लढा, अंत नसलेला...
राजौरी च्या जंगलात किर्र काळोखात दोनदा घसरून पडल्याने अल्ताफला डाव्या पायाजवळ जखमा झालेल्या वाहणाऱ्या रक्ताकडे बघण्यासाठी त्याला थोडाही वेळ नव्हता. पुंछ त्या ठरलेल्या जागेवर त्याला त्याचे तीन साथीदार भेटणार होते. त्यांच्या वेळेत त्यांना भेटणं आवश्यक होतं त्याला, कुठूनही सुरवात केली तरीही त्याच ठिकाणी भेटायचं त्यांचं ठरल होत, त्यांचा आकाह चां आदेश होता त्याप्रमाणे त्यांना त्याची वेळ गाठवीच लागणार होती. रात्रीचा एक वाजलेला त्याने उजव्या हातातील त्याच्या घड्याळात सहज पाहिलं. “ चटकन निघायला हवं, नाहीतर चुकामूक झाली तर सगळ मुसळ केरात जाईल,” त्याच्या मनातले विचार त्यानं कटाक्षाने बाजूला सारले.
मुझ्झफराबाद खाटीक मार्केट मध्ये अख्ख बालपण गेलेला अल्ताफ खून मारामाऱ्या आणि लुटपाट करणारा अल्ताफ त्याने बनवलेल्या टोळीची त्याला कायम काळजी असे. कितीही सराईत गुन्हे करताना आपल्या रक्ताच्या मुलाला जितकं आपण संरक्षित ठेवतो त्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक आपल्या टोळीतल्या प्रत्येक सदस्याची काळजी त्याला घ्यावी लागे. त्याचे त्याने जपलेले दीलशाद वाणी, नौमान अफजल, आखिफ चिकना, साकीब तौहिदी, कय्युम दुर्रानी, कय्युम च नाव तोंडावर आलं की अल्ताफ ची कपाळाची शिर विलक्षण तडके, कुप्फर नाजायज “ अल्ताफ ने तोंडात कडवटपणा आल्यामुळे तिरसटून थुंकी टाकली,” कय्युंम शेवटी दुर्रानीच तो त्याने ह्यांच्या रोख बघून बालाकोट कॅम्प मधून पोबारा केला होता.
" इंडियन डोग्ज गो बॅक , काश्मीर हमारा है, हम क्या चाहते है, आझादी , है हक हमारा आझादी, बारामुल्ला च्या छोट्याश्या खेड्यात अल्ताफ च्या बापाने अहमद ने नव्वदी च्या शतकातला काश्मीर बघितला होता. कफिरांच्या तीन छोट्या पोरी त्याने घरी नेवुन त्यांना पवित्र करून मोठ्या करून मोहलल्यातल्या दोन म्हताऱ्यांशी त्यांची लग्न लावून दिली होती. काफिरांची घर लुटताना त्याने सगळ्या प्रकारची मानोसोक्त मजा घेतली होती. पोलिसांचा सासेमिरां पाठीमागे लागल्यावर त्याने राजौरी च्या जंगलातून उरी आणि तिथून मुझफराबाद अशी धावपळ केली होती. मागे केलेलं इस्लाम नुसार पुण्य आणि काफिरांच्या भाषेत पाप केल्याने लवकरच त्याला जन्नत नशीब झाली, अल्ताफ , झीनत, आणि बायको अमिना ह्यांची जिवंत चिन्ह मागे ठेवून. बाप गेल्यामुळे अल्ताफ ला अंगण मोठ मिळालं होत अडवणार कोणीच नव्हत. खाटीक मार्केट मध्ये कितीही म्हैशी पाडणारा कोणताही खाटीक नवीन आला मग तो कसाही असो हप्ता वसुली त्याचा उजव्या हाताचा मळ होता, औरत आणि औलाद ही कोणत्याही माणसाची पहिली कमजोरी. त्यांना उचललं की कोणतही काम अवघड नाही. दीलशाद, नौमान, अकिफ, सकिब हे टोळक त्याने तयार केलेलं होत. चौघेही नॅशनल कॉलेज,मुझ्फफराबाद चे पदवीधर, काश्मीर आझाद करण्याच्या टोकाच्या महत्वकांक्षेपायी त्यांनी द्विपदवी चां विचार सोडून यासाठी काहीतरी करण्याच ठरवलं.
कनॉट प्लेस, खुंखार गल्लीच्या तोंडावर असलेल्या जामा मस्जिद मध्ये ते आज चौघेही जमले होते, आज जुम्माच्या नमाजीनंतर बयान देणारे त्यांचे विचार ऐकून काश्मीर साठी काहीतरी करायला तयार असणारे दीडशे तरुणांचा जमाव हळू हळू नारे द्यायला लागलेला होता पण ह्यांना त्याला पाहण्याची ओढ स्वस्त बसू देत नव्हती, " नार - ए - तकबिर, अल्लाह हो अकबर, तुम्हारा मेरा रिश्ता क्या ? ला इलाह इल्ल ला, किंचाळणारा जामाव अधिक आक्रमक झाला होता. अचानक समोरच्या एका व्यक्तीचा हात वर झाला, हिरवा फेटा बांधलेला मुठीत मावणारी दाढी अगदी पांढरा फक्क चेहरा , तोंडावर क्रूर भाव, पण पाहतांच क्षणी मोहून जाव अस त्यांचं व्यक्तिमतत्व, सगळ्या धर्मासैनिकांचा आकाह " ओसामा बिन लादेन " चां उजवा हात म्हणून ओळखले जाणारे मुफ्ती हाजी मोहम्मद पंजिरी त्यांच्या समोर होते, "
“ हाजी सहबा, मै जिंदा रहू या ना राहू, ये अमरकाई मुझे मार तो देंगे, याद रख जिहाद जिंदा रहना चाहिए, पुरा हिंदोस्था फताह करना है हमे, हे त्याचे वाक्य मुफ्तींच्या डोक्यात कायम घुमत असे , ओसमाची काहीही दुष्मनी असली तरीही त्याच काश्मीर वर विशेष जीव होता त्याला काश्मीर मध्ये इस्लामी राज्य यायला हवं होत. इस्लमाच राज्य बस्स, यासाठी त्याला अफगाणिस्थान मधले त्याचे अनुयायी पख्तून टोळ्या मदत करणार होत्याच पण त्याच सगळ आर्थिक नेटवर्क तो याकामास मार्गी लावणार होता. मुफ्तीनी पूर्ण काश्मीर फिरून आझाद काश्मीर च्या सगळ्या मस्जिदित दौरा काढून अगदी हुंजा, गिलगिट, बलतिस्थान, मिझगल, सोस्त, स्कर्डू, मुझ्झाफराबाद, डोमेल, शक्सगाम, सगळ पालथं घालून दीड हजार तरुण ताजा दमाचे इस्लामी सैनिक जमवले होते. बालाकोट च्या पश्चिमेला असलेल्या मैदानी भागात त्याला आएसआय च्या एजंट नी तात्पुरता ट्रेनिंग कॅम्प उभा करून दिला होता..
टोकदार दगडाच्या आपटण्याने अल्ताफ भानावर आला काहीही करून त्याला राजौरी खुइर्त्ता कोटली ह्याचे जंगलमार्गे पॉइंट पास करून पुंछच्यां जंगलात विवक्षित ठिकाण गाठून तिथूनच 300 मीटर पुढे एका यू आकाराच्या छोट्या टेकड्यांच्या रांगेच्या पायथ्याशी वाहणाऱ्या ओढ्यावर तो ओढा थोडा रुंदिने लांब असल्यामुळे तेथे तारेचे कुंपण घालणे कुफराना शक्य नव्हते. तिथे फक्त 8 फूट उभारलेल्या पोलाना पाच आडव्या ताराना इलेट्रिक करंट पास करून तात्पुरती बॉर्डर उभी केलेली होती.. तो इलेक्ट्रिक करंट रात्री तीन वाजता आठा ते दहा मिनिटांसाठी बॅटरी बदलण्यासाठी बंद केला जातो हे त्याला त्याच्या आकाह ने सांगितले होते. ह्याच ठिकाणी चौघांनी जमून बॉर्डर पास करायची होती. साधी जीन्स ची पँट आणि हिरव्या रंगाचा टी शर्ट हा त्याचा पोशाख पाठीवरील आर्मी सॅक मध्ये रॉकेट लॉन्चर HJ - 12 चे सुट्टे भाग, 300 बुलेट स्लॉट, 12 ह्यांडग्रेनेड, कंबरेला अडकवलेला चाकू, बॅगेत असलेल्या बाजूला त्याच खंद्यावर असलेलं मोकळ नळकांड , आणि पँटच्या मागच्या भागात लपवलेली लाईट पिस्तोल हा सगळा सरंजाम त्याला आपल्यासोबत वाहून न्यायचा होता.
अल्ताफ ने दमून आपली सॅक बाजूला ठेवली , मागचं पिस्तोल काढून उगाचच त्याच्याशी चाळा चालू केला त्या ठिकाणी 11 मिनिटे थांबून त्याला बाकीच्यांची वाट पाहायची होती. राहून राहून त्याला अमीना आपल्या आईची आठवण येत होती पण पिस्तोल च्या नळीकडे बघताना त्याला काफरांचे तडफडून जाणारे शरीर आठवत मनोमन तो त्या क्षणांसाठी आतुर झाला होता कधी एकदा मुठभेड होऊन ठरलेलं ऑपरेशन पूर्ण करतो अस त्याला मनोमन वाटत होत. त्याच्या डोक्यात नार - ए - तकबीर अस सारख सारख घुमत होत त्याला त्याच्या आकाह ची आठवण येत होती. 8 मिनिटे होऊनही कोणी आलेलं नाही बघून त्याने सटेलाईट फोन काढला, " कमाल ए - कमाल - ए " चारपाच वेळा अस पुकारल्यानंतर " कौन " ? तकबीर आकाह, " मैं अल्ताफ , " तकबिर, आरे मेरे छोटे शेर, बाकी के काहा गये ? आकाह ! बस याहासे ही मुझे जन्नत की बु आ रही है, आमिन अल्ताफ अल्लाह से गुजारा किया हू, तुझे जन्नत जरूर नसीब होगी, याद है ना 72 हुरें तुझे खुद की हातोंसे शराब पिलानेवाली है, तुझे वो पिके आईसी मर्दानी ताकद आयेनगी की, बास्स तू थक नही सकेगा… जरूर जरूर मेरे आकाह ! तेवढ्यात त्याला त्याच्या डाव्या बाजूने दिलशाद आलेला दिसला तोही खूप थकलेला त्याला वाटत होता.. दोघांनीही पहिल्यांदा एकमेकांना मीठी मारली, आकाह , दीलशाद मिला , ले , लो बात करो… दीलशाद नी ही मोठ्या खुशीने फोन हातात घेतला. तीन ते पाच मिनिटाच्या अंतराने आकिफ, नौमान , साकिब सगळेच एकत्र आले " गले मिलने की तमन्ना पार पडून " चौघेही एकत्र आपल्या मार्गाला लागले,
सावधानतेने चौघेही चिनार वृक्षाचं जंगल पार करताना सराईतपणे चालण्याची त्यांना ट्रेनिंग मिळाली होती. छोट्यामोठ्या जखमा आणि वाहणारा घाम यांची परवा करायला कोणाकडेच वेळ नव्हता. सकीब डाव्या बाजूने नौमान त्यांच्या मागून उजवीकडे अल्ताफ आणि मधेच दीलशाद असे अलर्ट पोझिशन मध्ये चालत होते. त्या वळणावर टेकडी च सोप टोक पार करून चौघेही इलेक्ट्रिक पोलांजवळ पोझिशन करून आडवे राहिले. घड्याळात नजर टाकून अल्ताफ ने डाव्या बोटाच एक बोट दाखवून दीलशाद ला अजून एक मिनिट आहे अशी खूण केली. दीलशाद ने सफाईदार पणे बॅगेतून पकड काढली.हातात ग्लोज चढविले आणि खुणेची वाट पाहत तो बसला. अल्ताफ च्या नजरेच्या बारीक इशर्याने कोणीही अजिबात न बोलता आपल्यापल्या हातात ग्लोज चढवून पोझिशन घेतली. अल्ताफ ने फिंगर क्रॉस करून दीलशाद ला सिग्नल दिला. " सून , अंग्रेजी का बी शेप ना भुलना, " आकाह चे शब्द त्याच्या कानात घुमत होते", दीलशाद ने त्या तारांच्या जंजाळात आपल्याजवळील टोकदार यंत्राने स्पर्श करून पाहिला. इलेक्ट्रिसिटी बंद होती झटक्यात विद्युतवेगाने तारा कट करून तो पार झाला.. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच अल्ताफ साकिब, आणि नौमान चौघेही पार झाले ह्या ठिकाणी त्यांना अजिबात जराही विलंब न करण्याचे आदेश व ट्रेनिंग ही होती.चौघेही सहज पार झाले.. हिंदुस्तान च्या भूमीत गजवा ए हिंद च्या सज्ञेत छोटासा का असेना चौघांनी आपले इस्लांम प्रती असलेले कर्तव्य पार पाडले होते. हिंदुस्तान च्या काश्मीर भागात त्यांनी आपली फजर ची नमाज पढून आपल्या पुढील कामाला सुरुवात केली..
अखेर " पूंछ " च्या जंगलात हिंदुस्तान चे चार सैनिकांना वीरगती प्राप्त झाली ही बातमी वाऱ्यासारखी भारतभर पसरली, हे चौघेही ते ऑपरेशन पार पडून फक्त 2 रॉकेट लॉन्चर नी आपल टार्गेट पूर्ण करून परतले होते. अल्ताफ ने आपल्या आकाह ला सटेलाईट फोनद्वारे याची खुशखबर पोहचवली होती. अवघ्या पाच मिनिटाच्या जीवनाच्या अतीतटीच्या लढायीत आक्रमक यशस्वी झाले होते. हिंदुस्थानी भूमीवर आक्रमण हाच इतिहास कायम आणि भविष्यात ही तेच. बचावात्मक भूमिकेतून कधीतरी उफाळून येवून काफर आक्रमण करतात ते मागच्या बालाकोट एअर स्ट्राईक च्या वेळेस पांजिरी लां कळल होत पण तो त्या वेळी नुरिस्थान ला होता. त्याच्या हाताखाली शिकलेले अफगाण तालिबानी आता त्याच्याविरुद्ध मैदानात उतरले होते त्याचा बंदोबस्त लावण्याचा त्याचा पुढील इरादा होता. पुढील चौवीस तासात काहीही होऊ शकत ह्याची त्याला जाणीव होती.. " अरे वो क्या करेंगे ? , फिरसे बालाकोट ना, अस कुत्सित हसून त्याने थुंकी टाकली होती. " अरे जबतक इस्लाम है, तबतक जिहाद है, कोई नही रोख सकता हमे. ओसामा साहब जन्नत गये , हम रुके क्या ? मैं भी जन्नत जाऊंगा तुम भी ना रुकना, सभोवताली बसलेल्या आपल्या अनुयायांना त्यांनी आपल यश कळवताना हा ही मुलमंत्र दिला.. भारतीय भूमीवर झालेल्या ह्या हमल्याला सडेतोड जबाब देवून अठ्ठेचाळीस तासात अल्ताफ, दीलशाद, नौमान, साकिब त्यांच्या इच्छित स्थळी 72 हूरांजवळ गेले पण " काश्मीर कितीही शांत केलं , कितीही नागरी सरकारने सुविधा दिल्या तरी , आपल्या भारतात नव्हे तर अख्ख्या जगात इस्लामी आतंकवाद हे आव्हान राहील आणि दिवसेंदिवस अधिक गडद होत जाईल हे मात्र खर…
08/05/ 2023
@hrkvaishampayan
Comments
Post a Comment