व्यक्तिओळ्खीची गुपितं .
माणसं ओळखणं ही कला आहे त्यापेक्षा ते शास्त्र आहे हे महत्वाचे. मनुष्याचे गुण अवगुण जसे जसे विकसित होतात तशी त्याची आंतरिक भाव भावना अधिक टोकदार व तीक्ष्ण होत जाते. वय वाढण्याच्या काही माध्यन्हामध्ये आलेल्या अनुभवांवरून त्याची मानसिकता आकार घेऊ लागते आणि म्हणूनच मानसिक विकासामध्ये प्रत्येक मनुष्याचे निवस्थानाचे तसेच त्याआजूबाजूचे वातावरण अत्यंत महत्वाचे ठरते. प्रत्येक मनुष्यामध्ये एक वेगळेपण दडलेलं आहे काहींमध्ये ते त्वरित दिसून येतो तर काहींमध्ये उशिरा, त्यासाठी काही काळ त्यासोबत व्यतीत करावा लागतो. मनुष्य ओळख ही एक वेळ घालवणारी परीक्षा आहे आणि ती पास होवो अथवा नापास ते होण्याने फायदा मात्र जास्त आहे.
कळपात राहताना प्रत्येक मनुष्याचे व्यवहार , नातेसंबंध , आणि सामाजिक संबंधांमध्ये बहुतेक वेळा फसवणूक होते तर काही दैवयोगाने तगतात. आधुनिक काळात व्यापार व नातेसंबंधात फसवणुकीचा बहुतेकवेळा बहुतेकांना सामना हा करावाच लागतो आणि त्याला एकमेव कारण कमजोर कच्ची आकलनशक्ती , निरीक्षणशक्ती आणि म्हणूनच त्यासाठी काळ व्यतीत होण्याची गरज इथे पुन्हा अधोरेखित होते. मनुष्यस्वभाव व मनुष्य परिपूर्ण ओळख ही आयुष्यभर एकत्र राहून ही कठीण आहे पण त्या त्या गरजेच्या आणि संपर्काच्या क्षणी त्याची मानसिकता आणि क्षणिक गरज अथवा त्याचे हितसंबंध ओळखून त्यानुरूप आपली वागणूक ठेवणे हे सर्वात कठीण असे म्हणावे लागेल.
यंत्रयुगाची सुरुवात होऊन आता तबबल दोन शतके उलटून गेली आहेत दरम्यानच्या कालावधीमध्ये माणसाचे ही यांत्रिकीकरण झाले आहे आणि हीच खंत बहुतांशी मनोविकारतज्ञ , समाजशास्त्रतज्ञ , आणि विचारवंत मांडतात. तुमच्या अपापसातल्या सहसंबंधामध्ये हळू हळू यांत्रिकपणाला प्राथमिक अटी म्हणजे पाळाव्या लागणाऱ्या नियम व अटी तसेच मॅनर्स आणि एटिकेट्स च्या नावाखाली मनुष्यमात्रांना वळण लावणे ह्या सगळ्याचा गुंता हा पूरक ठरतो आणि मग भाव भावनांचा आणि आंतरिक नात्याचा विचार न करता केलेली कृती ही अटी, तत्व आणि मॅनर्स आणि एटिकेट्स मध्ये सहज खपून जाते. अटी किंवा अट / नियम ही यंत्रयुगाची मनुष्याला सर्वात मोठी भेट म्हणावं लागेल. कारण कारण अट किंवा अटी चे / नियमाचे प्राथमिक स्वरूप म्हणजे विशिष्ट नियम व नियमभंगाचे दुष्परिणाम आणि त्याची गर्भित भरपाई नोंदलेली एक छोटीशी वाक्याची रेषा म्हणजे अट किंवा अटी / नियम. आणि ही पाळणं / पाळणे किंवा तिच्या / त्याच्या अनुषंगाने अगदी काटेकोर कृती करण ही यांत्रिकीकरणाची देणगी. जस प्रत्येक यंत्राच कार्य ठरवून दिलेले असणे त्याप्रमाणे मनुष्याने नियम / अटी पाळणे. आणि त्यातूनच माणूस यांत्रिकीकरणाला सुसंगत आपली दिनचर्या ठेवू लागला. तत्व ही यांत्रिकीकरणाची देणगी मात्र नाही कारण ती मनुष्यगणिक बदलत असतात आणि बहुतांशी मनुष्याची विचारसरणी तत्व आंतरिक लोभीपणा आणि स्वार्थीपणामुळे लवचिक ठेवणे ह्यानुसार कार्य करते.मॅनर्स अँड एटिकेट्स ही यांत्रिकीकरणाची देणगी म्हणता येईल कारण ते विशिष्ट सामाजिक स्थितीमध्ये मनुष्याला अंगीकारावेच लागतात कारण ते ठराविक आर्थिक स्थितीच्या मनुष्यगटाला पाळणे बंधनकारक असतात आणि त्यामुळेच त्यांची मान सन्मान / ओळख त्या त्या टोळीमध्ये राखली जाते / राखला जातो.
मनुष्यओळ्ख ह्या शास्त्रामध्ये वरील सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर परिणामकारक ठरतात. एखादा मनुष्य स्वतःची ओळख स्वतःचा आब त्याहीपेक्षा तो त्याची वागणूक तत्वाला धरून असेल स्वतःच्या नियमांना धरून असेल तर तो त्वरित या ना त्या प्रकारे आपणांस पटवून देतो ( अर्थात ती त्याच्या कृतीवरून आपण ओळखायची असते ) आणि असा मनुष्य व्यवहारास पूर्णपणे लायक असतो त्याच्याशी कोणताही लेखी करार करणेस हरकत नाही. व्यवहाराबाबतीत त्या मनुष्याचा तात्विक आणि स्व नियमास बांधील राहण्याचा स्वभाव उपयुक्त ठरतो. कौटुंबिक नातेसंबंध मात्र अशा माणसांशी जोडताना थोडीफार दक्षता घेणे गरजेचे आहे. असा तात्विक व्यक्ती आपल्या तत्वांना नातेसंबंधामध्ये स्वार्थासाठी किंवा आपले खरे करण्यासाठी आणि अहं राखण्यासाठी हरताळ फासू शकतो किंवा लवचिक करू शकतो. आणि म्हणून खरा व बेगमी तत्वनिष्ठ माणूस ओळखण्यासाठी काही काळ जावा लागतो. मनुष्यमात्रांमध्ये आढळणारा वेगवेगळेपणा त्याच्या प्रत्येक कृतीची आणि वक्तव्याची ओळख अधोरेखित करून देतो आणि त्याच्या स्वभावाला असणारा आकारही त्याच वेगळेपणाचा भाग आहे, आणि ह्या निसर्गाने प्रत्येकाला एकमेकाला प्रथमिकरित्या ओळखण्याची एक कला प्रदान केली आहे. प्रत्येक मनुष्य प्रत्येक ओळखी अनोळखी व्यक्तीला काही मोजके क्षण संपर्कात राहिल्याने काही पूर्णांक टक्के प्रथमिक अनुमान काढून थोडाफार ओळ्खतोच. मनुष्याची मग तो ओळख असो वा अनोळखी त्याच्या कृतीतूनही तो थोडाफार ओळखता येतो आणि मनुष्य त्याच अर्धओळखीच्या भांडवलातून नातेसंबंध व व्यवहार संबंध जोडतो , शेवटी ह्या सगळ्या सव्यापसाव्यात मनुष्याची निरीक्षणशक्ती प्रचंड विकसित असणे मात्र नितांत गरजेचे आहे आणि त्यासाठी अभ्यास आणि परिश्रम आहेत म्हणूनच आणि म्हणूनच व्यक्ती ओळखणे ही कला आहे त्यापेक्षा ते शास्त्र आहे.
Comments
Post a Comment