आणि काही क्षणात त्याची ट्यूब पेटली . आज शुक्रवार होता आणि फरीदा त्याची वाट पाहत बसली असेल जवळजवळ संध्याकाळ व्हायला आलीय हे पाहून त्याने तशा अवस्थेतल्या शकू कडे सरळ दुर्लक्ष केले.
फरीदाने आज सुंदर अत्तर लावून न्हाऊन माखून रामदास साठी रगती , टाकुरा , आणि मस्त खिम्याची जययत तयारी केली होती. रामदास ची झोपण्याची वेळ तिला पूर्ण माहिती होती आणि तोपर्यंत रामदास आक्खी रात्र आपल्याकडे राहणार ह्याबाबत तिला खात्री होती. एवीतेवी ती स्वतः कट्टर बुरख्यात वावरत असे अगदी घरी असली तरी आपल्या 1 सवतीसोबत आणि 4 मुलांच्या गराड्यात पडद्यात वावरत असे पण आठवड्याच्या शुक्रवारी मात्र ती रामदास साठी आपलं सगळं सौन्दर्य उघड राखे. तिला चांगलं माहिती होत मुंबईसारख्या शहरात ह्या जागेसाठी रगगड भाडे मोजावे लागेल आणि ते तिला माफ होत फक्त आठवड्यात एका दिवसाचा त्याग करून आणि रामदास च्या प्रीतिसाठी बायकांची स्पर्धा तिला ही माहिती होती आणि तिला त्यात तिच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी टिकायचे होते.
रामदास चा चेहरा कुरुवाळताना तिला पाहून तिची सवत झोपडीच्या उंबर्रठ्यायातूनच तिला शिव्या देत बाहेर पडली पण ह्यांना त्याची काही फिकीर नव्हती. रात्रीचे 10 वाजले तरी रामदास ची भूक भागली नव्हती आणि फरिदालाही त्याच्यापासून लांब व्हावेसे वाटत नव्हते. छोट्या रियानचा रडण्याचा आवाज ऐकून रामदास ने सडसडीत शिवी हाणली. फरीदाने चटकन उठून रियान ला घाई घाई ने शेजारच्या झोपडीत पोहचवले.
हळू हळू मुंबई झोपण्याची तयारी करू लागली . आणि हे दोन जीव मात्र आपल्या भोगात अधिक अधिक तहानलेल्या चटावलेल्या शवपदा प्रमाणे एकमेकांना ओरबाडत असुरी सुखात गर्क होते. फरीदामधील एक मुसलमान स्त्री जाऊन आता खरीखुरी नैसर्गिक स्त्री प्रकटली होती आणि रामदास आता एक नरमानव म्हणून प्रत्यक्ष दहा मदनांचे बळ संचारलेल्या अवस्थेत पिसाटलेला होता. बाजूला फरिदाचे चिंधड्या झालेले कपडे त्या झटापटीची जाणीव करून देत होते . त्या दोन्ही जीवांचे रोजचे मांसाहारी खाणे आणि यथेच्छ सुखात लोळणे हेच काम असल्याने त्यांच्यातील त्या मिलनाला काव्यमय मिलनाची सर येणे कदापिही शक्य नव्हते. तेवढ्यात शेजारच्या चार ही बाजूनी रडण्याचा अरडाओरड्यांचा आणि किंकळ्यांचं आवाज ऐकून रामदास ची एकाग्रता भनगली. " मादरचोद " अशी खणखणीत शिवी देऊन . बाजूला तांदुळाच्या पोत्याप्रमाणे अर्धसुखात लोळत पडलेल्या फरीदाची घट्ट पकड झटकून त्याने तिच्या डोक्यावरील दोरीवरचा लेहंगा आणि ड्रेस फेकला आणि तिमिरत ताटी उघडून तो बाहेर पडला.
पश्चिम टोकावरची आपली झोपडी पेटलेली आणि सैरावैरा धावणारे लोक पाहून त्याला अपल्यावरच्या ह्या संकटाची जाणीव झाली. शकू शकू आणि शकुच , त्याच्या डोक्यात फक्त तिला शोधण्याचे विचार घुमत होते . प्राणपणाने रामदास ने आपल्या झोपडीकडे धाव घेतली. आणि ताटी उघडून बघतो तर शकु आत झोपडीत नव्हती. रामदास च्या मनात शंका कुशंका येत होत्या पण अर्धी पेटणारी झोपडी बघून तो माघारी फिरणार तेवढयात मागाहून शकुची घट्ट मिठी आणि आसवांनी भरलेले डोळे , त्याने तशीच तिला मिठी मारली आणि " बस आता आलोय ", चल अस बोलून त्याने तिला खेचतच बाहेर काढले. अख्या राख झालेल्या आपल्या झोडपट्टईंच्या राखेतून रामदास शकू सोबत चालत होता आणि भरलेल्या आपल्या डोळ्यांतुन शकुकडे पाहत होता. त्याला मनोमन आज राडावेसे वाटत होते. आयुष्यात त्याने भल्याभल्याना मार दिला होता. आणि मार खल्लाही होता पण आज त्यानेच उभी केलेले आणि जपलेली मालमत्ता जळत होती. त्याने खूप काही कमावलं होत पण माणसांचे आक्रोश त्याचे हृदय पिळवटीत होते.
3 नंबर प्लॅटफॉर्म , रामदास आणि शकू नेसत्या कपड्यांनिशी उभे राहिले होते. रामदास डोळ्यात तेल घालून जाणाऱ्या येणाऱ्यांकडे पाहत होता त्याला आपल्याला कोणी ओळखणार नाहीना ह्याची खबरदारी घाययची होती. लांबूनच ओळखीची शीळ त्या कल्लोळातून ऐकू आली आणि रामदास चा चेहरा आनंदाने फुलला. शकू ही आश्चर्यचकित झाली. भगवान - सुदा जोडगोळी लांबून येत होती आणि भगवान ही नेसत्या कपड्यांनिशी रेल्वे स्थानकात आला होता. दादर रत्नागिरी एक्सप्रेस ची घोषणा झालेली ऐकून चटकन जवळ येऊन भगवान ने रामदासच्या हातात कागद कोंबला.
माहीत होतं भगवान ला हा माणूस आपल्याला कधीच विसरणार नाही. भलेही तो किती मोठा झाला तरी आणि आपण किती ही मोठे झालो तरी. रामदास ही अशाच प्रकारे मजल दलमजल करित आमदार पदापर्यंत पोहोचला होता आणि तो ही भगवान ला कधीच विसरणार नव्हता पण ती कल्पना देणाऱ्या किशाचे पुढे काय झाले ते कोणालाच कधी कळले नाही. रामदासच्या नावावर आज मालाड ला 5 फ्लॅट होते आणि भगवानच्या नावावर 3. बरेवाईट धंदे करून आणि धकटपशा च्या जोरावर भाई गिरीच्या जोरावर कमावलेल्या आणि राखलेल्या मालावर आज " जैन अँड जैन " ह्या कंपनीची इमारत उभी होती आणि त्याचा बिल्डर ओसवाल , त्याने आणि ह्या दोघांनी मिळून केलेला प्लान माणिकचंद च्या जोखमातून ह्या दोघानाही सहीसलामत बाहेर काढू शकला.
पावशे ने पुन्हा एकदा ताठपणे मनाशी खूणगाठ बांधली राम्या मला विसरणार नाही आणि विसरला तर मी त्याला कधीच विसरू शकणार नाही आणि विसरू देणार ही नाही.
( टीप - ह्या कथेतील पात्रांची नावे काल्पनिक ह्या कथेचा वास्तवाशी काही संबंध नाही. तसा असल्यास निववळ योगायोग समजावा )
Comments
Post a Comment