दत्ता..

    सुबोध , पम्या , देव्या ने त्या गाडीत बांधलेल्या अभागी वेड्याला एका मागोमाग एक चार कानाखाली ठेवून दिल्या. " चल भेंचोद " नीट शांत रहा नाहीतर गळा बांधून ठेवू. त्या गाडीतल्या बांधलेल्या अभागी वेड्याला गेले 4 दिवस अन्न पाणी काही मिळाले नव्हते आणि हे हुशार जीव त्याला शांत राहण्यास फार्मवीत होते. " एय " त्याला कोणी हात लावायचा नाही . त्याच्या बायकोने सगळयांना दम भरला. तो काही गुन्हेगार नाहीये सांगून ठेवते. पण तीच ऐकण्याची जमावाची मानसिकता नव्हती. त्या गाडीतल्या वेड्याला मागचे सगळे राग काढून चोपणे आणि त्याच्या पूर्वायुष्याची त्याला यथेच्छ शिक्षा देण्याचा ह्या जमावाने विडाच उचलला होता.  उमेश ला ही गाडी आता सरकारी रुग्णालयात आणि तेथून कदाचित पुढें वेड्याच्या इस्पितळात न्यायची होती आणि त्या सगळ्या गोंधळात त्या माणसासाठी काम करणारे त्याला बांधून आणून आतमध्ये बसवणारे निवडक पाच लोक धड जेवले ही नव्हते. आणि आतला वेडा त्या जमावावर अधिकच पिसाळलेला होता. जणूकाही बिघडलेला वानर, त्याला फक्त ह्यांच्या तावडीतून निसटायचे होते पण ते आता शक्य नव्हतं. 
      " झोपेच्या " इंजेक्टशन चा परिणाम म्हणा किंवा थकून म्हणा दत्ता वेड्याच्या इस्पितळातुन बारा तासांची झोप घेऊन जागा झाला होता. त्याला थोडी हुशारी वाटत होती आणि प्रचंड भूक लागली होती. त्याने बाजूला बसलेल्या आपल्या अभागी बायकोकडे आशाळभूत नजरेने पाहिले आणि तीने ही आपल्यातल्या कालच्या चार वडापावांपैकी राहिलेले दोन वडापाव त्याला देऊ केले. 
      " मला इथे राहायचे नाही , विलास , मला इथून घेऊन चल, दत्ताचा निग्रह ऐकून विलास च्या डोळ्यात पाणी तरारले. आजूबाजूच्या वेड्याच्या आचरट हालचाली आणि स्वतःच्या कपडे फाडणार्या , स्वतःचे केस तोडणार्या , आणि भयानक विकट हास्य करणारे , कोणी कायम रडत असणारे , तर कोणी नुसते चालणारे , धावाधाव करणारे , तर कोणी एकमेकांना मारणारे आणि स्वतःशीच भांडणारे बोलणारे हे जीवनाच्या समरात हरवलेले , आणि हरलेले जीव पाहून दत्ताचा जीव घाबराघूबरा झाला होता. ' मी वेडा नाहीये ', ' नाहीये मी वेडा ' प्राणपणाने दत्ता ओरडला आणि बाजूच्या नर्स नि लगेचच येऊन त्याला चटकन इंजेक्टशन दिले. 
     थोड्या अर्धजागृत अवस्थेमध्ये दत्ता आपला भूतकाळ आठवू लागला.
        बबनशेठ , ओ बबनशेठ , दत्ताची हाळी ऐकून , बबनशेठ बाहेर आले होते, बोल रे दत्ता ! काय काम काढलस ? दत्ताची ती बैठी चतुर , दबलेली आकृती आपल्या हातातील ओल्या सुपाऱ्या कशाबशा सांभाळून असणारी केविलवाणी आणि गरजू भाव दर्शवणारी पाहून बबनशेठ चे डोळे चमकले. शेठ सुपारी आणलीय , किती आहे ? बबनशेठ ने मग्रूर आवाजात विचारले , चारशे आहे , दत्ताचा दबका आवाज ऐकून . ठेव तिकडे आणि हे घे चल दोनशे घेऊन जा , आणि मागचे आहेत रे दोन हजार ! , शेठ कापू नका ! दया करा गरीबावर ! मी देईन ते ही पूर्ण भागवेन , बबनशेठ ने आपल्या टेबलाच्या खणातून दोनशे रुपये काढून दिले.
         आज टपरिवाला जाधव फुल जोमात होता. त्याच्या टपरिजवळ आज प्रचंड गर्दी होती. बुकी बोवणे , ताशा , आणि तपन , त्यांच्या सोबत रोहन आणि नाक्यातली समस्त तरुण मंडळी पाळनद्यातून खबर घेऊन येणाऱ्या विकास ची वाट बघत होती, दत्ताच्या सायकल चा आवाज ऐकून सगळे त्याच्या भोवती गोळा झाले. त्याची सायकल टपरी जवळ लागेपर्यंत सगळ्यांचा गराडा त्याच्या भोवती जमला. अरे दत्ता फिगर सांग ? फिगर सांग ? अजून वेळ आहे भेंचोद , दाबतो, आज खिसा गरम आहे. तपन चा उत्साह त्याच्या चेहऱ्यावर ओथबून वाहत होता. दत्ता ने तपन ने दिलेली सिगरेट पेटवली आणि आपली आकड्याची वही उघडून मेंडी येईल असे भाकीत केले . आणि त्या टपरीजवळ सगळ्या बहाद्दरानी मेंडी अपल्याजवळच्या असलेल्या शेवटच्या पैशांनी लावली होती. दत्ताने मात्र " चौकी " वर अपल्याजवळचे दोनशे रुपये चेपले होते. पूर्ण चौकी वर वीस रुपये प्रमाणे दहा फिगर्स चे दोनशे लावून ही त्याला त्याचे समाधान नव्हते अजून अधिक असते तर चेपले असते असा विचार करून बुकी बोवणे सोबत दत्ता निलेश च्या हॉटेलात चालता झाला. 
        " अहो " ! ऐकलत का ? घरातले जिन्नस संपलय. नविनच सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेली दत्ताची बायको शब्दात केविलवाणे आर्जव आणून नवऱ्याला सांगत होती पण दत्ताने आपल्याजवळील मजुरीचे वीस रुपयेपेक्षा अधिक न देता तेथून पोबारा केला होता. आपल्या स्वतःच्या ह्या माणसाशी लग्न  करण्याच्या निर्णयावर ती प्रचंड चिडली होती . तिच्या वाटेला लग्नानंतर सहा महिने होऊनही सुखाचे फार कमी दिवस आले होते. मंगरूळ दस्तगीर मधील एका जमीनदाराच्या घरातून ती ह्या कोकणात अशा नालायक माणसाच्या घरात बायको म्हणून आली होती. पण परिस्थिती शी तिला झगडायचे होते . तिला परत मागे जायचे नव्हते आणि ती इतक्या लांब परतणार ही नव्हती. सगळ्या प्रकाराचे चांगले उट्टे काढायचे आणि पहिला व्यवहार हातात घाययचा तिने मनोमन निश्चय केला आणि ती त्या वीस रुपयात गरजेच्या वस्तूंची यादी करण्यात गुंतून गेली.
         विश्वास , एकच विश्वास , हा विश्वास भावे दत्ताचा जिगरी दोस्त , सगळ्या मुरुडातलया नवयुवकाना ह्याच माणसाचा आधार होता आणि दत्तालाही. चोरी , चहाडी , धुर्तता , आणि हारामीपणा हे पैसा कमवायचे शॉर्टकट आणि त्या शॉर्टकटला वाव फक्त विश्वास च्या रिसॉर्ट लाच होता. विश्वास च्या मशीनच्या खोलीतून दत्ताने काल रात्री पाडलेल्या शहाळींचे बोचके उचलले आणि आता ते विकून तो पैसा कमावणार होता. " एय दत्त्या , साल्या , हे धंदे करतोस काय ,? विश्वास चा लाटका राग दत्ताला जाणवला पण ह्या उपर विश्वास काही करू शकणार नाही ह्याची दत्ताला कल्पना होती.
       सगळ्या नालायक लोकांची आणि हरामखोर महात्म्यांची संध्याकाळ भांडारवाड्यात. आणि स्वर्गापेक्षाही खचितच मोठं सुख सगळ्या जुगारी दारुडे आणि बदमाश कंपनीला बहाल करणारे वातावरण आणि ह्या वातावरणात राहवेसे वाटे आणि भांडणे मारामाऱ्या आणि स्व - स्तुतीत गर्क राहणे दत्ताला नेहमी आवडे. भोळ्याच्या मटका अड्डयावर दत्ता अँड कंपनीची मोठी बैठक संध्याकाळी जमे. आज त्याच्या खिशात पैसे होते आणि बुकी अशोक बोवण्या त्याच्या सोबत बाजूला होता. बस दत्ताने आपल्या खिशातले दीड हजार काढले आणि आपल्याजवळील कागद आणि पेन काढून कल्याण पेपरचा मागचा रेकॉर्ड भोळ्याकडे मागवला. आणि काहीतरी अगम्य आकडेमोड करून अशोक कडे " डबल एक्का " असे बोलून चटकन पेपरची सुरनळी करून एक सुरनळी भोळ्याकडे देऊन दुसरी आपल्या हातातल्या लायटर ने पेटवून फेकून दिली. आणि अशोक कडून पिवळी पावती वर डबल एक्का रुपये दीड हजार पाहून घेऊन ती पावती लगबगीने आपल्या खिशात कोंबली. 
      " मेघा , अग मेघा ! आज तिची आई आली होती. दत्ताने घाई घाई ने आपली सायकल बाजूला लावून घरात प्रवेश केला. कसले ते त्याचे भयानक घर त्याला कोणतीच भिंत अशी नव्हती की त्याचे पोपडे उडालेले नाहीत. मेघाच्या आईने दुःखाने आणि पाश्चातापाने आपल्या मुलीकडे पाहिले ती मेघाच्या लग्नांनंतर तबबल तीन वर्षाने कोकणात इतक्या लांब तिच्याकडे आली होती. " काय केलंत तुम्ही "? लग्नात हुंडा दिलात ? काही नाही. भिकरडे तुम्ही ! तुमची लायकी नव्हती तर कोकणात मुलीला द्यायची नाही. दत्ताने शेवटी उट्टे काढलेच. तो बघत होता थेरडी ने काही पैसे दिलेच तर उद्या पर्वा चैन करता येईल. त्याला आठवडाभर सलग छोटामोठा आकडा लागत होता आणि त्याच आकड्यातून लागलेल्या पैशात तो नवा आकडा पुन्हा खेळत असे त्या मटक्यातले पैसे परत परत मटक्यातच घालवायचे ह्या बाबतीत तो कायम आग्रही आणि तत्वनिष्ठ होता पण आकडा नाही लागला तर नवा आकडा लागण्यासाठी त्याच्या पदरचे अशा चोऱ्यामार्या करून बरेवाईट धंदे करून आणि अशा वाईट पद्धतीने पैसे कमावून किंवा मजुरीतले पैसे गुंतवून मटका खेळावा लागत असे ह्याची त्याला हिशेबी कल्पना नव्हती त्या बाबतीत त्याने मटक्याला पूर्ण वाहून घेतले होते.  लागलेल्या मटक्यातले एक ही रुपया तो घरी देत नसे आणि मटका खेळण्यासाठी मात्र मजुरीतले घरी दिलेले पैसे बायकोकडून धकटपशा भावनीक हल्ले आणि प्रसंगी मारहाण करून नेत असे.
       " हे पैसे ठेव " '', मेघे ," मेघाच्या आईचे ते बोल ऐकून मेघा भानावर आली. तिच्या आईने दिलेल्या त्या निळ्या नोटा लगबगीने तिने घेऊन तिला निरोप दिला. रिक्षेत बसताना तिच्या आईच्या डोळ्यातली आसवे तिला स्पष्ट दिसली. आणि तिच्या मनातला पुन्हा इथे कधीच न येण्याचा निश्चय ही तिला स्पष्ट जाणवला, तीचा नाईलाज होता. तिचा भाऊ कांताच्या चुकीची एवढी गंभीर शिक्षा भोगणे तिच्या नशिबी आले होते.
      अशोक ने चोपडी बाजूला ठेवली आणि बंडू कडे रागाने कटाक्ष टाकला. '' एय बंडू भाव्या , " भुक्कड " हे बघ , हा नाका माझा इलका आहे, साल्या तुझं दुकान चालू आहे ना ते माझ्या जीवावर, जास्त वटवट केलीस तर जाळून टाकीन हे दुकान,. '' अशोक बोवणे चा हा रुद्रावतार पाहून बंडू ने गपगुमान त्याची कार्बन असलेली निळी आणि लाल चोपडी त्याला परत केली. दत्ता, तपन आणि गुरू , मन्या , महेश ,मंगेश आणि किशा बोवण्या लांबूनच सगळं पाहत होते अशोक ने नुसती खूण केली तरी त्यांनी बंडू ची खांडोळी केली असती.
       " मेघा " , मेघा आज रडत होती . मला माझे पैसे द्या, माझ्या आईने मला दिले होते. '' तुम्हाला सुख लाभणार नाही, माझ्या आयुष्याची खंडोळी केलीत तुम्ही. तिने ठेवलेल्या साडीच्या घडीतले पैसे आज सकाळी दत्ताने काढून नेले होते. आणि त्याच्याकडून आज डबल सतती फिक्स होती. " खाडकन त्याने तिच्या कमरेत लाथ हाणली," गप्प बस भडवे, माझ्यामुळे जेवतेस आणि मला उलट बोलतेस, " बिडी " प्यायला आलेल्या विश्वासाने अचानक दत्ता ला थांबवले आणि बाजूला नेले. " दत्ता " तुझं हे बरोबर नाही. तू तिला पैसे देत नाहीस आणि तिच्याकडचे तरी का घेतोस ? विश्वास चा युक्तिवाद ऐकून दत्ता निरुत्तर झाला होता. पण आपली बायको आहे हा आपला आतला मामला आहे ह्याची त्याने विश्वास ला जाणीव करून दिली.
         जाधवाकडे आज काहीतरी दत्ताचे बिनसले होते. " दत्ताने एक मोठा आकडा खेळला होता आणि त्याच्याकडून ती पावती हरवली होती. अशोक एड्स ने मरून सात वर्षे झाली होती आणि भोळ्याने मटका बुकी धंदा सोडून 2 वर्षे मात्र दत्ता अद्यापही रोज त्याच नव्या जोमाने आपल्याकडचे सगळे आणि जास्तीच जास्त बऱ्यावाईट मार्गाने पैसे जमवून आकडा खेळतच होता. जवळजवळ 20 वारशाच्या त्याच्या मटका कारकिर्दीत अशी वेळ कधीच आली नव्हती की त्याच्या पावत्या हरवल्या आणि त्याला मटका लागण्याची खात्री असणे. " जाधवा", तूझी पोतडी दे. जाधवा कडे ताकदीने आवाज टाकल्यावर घाई घाईने त्याने दत्ताला आपली पोतडी दिली आणि दत्ताने ती पोतडी घेऊन देवीच्या देवळात आपली बैठक मांडली आणि शोधकाम सुरू केले.
      दीपाली आज जवळजवळ 7 वर्षाने मुंबईला आपल्या भावाकडे निघाली होती. पण तिला आपल्या नवऱ्याचा काही भरोसा वाटत नव्हता तो काहीतरी विनाकारण बडबड करीत असे आणि एकच वाक्य दहादा बोले पण त्याची सुसंगती काही तिला लागत नव्हती. त्याच्या डोळ्यातील बुबुळे ही वेगळीच चाल दाखवत होती पण तिला काहीच उमजत नव्हते . आपला मुलगा आता 10 वीला आहे आणि मुलगी 8 वीला तिला न त्याला काही त्रास होऊ नये म्हणून तिने नवऱ्याच्या आणि मुलंसाठी शेजारी पोळ्या सांगून ठेवल्या होत्या. पण तिला आपल्या नवऱ्याची तर्हा अधिकच वेगळी वाटत होती पण तिचा मूळचा हट्टी स्वभाव तिला मुंबईला जाण्यापासून रोखत नव्हता सगळ्या मनातल्या काळज्या दाबून तिने निघण्याचा निर्णय घेतला.
      शेजारच्या इंदिरा आजी आज दत्ताच्या ह्या तर्हा बघायला आल्या होत्या आणि दत्ताने त्यांच्यासमोरच आपली पॅण्ट उतरवली आणि आणि तत्क्षणी इंदिराने आपले उतारवय लक्षात न घेता वाऱ्याच्या वेगाने आपल्या घरात धाव मारली.शेजारचा शेखर ही विचारपूस करायला दत्ताकडे येत असे आणि त्याच्या मुलाला हाक मारून माघारी निघत असे पण तो ही हल्ली दत्ताला घाबरायला लागला होता. दत्ता बिदीत हल्ली मोठं मोठाले दगड टाकून बॉम्ब पडला,  बॉम्ब पडला अशी आरोळी देत असे आणि शेजारी पाजारी लोक घाबरून त्याच्या मुलाच्या रडण्याकडे आणि त्याच्या आर्जवाकडे लक्ष न देता आपापली दारे लावून घेत. 
       शेवटी सगळे उपाय थकले आणि दत्ताच्या मुलाने आणि मुलीने एक दिवस निश्चय करून त्याला कॉट ला झोपेतच बांधून ठेवले. आणि आपला बाप अजून कुठे भटकू नये म्हणून घर लावून आपल्या शाळेत निघून गेले.
       ' आ $ $ $ ' अशी किंकाळी मारून दत्ताची उठलेली मूर्ती विलक्षण वेदनेने तळमळताना पाहून मेघाच्या डोळ्यात पाणी तरारले ' वेड्याच्या इस्पितळात शॉक ट्रीटमेंट घेताना दत्ताचा भूतकाळ आठवून संपला आणि वर्तमानकाळात त्याचे आगमन झाले. ह्यापुढे तो कधीच मटका खेळणार नव्हता आणि त्याची ती हरवलेली पावती तो पुन्हा शोधणार नव्हता त्याला आपल्या मुलाला पहायची तीव्र इच्छा झाली आणि आपल्या अर्धांगिनीकडे पाहून स्वतःचीच त्याला प्रचंड चीड आली. त्याच्या ह्या सत्तेचाळिशी नन्तर सुचलेल्या शहाणपणाचा पुढील आयुष्यात खूप फायदा होणार होता पण त्याने त्याच्या आयुष्याची उमेदीची वर्षे अक्षरशः मातीमोल केली होती…. 
( कल्याण मटका सुरुवात करणारा आणि त्याची ख्याती दूरवर पोहचवून आपल्या धंद्याचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या '' नरकवासी " श्री रतन खत्री " ह्यांना समर्पित. )
( सदर कथेतील पात्रे नावगावानसहित पूर्णपणे काल्पनिक असून सत्यतेशी त्याचा काडीमात्र संबंध नाही,  असल्यास तो निववळ योगायोग समजावा. )

Comments