दादया..

       " मिलिंदा काय मला शाट शिकवतो, 22 वर्षे मुंबईला काढलीयत मी ! दादयाचा आवाज त्या डाउनटाऊन एरियात घुमला.  मुंबईला पापडिकर डॉक्टरांच्या दवाखान्यात कंपाउंडर होतो मी , काय साले समजतात कोण स्वतःला , झिंटयाक द्यायची लारीयागो डी एस वर अक्कलशुन्यानी. ' अरे हे कसले डॉक्टर , ! हजाम तरी हजामत प्रामाणिकपणे करतो. आणि हे असले मला अक्कल शिकवणार , स्वतः ला येत काय ? बाप्पाची ×× . हा खरमरीत आणि तारस्वरातला आवाज मी जवळजवळ 20 वर्षे मला समजायला लागलयापासून ऐकत होतो. 
         दाद्या वैशंपायन त्या गावातली एक असामान्य व्यक्ती आणि आम्ही आपले बापडे त्याच्या आगमनाची वाट पाहत एक अलौकिक , असामान्य , आणि आवश्यक , मनोरंजक विरंगुळा अनुभवण्यासाठी आसुसलेले होतो. दाद्याचा अवतार धोंडू पाटलाच्या शिस्टीम्याटीक ह्या शब्दाला अपमान वाटेल असा होता. शर्टाची वरील किमान तीन बटन उघडी, ते अंग म्हणजे दगडाचे जाते असावे अशाप्रमाणे त्याला रोज पाणी लावणे म्हणजे त्याचा घसारा होईल म्हणून की काय , तो फक्त आठवड्यातून एकदा पाणी लावत असे आणि ते ही बुधा म्हतारीच्या बोली प्रमाणे " कावल्याची अंघुल रे तुंझी, वाईच पानी जास वतलास तर हिर आटल रे " दाद्या ''शाट" तिच्याकडे लक्ष देत नसे. तो कायम आपल्या तोऱ्यात आणि संगीतावर त्याचा भयंकर जीव.. अहं ! अजिबात गैरसमज नको. इथे संगीता कोणी स्त्री नाही तर ते गायन , वाजवणे ,. गायन कसलं ते ! एखाद्या माजावर आलेल्या रेड्याप्रमाणे बेसूर भेकणे , त्या रेड्याचा आवाज ऐकून गावातील सगळ्या म्हशी आपल्या गोतावळ्यासह त्याला वाचवायला येतील अशा आवाजात रेकणे म्हणजे ते सुरेल गाणं असा दाद्याचा समज असावा. गावातील विजय फरचुरे , मिलिंदा , आणि संगीत क्षेत्रातील दिग्गज " नाना बाळ " ह्या सगळ्या गोतावळ्याचा दादया एक अविभाज्य भाग. 
        आज हरने ला कीर्तन आहे हृषी , केव्हा निघायचं ? " दाद्याच्या आवाजाने मी जागा झालो. हे महाशय सकाळीच सकाळी घरी मला उठवायला आले होते.  आई ने नेहमीप्रमाणे चहाचा कप पुढे केला. " अहो पण गाडी आहे का ? आणि पल्लविला कळवायला हवं " आईच सुचवण मी ऐकल आणि " ह्या उभयतांनी मला त्या बुवाच्या कीर्तनात बसवायचा निश्चयच केला आहे हे जाणवल " पल्लवीकडे सोय होण्यासाठी दीपाली राजी झाली म्हणून दाद्या मनोमन खुश झाला पण माझा निरुत्साह पाहून त्याने माझ्याकडे आपला मोर्चा वळवला . " काय रे एय , दळ्या , मस्ती आलीय काय ? एवढी आई सांगतेय तर तुझ्या अंगात मणभर चरबी चढली काय ? चल 2 ला हरणे गाडीने निघू. मी शेवटी टाळता येत नाही नाईलाज म्हणून तयार झालो..
अहो दोनची नाही काही तीनची गाडी आहे आणि त्वरित रात्री निघा जमलं तर , आईची पल्लविला वाचवायची धडपड माझ्या लक्ष्यात आली.  दाद्या ते ऐकून चिडीला आलेला मला जणवला. " हे बघ , दिपाले , मी इथे कोणाचा कपभर पण चहाचा ओशाळा नाही , समजलं..? तेवढ्यात त्याने दिपालीनेचं दिलेला चहा चा कप बाजूला ठेवून दिला होता. अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही म्हणून मी नाखुषीने तयार झालो.
     हा दाद्या समस्त वैशंपायन घराण्यात कसा काय निपजला असावा ह्याबाबतीत साक्षात चार्ल्स डार्विन का कोणीतरी आहे , त्याच्या कोणत्याच निकषांची आकडेमोड ह्याला मापात आणणारी नव्हती.  मुळातच वैशंपायन घराण्यात सगळे थोडेफार कमी शिकलेले. आणि चुलते चुलत्यांचं म्हणाल तर कधीच पटलंच नाही. हे जर जुळे म्हणून गर्भात असते तर बाहेर फक्त एकानेच यावं इतपत एकमेकांत शत्रुत्व. प्रचंड माणुसघाणे प्रवृत्ती. अपल्याजवळच कोणाला द्यायचं नाही आणि कोणाचं घेताना त्याचा हिशेब ठेवण्यात काहीतरी महत्पाप असावे त्याप्रमाणे घेणे. वास्तविक अशा प्रवृत्तीच्या लोकांना बायका मिळणे हे त्याच काळात शक्य होते , आता नाही ,  ह्याबाबतीत मला तरी पूर्णपणे खात्री आहे.
          दाद्या आणि बाई ह्यांच्यात छत्तीस चा आकडा, आणि त्याबाबतीत कोणतेही बरेवाईट भाव दाद्याच्या नजरेत शोधून सुद्धा सापडणार नाहीत. कित्येक बायका हाड मोडलं , फ्याक्चर , किंवा मुरगळणे , साईड फ्याक्चर बसवायला नीट करायला ह्या दाद्याकडे येत. त्याच्या हातात एक जादू होती. ती एक कला होती त्याच्याकडे. पण त्याचा त्याने कधी पैसा म्हणून केला नाही. समोरचा देईल तेवढे घेणे पण त्याच काम चोख करून देणे हे त्याचं तत्व होत. बायकांच्या बाबतीत तो बोलताना मात्र कोणताही विधिनिषेध ठेवत नसे अगदी कंबरेखालचे आणि बेंबीवरच्या अवयवांचे आचरट शिव्या आणि विनोद बोलून तो सहज हसून मोकळा होई. पण त्याचा स्त्री ला राग येईल आणि आला की कोणी समोर बोलायचं धाडस करेल असे कधी झाले नव्हते. मुळातच अजागळ राहणी , धारदार जीभ , शिवराळ भाषा आणि तिरसटभाव  हे अव ? गुण दाद्यामध्ये नुसते खचखचून भरले असल्याने कोणी त्याच्या तोंडी लागण्याच्या विचारच करत नसे.
         दाद्याची बायको अलका लग्न होऊन वर्षभरात माहेरवाशीण झाली होती आणि दाद्याल झालेला एकमेव मुलगा हाही दादयाला लग्नानंतर डाऊनटाऊन मधल्या चावट पुरुषांनी काही गोष्टी शिकवल्यामुळे अपघाताने झाला अशी वादंता माझ्या कानावर मागाहून आली. पण जे असेल ते असेल दाद्या बाप मात्र झाला होता. कशी का असेना वंशवेल त्याने जिवंत राखली होती. अलका त्या घरी वेडी होऊन निघून गेली होती आणि तीने ही बिचारीने त्याला समजावून सांगून ही तो यत्किंचितही सुधारला नव्हता उलट तीचा सुधार हा त्याच्यादृष्टिने बिघाड असल्याचे समजून सासू सासरे आणि तो . ह्या सर्वांनी तिला वेडी ठरवून तिला माहेरी धाडून दिले. दाद्याच्या घरी एक वेगळाच मनुष्य मुताचा  आणि त्यात कुजलेल्या केळयांचा दर्प असा मिश्रित वास दरवळत असे आणि त्या वासाच्या सानिध्यात तुम्ही फार काळ राहिलात तर तुमची घ्राणेंद्रिय बंड करतील अशी ही आगळीवेगळी स्थिती. पण शेजारची घरे लांब असल्याने सगळ्यांची त्यापासून सुटका होती.
       " माझ्या बापाने 40 वर्षे भिक्षुकी केलीय, " हा बंड्या "काय मला सांगतो ? भोसडीच्याला म्हणावं , सांग रे तू भिक्षुकी कोणाची करतोयस ? माझ्या बापाचा एरियातच ना ? " तंगड्या तोडीन म्हणा , मला अक्कल शिकवशील तर ! मी साधा सरळ माणूस आहे हे वाक्य तो जरा दाबूनच बोलत असे. दाद्याचे वयोमान थोडेफार मध्यमवयीन असले तरी त्याचे केस अद्यापही काळे भोर होते. भिक्षुकी शिकल्यापासून ते आजपर्यंत गावात व गावाबाहेर त्याने पायात कधीही चप्पल न घालता प्रवास केला होता आणि त्याबाबतीत तो अत्यन्त कट्टर होता. " अरे ब्राह्मण ना तुम्ही ? भिकरड्यांनो. प्राण्यांच्या कातड्याचे चप्पल का घालतात पायात ! त्या लाडयांनी प्राणी मारून खाल्ले आणि त्यांचं कातडं खावत नाही म्हणून तुमच्या पायात मारलं ! हे बोलताना पायातली चप्पल रबराची असते हे सांगण्याच धाडस मात्र कोणी करत नसे. 
       मला बेवडे , वेडेगबाळे, तिरसट , आणि निर्लज्ज , ह्या लोकांमध्ये राहणे प्रचंड आवडते ह्याबाबतीत मी स्वतः ला ह्या गोष्टींपासून वेगळा ठेवून त्यांच्या ह्या अनोख्या बळींच्या सहवासात स्वतःसाठी मनोरंजन शोधात राहणे हा अनोखा छंद मला आहे. " अरे ऋषी , मला सांग , तू आता इतका शिकलेला हा ! असा बोलून नाना बाळ ने मला तोलल. पण मी ही मनातल्या मनात अत्यंत आनंदी होतो. " अरे जर सूर्य पृथ्वीवरून दिसतो त्याच वेळी चंद्र पण उगवतो मग तो दिसत का नाही ??  मी बरोबर .. नाना बाळ तुमचे अगदी बरोबर , नाना बाळांचा पेच असा दणकट की तो विचार करतो बळकट. नानाच्या ह्या स्तुतीने दाद्या ला प्रचंड राग आला. " काय रे , विझवट्या , अरे सूर्य मावळला की चन्द्र उगवतो. चंद्र आधी का उगवतो ! मूर्ख कुठले तुम्ही. " तू ही त्या बेवड्याच्या नादि लागून हो ला हो काय म्हणतोस "? दाद्याच्या त्या अतिहुशारीचे मला मनोमन कौतुक वाटले. ते राहूदे , दाद्या आज बाप्पा कडे कधी जायचं रे, मला हाक मार. नाना ने विषय बदलेला मला कळला.. 
" पिऊन येणार असशील तस शाट येऊ नको " आधीच सांगून ठेवताय , तिकडे मला तुझी शोभा नकोय नाहीतर आल्या पावली परत हाकलून लावीन तुला, "दाद्याने अक्षरशः नाना बाळ ला वारनिंग दिली. दाद्याला बहुतांशी वेळा बाआप्पा कडे भजनाला पायीच जावे लागले आणि त्याला नानाची सोबत असल्याने नाना पिऊन जरी आला तरी दाद्या त्याला सोबतच घेऊन निघे.. शेवटी सुभानाना त्याचा गायन पार्टनर होता.
       संध्याकाळी न चुकता निलेश च्या हाटेलात चहा आणि मिसळ एक पाव एक्सत्रा अशी त्याची नि बाआप्पाची ऑर्डर असे आणि त्यात कधीही खंड पडला असे मला दिसले नाही आम्ही मूल सात वाजता खेळून आलो की बाआप्पा ची वाट बघत दाद्या हॉटेलात बसलेला आम्हाला दिसे. दादया आणि बाआप्पाची मिसळ दोस्ती आम्हाला ठाऊक होती आणि ही दोस्ती सुमारे दहा वर्षाहून अधिक काळ कायम राहिली. बाआप्पा चे निधनाला ही हा हट्टी आणि मतलबी माणूस गेला नाही हे मागाहून मला कळले आणि मला तो खरोखर कट्टर वैशंपायन आहे ह्याची अक्षरशः खात्री पटली. 
       दाद्याच्या वडिल जाऊन बारा दिवसांनंतर मी हाक मारायला त्याच्या घरी गेलो आणि दाद्या व दाद्याची वृद्ध आई माझ्या समोर सुहास्य वदनाने बसलेली. बोलायचे काय हा प्रश्नच होता. पण दाद्याच्या सवयीने तो प्रश्न चटकन निकाली निघाला. " कधी आलात रत्नागिरीतून " ? आता साहेब तुम्ही मोठी व्यक्ती झालात " " बस काय दाद्या काका " च्यायला मी तुमच्यासाठी लहानच हो " " तुमच्याइतक का मला ज्ञान असणारे " दाद्याची नस न नस मला ओळखीची होती आणि तेवढाच शाब्दिक पडवळ मी त्याच्या डोक्यात मारून घेतला.  " काका " वाईट झालं रे ! , " अरे काही नाही " अरे ते आजारीच होते कैक दिवस " मी पण ते कधी सुटतील असा विचार करीत होतो. आणि देवाने माझी प्रार्थना एयकलन. हे बोलताना तो गेलेला अभागी जीव आपला बाप आहे हे दाद्या बहुधा विसरलेला असावा.. पण मी ही त्याची आठवण करून द्यायच्या भानगडीत पडलो नाही. " दाद्या काका " ही तुझी पहिलीच वेळ ना ! मी एक जबरदस्त किमतीची लॉटरी खेळलो होतो. लागली तर लागली नाहीतर मला शाब्दिक फटका मजबूत पडणार होता.. " हो रे " दाद्या काका प्रतिसाद आला आणि मी मनोमन निर्धास्त झालो.. " होही पहिलीच वेळ हे खरं आहे ", पण आता अनुभव आला आता पुढील वेळेस मला फारशी अडचण होणार नाही " हया महान आत्म्याने आपल्या बाजूला बसलेला वृद्ध आईकडे लक्ष न देता किंवा तिने ऐकलय की नाही ह्याची कोणतीच दखल न घेता मला उत्तर दिले. आणि मी ते उत्तर ऐकून आता हसू की रडू असा चेहरा करून तिथून गपगुमान पोबारा केला.. 
       आई $$$$ अरे बानंता , त्या म्हातारीची ती हाक माझ्या काळजात खुपत होती. दाद्याचा मोठा भाऊ बानंता ने त्याला त्याच्या राहत्या घराबाहेर हाकलून लावले होते आणि त्या अभागी म्हातारीचा जीव नित्यनियमच्या आपल्या सगळ्या गरजा आणि उठबस करण्यासाठी बानंता ला पुकारत होता. तिच्या नवऱ्याच सगळं करताना दाद्याच्या धावऱ्या मूर्तीची तिला नक्की आठवण येत असेल ह्याबाबत मला शंका नाही. दाद्या वाळेवरच्या त्या पडक्या घरात राहतो. त्याचा दरारा आणि शोर आणि तीच भाषाशैली राहणीमान आणि चलनवलन ते तेच आहे पण त्याच्या चेहऱ्यावरची ती नैसर्गिक खुशी जाऊन स्वतःच्या भविष्याविषयी चिंतेचा एक भकास भाव त्याला आधीपासून ओळखणाऱ्या माझ्यासारख्या अनेक व्यक्तींच्या नजरेतून सुटत नाही आणि फक्त त्या अभागी जीवाचे हाल मात्र होऊ नयेत अशी आम्ही प्रार्थना करून त्याच्या घरी त्याला पाहायला न जाता,  फक्त वेळ जाण्यासाठी , आणि एक कप चहा देण्यासाठी पूर्वीसारख्याच भावाने, आतुरतेने त्याची वाट पाहत आहोत आणि तशीच वाट पाहत राहू.
( सदर कथेतील पात्रे आणि पात्रांची नावे काल्पनिक असून सत्यतेशी आणि वास्तवाशी त्याचा कडीमात्रही संबंध नाही. तसा संबंध असल्यास तो योगायोग समजावा )
       

Comments