झारीतले शुक्राचार्य


      साला हा पोर नाव कमावणार ! खटारे वकिलाने स्तुती केली म्हणजे नक्कीच लाकडांची सोय ही झालेली आहे अस समजायचं. भयानक डावपेची , कुरतडणारे कोल्हे, हिंस्र जनावरांची चमक, आणि एकास एक बुद्धिवंतांची खाण म्हणजे हा आमचा पेशा आणि आमचे मित्र. माझी उठबस कायम वयोवृध्द सिनियर यांच्यात अर्थातच सगळ्या गावच पाणी पिवून आपली लेखणी तेजस्वी , ओजस्वी वाणी आणि परिस्थितीचे घाव पचवलेले आपले बाहु थरथरणारे हात घेवून अन्यायाविरुद्ध राग त्वेष आणि भयंकर तार स्वरात युक्तीवाद करणारे भारलले शब्द फेकून थकणारे, " अरे एक चहा आण रे , हळूच पाकिटातून सिगरेट काढून शरीर जाळून आपली मानसिक ऊर्जा तगवणारे हे जीव. 

     " अरे दुर्योधना जज ची परीक्षा दे रे " असा सल्ला कोणत्या वकिलाला मिळाला नसेल असा वकील शोधून सापडणे कठीण. " सपशेल मान फिरवून त्या वाक्याला तुच्छतापूर्वक भाव व्यक्त करणारा वकील न मिळणं हे ही तितकेच अवघड ",  सरकारी अथवा खाजगी नोकरी करून संसारी किड्यांप्रमाणे आयुष्य नाकारून ह्या क्षेत्रात येताना त्याने आपल्या भविष्याची नाडी ईश्वराच्या मर्जीच्या हवाली केलेली असते आणि हे करून ही तो आपल्या क्लाएंट च्या भविष्याची दोरी आपल्या हातात घेवून बसलेला असतो. एक वडापाव खाऊन रिमांड, जामिनाची वाट पाहत अख्खा दिवस बसणारा, वेळच वेळ असताना आपल्या कार्यालयात कायद्याच्या पुस्तकांची बाड च्या बाड रिचवणारा, घरी जेवायला काय आहे जेवण होईल की नाही तयार असेल की नाही ? मुलं बायको काय करतेय ! एवढंच काय आई आहे का ? बायको माहेरी आहे की घरी ? ह्यापेक्षा त्याला साक्षीदाराच्या एडमिशन ची आरोपीच्या डीपोसिशन, पुराव्यात काय काय आहे आणि युक्तीवाद किती मर्यादेत ठेवायचा आहे ह्याची जास्त काळजी असते. जनसामान्य माणसाला ज्यांची भीती वाटते असे वर पासून खालपर्यंत सगळे आधिकरी याच्या खिशात. खिशात नाही मावला तर कधीतरी तो चौकोनात येतो त्याला बरोबर कोंबायचा हे तत्त्व आणि कला. साधारण नाही काही दश वर्ष यासाठी त्यागावी लागतात. नाही मिळालं कोंडाचा मांडा करून पोट जाळव लागत तेव्हा हे सगळ जमत टिकत आणि राहत. झारितल्या शुक्रचार्यां प्रमाणे आपल्या तळणी ची आपल्या काळाची आपल्या संधीची वाट पाहत असतात. काही तावून सुलाखून निघतात त्यातले काही काही नाही उलट सुलट करून आपल्या पोटाची भूक शमविण्यााठी योग्य अयोग्य मार्ग अवलंबितात.  पूर्ण शासन त्यांचा व्यवहार कागदपत्रे , जुनी पत्रे, लोकांचे करारमदार ह्या सगळ्यांची माहिती मिळवून त्याचा वापर करण्याच्या कलेमुळे त्यांना किमान भाकरीच्या तुकड्याची सोय करणे फारसे अवघड जात नाही.ह्या दुष्टचक्रात फसलेले कितीतरी अभागी जीव आजूबाजूला दिसतील त्यांची संख्या ही हळूहळू वाढताना दिसेल पण वयाच्या 75 व्या वर्षी सुध्दा 2 जिने 23 पायऱ्या चढून जिल्हा न्यायाधीशांसमोर भांडणारा कावसकर वकील पाहिला की तुम्हालाही कळेल ह्या नशेच माहात्म्य. कोण जाणे ह्यांच्या चितेतूनही आपल्याला दिवाणी प्रक्रिया संहितेचे आदेश नियम एईकु येतील ह्यात आश्चर्य नाही. " खरा वकील तोच, जो दिवाणी प्रक्रिया संहिता जाणतो आणि त्यात युक्तीवाद करतो " बाकी सगळे बोगस रे," अशी तारस्वरात चिरकणारी खराटे वकिलाची प्रकृती कितीही नाजूक असली तरी त्याला वकीलीला स्वतःपासून लांब ठेवणे कितपत जमेल ह्यात शंका राहतेच.

       एक नशेचां, भिरभिरलेल आणि स्वतःला आतुन जळणारां असा हा पेशा. खरा वकीलाने संसार सुख, जिभेच कौतुक , आणि प्रेमाची , चिंतेची , आणि कुडमुडुक काळज्यांची लक्तर कधीच उडवलेली असतात. सगळेच ज्यांची आयुष्यातली 12 वर्षापेक्षा अधिक काळ ह्यात संपलेला आहे तो तुम्हाला असाच कमीजास्त प्रमाणात आढळ होईल. त्यात काही खरचं " ढ " असतात आणि अशा " ढ " माणसाशी तुमची गाठ पडली तर तुमचा " गा " झाला समजायचं. उत्तम वकील ओळखता येणं हे जाणून बुजून विकसित करावं लागणार स्कील आहे. आणि ह्यात तुम्ही फसलात की आयुष्यात फसलात. मतभेद असू शकतात सुरुवातीला बोलावं लागतं सेवा म्हणून पण शेवट पर्यंत क्लाएंट शी गोड बोलणारा हा कधीच खरा वकील नाही. तारस्वरात ओरडणारां, चुकल तर शब्दाच्या चाबकाने खरटणारा, तुम्हाला तो आतून अगदी आतून बोलणारा आढळेल तीच खरी चांगल्या वकिलाची ओळख समजावी. हे जबरदस्त बुद्धिमान शरीर आणि मन तुमच्यासाठी जाळणारे स्वतःच्या फाटक्या खिशात पैसा नसताना उगाचच स्टँडर्ड आणि स्टेटस मेन्टेन ठेवणारे, समाजासाठी काहीतरी योगदान देणारे. आणि शिस्त लावून समाज घडवणारे हे जीव आहेत. ते पोटार्थी म्हणून तुमच्यावर अवलंबून असेल तरी कोणाचे गुलाम नाहीत. स्वतःचे स्कील बुद्धिमत्ता आणि विचार विकसित करून त्याचा पैसा करणारे हे जीव तुमचे आमचे खुद्द स्वतःचे ही नसतात हे अंतिम सत्य.

      क्लाएंट साठी जिवाचं रान करणारे , आतून कळकळीने सांगणारे कधी कधी फुकट सल्ला देणारे पण ते ही स्पष्ट सांगणारे फार कमी लोक उरलेत. कितीतरी महाविद्यालये आहेत पुढे येतील कायद्याचं शिक्षण देतील. वर्षानुवर्षे नवीन ज्युनिअर खोगीर भरती येईल. भाद्रपदाच्या काळाप्रमाणे कितीतरी दरवर्षी नवीन उमेदवार येतील उडून जातील पण खरा वकील हा कधीच हा पेशा सोडत नाही कोणत्याही अगदी कोणत्याही कारणाने हे मात्र खर. 



Comments