गुन्हेगारसंशोधन शास्त्र .. एक विचारमंथन..

  फौजदारी गुन्हेगारी कृत्यामागच्या  मानसिकतेचा मागोवा घेताना प्राधान्यक्रमाने त्या कृत्यांनंतरचा लाभदायी व्यक्ती प्रथम आरोपी म्हणून विचारात घेणे गरजेचे असते , ती व्यक्ती कोण ? , तिचे बळीशी नाते , तिचा झालेला फायदा , आणि तिचे आणि बळीचे सहसंबंध ह्या सगळ्याचा प्रामुख्याने विचार केला जातो. फौजदारी गुन्हेगारी कृत्य करणारी व्यक्ती सराईत गुन्हेगार असेल हे गरजेचे नाही विकासित समाजव्यवस्थेत सदर गुन्हेगार व्यक्ती ही कोणीतीही गुन्हेगारी पार्शवभूमी असणारी अशी नसतेच बहुतांशी गुन्हेगारी प्रकरणात हे सिद्ध झालेले आहे. एका छोट्याश्या लाभासाठी किंवा कौटुंबिक कारणासाठी बहुतांशी गुन्हे होताना दिसतात. 
     फौजदारी गुम्हेगारी कृत्ये / कृत्य करणाऱ्या कोणत्याही आरोपीची प्रथम छाननी करताना melafide mind ( वाईट मन ) आणि mens rea ( वाईट कृत्य करण्यासाठीची इच्छा / भावना ) ह्या दोन संज्ञा विचारात घ्याव्या लागतात. ह्या दोन संज्ञांशीवाय गुन्हेगारी कृत्य होऊ शकत नाही, आणि तसे झाले असल्यास ते कृत्य Good Faith ( चांगल्या भावनेतून / इच्छेतून ) झाले आहे असे गृहीत धरले जाते. आरोपीची मानसिकता जाणून घेणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे . हे सहज स्पष्ट आहे की आरोपी व्यक्ती आपले मन आणि कृतीमागची भावना / इच्छा  कधीही उघड करीत नाही पण त्याच्या हातून ते कृत्य झाले हे तो नाकबुल मात्र करतो पण ते कृत्य का झाले असावे ? ह्याचा मागोवा घेण्यासाठी कृत्यांनंतर फलदायी / लाभदायी व्यक्ती किंवा आरोपीचा होणारा / झालेला फायदा ह्या गोष्टी सत्य उघड करतात. 
     गुन्हेगारी कृत्य आणि त्यातून साकल्याने समोर आलेल्या काही गोष्टी त्या कृत्याशी गुन्हेगाराचा सहसंबंध उघड करतात. आधुनिक युगात काही संकल्पना आजही मार्गदर्शनपर मानल्या जातात. गुन्हेगार शोधण्यासाठीच्या क्लुप्त्यांचा भारतात फार मोठा विकास झाला आहे असं म्हणता येणार नाही कारण आजही पाश्चिमात्य फॉरेन्सिक आणि बलेस्टिक शास्त्राने गुन्हेगाराचा मागोवा घेतला जातो.परंतु ह्यात कोणतेही शास्त्र हे पूर्ण भारतीय बनावटीच नाही किंबहुना आजपर्यंत भारतीय गुन्हेशास्त्रप्रणाली ही जुनाट पद्धतीने संशयी गुन्हेगाराला अटक करून आणि त्याच्या नातेवाईकांची चाचणी घेऊन अथवा ज्या ज्या मार्गाने शास्त्त्रावितिरिक्त आरोपी शोधता येतील ते ते मार्ग भारतीय गुन्हेशास्त्राप्रणाली अंगिकारते. आधुनिक गुन्हेसंशोधनशास्त्र DNA फिंगर प्रिंट्स आणि फॉरेन्सिक शास्त्र ह्याच्याशी जोडलेले आहे आणि ह्याचा अवलंब भारतीय न्यायप्रणालीत पुरावा म्हणून थोडाफार वापर होऊ लागला आहे.
    फौजदारी गुन्हेगारी ही सामाजिक व आर्थिक आणि कौटुंबिक बाबींशी निगडित आहे हे सर्वमान्य सिद्धांत आता कालबाह्य झाला असून ' बोर्न क्रिमिनल ' ही संज्ञा जुनाट व निष्क्रिय झाली आहे. एखादा व्यक्ती त्याच्या शारीरिक लक्षणांनी ( अवयवांच्या व मुखाच्या ठेवणीवरून ) क्रिमिनल वाटतो म्हणून सरसकट तशा लक्षणांच्या जनसमुदायापैकी काही निवडक लोकांना आरोपीच्या पिंजर्यात किंवा पुनर्वसन केंद्रात भरती करता येणार नाही. आधुनिक युगात विकसित राष्ट्रांमध्ये सामाजिक स्थान , आर्थिक विवंचना आणि कौटुंबिक त्रास ह्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण कमी असून धार्मिक माथेफिरुपणा आणि वैचारिक वाद ही नवीन कारणे समाविष्ट करावी लागतील. आधुनिक विकसित समाजातून गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन होणे तुलनेने कठीण असले तरी गुन्ह्याच्या पद्धती आणि कारणांचे स्वरूप वेगाने बदलत आहेत.
     सद्यस्थितीत वरील सर्व कारणांचा आणि विचारांचा एकत्रित विचार केल्यास विकसनशील राष्ट्रात आर्थिक विवंचनेमुळे होणारे गुन्हे भविष्यात वाढताना दिसतील आणि आता इंटरनेट व इतर समाजमाध्यमे व इलेट्रोनिक साधने उपलब्द असताना गुन्हेगाराना शोधण्याचे आणि जबाबदारी ठरवण्याचे गुन्हेगारसंशोधनशास्त्र अधिक प्रगत व्हायला हवे किंबहुना गुन्हेसंशोधनशास्त्रप्रणालीलाच खुद्द संशोधनाची आणि वैचारिक संज्ञा व स्व - साधनांच्या विकासाची आत्यंतिक गरज आहे…
Adv. Hrishikesh D. Vaishampayan..

Comments