Piu ❤️
|| पियू ||
वाचता वाचता मागच्या आठवणी, मेसेंजरचे ते पान,
आता वेळ गेली, कळले तिच्या लग्नाचे लिखाण,
अशाच एका वेळी, ती फेसबुक वर सापडली होती,
फ्लर्ट करता करता अलगद मनात बसली होती,
वाहत गेलो, वाहत गेलो कळल नाही काही,
मी कुठे होतो ती कुठे होती उमजले नाही काही,
तिच्या प्रत्येक श्वास माझ्या हृदयाची धडधड होती,
तिच्या हातांचा स्पर्श माझ्या आधाराची भिंत होती,
उलगडा एकेक खुलासा, भूतकाळाचे ते वाण,
आता वेळ गेली, हृदयात उरली ती मर्मी जाण,
प्रत्येक भेटीआधी भांडत भांडत रडत होती,
राग करता करता प्रेमात माझ्या फसत होती,
तिच्या प्रत्येक अदांनी घायाळ मी होत होतो,
ती मात्र निराकार , तिचे काम ती करत होती,
खूप खोल अडकलो , गाठ ती सोडणार होती,
माझी बिचाऱ्याची पुन्हा पुन्हा बांधणी चालली होती,
तिची नव्हती मागणी असच राहायची तिची तयारी होती,
मी मात्र पर्याय म्हणून तिच्याकडे पाहत होतो,
जातीचा माझा माज प्रेमात कधी विरघळलाच नाही,
चक्रव्युहात शिरताना माझा अभिमन्यू मी कधी होऊ दिलाच नाही,
आर्थिक तंगी, कामाचं ओझ, तिची कधी तक्रार नव्हती,
फ्लर्टीपण आणि जात वगळता, तिची काही अपेक्षा नव्हती,
तीच माझ पाहिलं प्रेम, पहिलं प्रेम मी पाहिलं होत,
तिच्या डोळ्यात माझी स्वप्न , स्वप्न तीच राहील होत,
भांडता भांडता बोलता बोलता चार वर्ष सरली,
माझा अहंकार तिची ओढ, जणू लोणच्यात कैरी मुरली,
अशाच एका सकाळी छोटा वाद , प्रेमाची भिंत भंगली,
कोणी करायचा संपर्क अहंकाराची तू तू मैं मैं चालली,
नाही केला मी संपर्क , तिने ही नाही केला,
वेळ निघून जाईल तिचा निरोपाचा संदेश आला,
काय करू? कामाची ओढ, ज्ञानाची ओढ कारण काय सांगायची,
तिचा राग माझा अहंकाराचा माज, हिंमत नाही झाली बोलायची,
सरली कोरोना वर्ष , साडेतीन वर्षांची खोली,
पैशाच्या उष्म्यात, गर्वाच्या कचऱ्यात मुरले नाही पाणी,
हरवली सारासार विचारबुध्दी, प्रेमाला दोष का द्यावा,
तिचे माझे नाते तुटके, कोणावर रोष का असावा,
लग्न तिचे ठरले , पुन्हा पुन्हा विचारणा झाली,
त्या विरोधी ठाम भिंतीला दया मात्र नाही आली,
आठवणी तिच्या खूप विखुरल्यात,
वॉट्साप, मेसेंजेर , गूगल फोटोज् सगळीकडे सामावल्यात,
काय करू मी , काय करू मी, ह्या आठवणींच,
ती गेली, ती जाणार , काय करू मी पर्यायांच,
समजूत ती समजूत , कितीही काढा स्वतःची,
प्रेमाला अर्थ नाही , अर्थाला अर्थ आहे, ही नीती जगाची,
हसता हसता आतमध्ये रडत आयुष्य मला काढायचे आहे,
लग्न तिचे ठरले आहे, तिने मात्र सुखात राहायचे आहे,
तिने सुखात राहायचे आहे… ||
@hrk Vaishampayan 11.10 AM 13/03/2022
Comments
Post a Comment