मागे की पुढे ? कुठून कुठपर्यंत ?

         9 नोव्हेंबर 2019 बाबरी मस्जिद खटला निकाली झाला. 1528 - 29 साली मुघल सेनेचा सेनापती मिर बाकी ह्याने तेथील श्री राम मंदिर पाडून त्याचे अवशेष वापरून तिथे आपल्या स्वामीच्या नावाने बाबरी मस्जिद बांधली. मुघल साम्राज्याचा शेवटचा पराक्रमी बादशाह औरंगजेब ने काशी विश्वनाथ मंदिर पाडून त्या जागी ज्ञांनवापी मस्जिद बांधली. 14 मे 2022 रोजी वाराणसी स्थानिक न्यायालयाने आदेश देवून ज्ञांनवापी मस्जिद परिसरात कोर्ट कमिशन द्वारे स्थिती पाहण्याचा आदेश केला आणि अशाप्रकारे सुप्रीम कोर्टाच्या बाबरी मस्जिद आदेशाचा फायदा ह्या ही वादाला मिळणार हे सत्य आहे.

         पाकिस्तानातील पंजाब मधली झांब ह्या शहराचां माहितीपट पाहत असताना तेथील पिर साहेब मकबरा दिसला.. मकाबर्याच्या घुमटावर वरील टोक काढले असून घुमट टोकाविना आहे. त्यात असलेल्या मकबऱ्यावर हजारो लाखो लोक कैक काळापासून डोके टेकवून दुवा करत असतील. त्याच घुम्मटावरील टोक का काढलेलं असावं ह्याबाबत शंकेला वाव आहे. त्याच शहरातील पूर्ण दगडी एक मारुतीचे जुने मंदिर दाखवण्यात येतेय आणि ते पाहताना त्याचे वैभव स्पष्ट दिसून येतेय. 

        मुलतान शहरात जुनी खंडरे असलेली मंदिरे जागोजागी कुठेतरी शहराबाहेर वैराण प्रदेशात दिसून येतात. पेशावर शहरात ह्याचे प्रमाण खूप जास्त आहे. कराची त्या मनाने पूर्ण व्यापारी शहर असल्याने जुन्या मंदिराच्या जागा व्यापलेल्या असतील आणि काही जुन्या सिंधी, मारवाडी व्यापाऱ्यांनी बांधलेली मंदिरे अजूनही दिसतात परंतु देखभाल नसल्याने त्या मंदिरात घाणीचे साम्राज्य असल्याचे कित्येक डॉक्युमेंटरीज त्यांच्या जुन्या बातम्यांमध्ये ह्याची कैफियत ऐकु येते.ह्या सगळ्यात भयानक अवस्था आहे ती पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील बहावलपुर तसेच आजूबाजूच्या जैन मंदिरांची काही तर ती मंदिरे होती की नाही याबाबत शंका निर्माण करतात. ह्याच प्रांतातील सियालकोट शहरात एका मंदिराच्या खंडरात स्वच्छतागृह असून ह्याबाबत पाकिस्तानी वाहिन्यांनी थोडीफार ओरड केलेले युट्यूब वरील काही चलतचित्रे पाहिल्यानंतर दिसून येते.

        भारतात  दक्खन प्रांतात केरळ येथील मोपला आक्रमण हे अगदी त्या मानाने ताजे आहे. केरळातील काही एतदेशिय अरब शहरात रोजगारासाठी गेले. हिंदू धर्ममार्तंडानी समुद्र ओलांडण्यास केलेली बंदी झुगारून ते गेले परिणामी धर्मभ्रष्ट केले गेले / झाले. इथे येवून त्यांनी काही स्थानिक स्त्रीयांशी विवाह केले. त्यांना ह्या प्रदेशात मोपला     ( जावयी ) संबोधन मिळाले आणि खऱ्या अर्थाने ते केरळ चे मालक जावयी झाले. आणि ह्याच जावयांच्या बंडाला मोपल्यांचे बंड असे म्हंटले गेले. केरळ मध्ये अशा भ्रष्ट झालेल्या मंदिरांचे कितीतरी फोटोज् सोशल मीडिया वर फिरताना दिसतात. मंदिर गाभर्याची ठेवण स्पष्ट दिसून येते. काही अगणित मंदिरे ह्या देशात मुघलांनी नासली उध्वस्त केली. जी मंदिरे उध्वस्त करणे शक्य नव्हते त्या मंदिरांचे हिंदू संस्कृती पवित्र चिन्हे बुजवून त्यावर लेप लावून मिटवून टाकून त्या त्या ठिकाणाना टिपिकल मुस्लिम अरबी नावे देण्यात आली. काफिरांच्या अगणित स्त्रिया लुटल्या जाऊन काही शे कोटी लोकसंख्या ह्यांनी निर्माण केली. कालांतराने तो देश ही झाला ( अजूनही काही लोकसंख्या इकडे शिल्लक आहेच )  ही वस्तुस्थिती मान्य केल्याखेरीज गत्यंतर नाही. इस्लाम काही शूद्र लोकांनी चुकून मान्य केला असावा ह्या गोष्टीस पुरेसा वाव आहे पण एका विशिष्ट उद्देशासाठी युद्ध होत असेल तर त्यातून नरसंहार, संस्कृतीसंहार, सभ्यातासंहर, आणि नितीभ्रश्टता होतच असते आणि हरलेला समाज त्यांची संस्कृती विसरून जातो.  

       आपल्या देशात सुदैवाने हिंदू संस्कृतीची पाळेमुळे खोलवर रुजलेली असल्याने ती कोणालाही उखडता आलेली नाहीत. मुळातच वरील सर्व गोष्टींचा विचार करता त्या त्या परिसरातील राहणारी लोकसंख्या मुस्लिम आक्रमणे मुस्लिम झाली आहे. त्यांची संस्कृती भ्रष्ट होऊन बदलली त्यामुळे त्यांच्या प्रदेशातील देवळे ते मस्जिद म्हणून वापरत आहेत. ( कोणीही आपल्या खाजगी जागेत नमाज पढयला मस्जिद उभी करू देण्यास तयार होत नसेल / झाला नसेल / होणार नाही ) त्यामुळे त्या त्या प्रदेशातील लोकसंख्या मुस्लिम झाली असेल तर ते त्यांच्या पुजस्थनात योग्य तो बदल करून मस्जिद बनवून त्याचा प्रार्थनेसाठी कीव कोणत्याही त्यांच्या धर्मात लिहिलेल्या आखलेल्या अमानुष ? धार्मिक कृत्यासाठी वापर करत असतील तर आता आपण हे सगळ शोधून काढून काय साध्य करणार आहोत ?  पुढे काय होईल आपण कुठे जाणार आहोत आणि इतिहासाला सुधारण्याचा प्रयत्न करायचा की जे झाले ते झाले असे समजून मार्गक्रमण करायचे हा सर्वस्वि विचार आपण सगळे हिंदू कट्टर, धार्मिक, आस्तिक , नास्तिक आणि सोशिक, उदारमतवादी यांनी मिळून करायला हवा.. 

@ HRK Vaishampayan 

12 जून 2022 . 1.30 PM...



Comments